स्मृती इराणी खरंच ग्रॅज्युएट आहेत की नाही ?

स्मृती इराणी खरंच ग्रॅज्युएट आहेत की नाही ?

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या पदवीवरून पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. त्यांनी त्यांच्या डिग्रीबदद्ल वेगळीच माहिती दिली, असं काँग्रेसचं म्हणणं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 12 एप्रिल : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या संपत्तीनंतर आता त्यांच्या पदवीवरूनही चर्चा सुरू झाली आहे. स्मृती इराणी यांनी अमेठीमधून उमेदवारी अर्ज भरला. त्यावेळी त्यांच्या संपत्तीमध्ये घट झाल्याचं सगळ्यांसमोर आलं. पण त्याचवेळी त्यांनी त्यांच्या डिग्रीबदद्ल वेगळीच माहिती दिल्याचंही उघड झालं आहे.

यावेळच्या उमेदवारी अर्जात त्यांनी आपण ग्रॅज्युएट नाही, असं म्हटलं आहे. त्यांना मध्येच कॉलेज सोडावं लागलं, असा उल्लेख त्यांनी केला आहे. हीच संधी काँग्रसने साधली आहे. याआधी स्मृती इराणी यांनी आपण ग्रॅज्युएट म्हणजेच पदवीधर असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळेच स्मृती इराणी खोटं बोलत आहेत, अशी टीका काँग्रेसने केली.

स्मृती इराणी खोटं बोलत असल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात यावा, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

एक डिग्री आती है... जाती है

काँग्रेसच्या प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी स्मृती इराणी यांच्या सीरियलमधल्या 'क्योंकी सास भी कभी बहु थी' या गाण्याची नक्कल करत स्मृती इराणी यांची खिल्ली उडवली.

'क्विालिफिकेशन के भी रूप बदलते है, नए नए सांचे में ढलते है, एक डिग्री आती है, एक डिग्री जाती है, बनते अॅफिडेव्हिट नए हैं' अशा सुरात आणि शब्दात प्रियांका चतुर्वेदी यांनी गाऊन दाखवलं.

उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस प्रवक्ते अंशु अवस्थी यांनीही स्मृती इराणी यांच्यावर टीका केली. स्मृती इराणी या लोकांशी आणि निवडणूक आयोगाशी पुन्हापुन्हा खोटं बोलत आहेत, असं ते म्हणाले. त्यांच्या उमेदवारी अर्जात त्यांच्या डिग्रीचं सत्य समोर आलं आहे, याची आठवण त्यांनी करून दिली.

'शिक्षणमंत्र्यांकडेच डिग्री नाही'

भाजपने स्मृती इराणींसारख्या नेत्याला मनुष्यबळ विकास मंत्री बनवलं. देशातल्या शिक्षणाची सूत्रं ज्यांच्याकडे आहेत त्यांच्या शिक्षणाबद्दलच खोटीनाटी माहिती दिली जाते हे आक्षेपार्ह आहे. स्मृती इराणी यांच्याकडे पदवी नाही हेच समोर आलं आहे. मोदींच्या न्यू इंडिया चं व्हिजन हेच आहे का, असा सवालही त्यांनी विचारला.

स्मृती इराणी या राहुल गांधींच्या विरोधात दुसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे काँग्रेसने त्यांना चांगलंच लक्ष्य केलं आहे.

=================================================================================================================================================================

VIDEO : मावळमध्ये पार्थची उमेदवारी रिस्क आहे का? अजित पवार म्हणतात...

First published: April 12, 2019, 6:43 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading