SIT चा कृपांवर ठपका

SIT चा कृपांवर ठपका

04 फेब्रुवारीमुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि काँग्रेस नेते कृपाशंकर सिंह यांच्यावर बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी एसआयटीने ठपका ठेवला आहे. हा अहवाल सोमवारीच सुप्रीम सादर करण्यात आला आहे. मुंबई पोलीस आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील एसआयटीनं हा अहवाल सादर केला आहेत. कृपाशंकर सिंह यांच्याकडे जाहीर केल्यापेक्षा जास्त मालमत्ता असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. हे प्रकरण उजेडात आल्यानंतर कृपाशंकर यांच्या मुंबईतल्या घरांवर धाडी टाकण्यात आल्या होत्या. त्यानंतर त्यांना मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून हटवण्यात आलं होतं. मात्र तरीही काँग्रेसने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केलेली नाही. आता कोर्टाकडून तरी कृपाशंकर सिंह यांच्याविरोधात कारवाई होईल अशी अपेक्षा विरोधी पक्षांनी व्यक्त केली आहे. सामाजिक कार्यकर्ते संजय तिवारी यांनी कृपाशंकर सिंह यांच्याविरोधात बेहिशेबी मालमत्तेसंबंधी याचिका दाखल केली होती. तिवारी यांच्या म्हणण्यानुसार कृपाशंकर यांच्याकडे काय काय संपत्ती आहे पाहूया....एवढी संपत्ती आली कुठून ?- विलेपार्ले : ज्युपिटर बिल्डिंगमध्ये 1355 स्क्वे.फू. आणि 550 स्क्वे.फू. असे दोन फ्लॅट्स- कार्टर रोड, वांद्रे : 4660 स्क्वे.फू. क्षेत्रफळाचा 'तरंग' बंगला- माऊंट मेरी रोड, वांद्रे : आलिशान फ्लॅट- टर्नर रोड, वांद्रे : 'अफेअर' या आलिशान बिल्डिंगमध्ये 2000 स्क्वे.फू. क्षेत्रफळाचा फ्लॅट- वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स : एचडीआयएल च्या कमर्शिअल कॉम्प्लेक्समध्ये 22500 स्क्वे.फू. क्षेत्रफळाचं ऑफिस- वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स : ट्रेड लिंक, वाधवा बिल्डिंगमध्ये 12000 स्क्वे.फू. क्षेत्रफळाचं ऑफिस- भांडुप पश्चिम : HDIL बिल्डिंगमध्ये दुकानं- सांताक्रूझमध्ये 8650 स्क्वे.फू. क्षेत्रफळाचा भूखंड- हिरानंदानी गार्डन्स, पवई : 700 स्क्वे.फू. क्षेत्रफळाचा फ्लॅट (मुख्यमंत्री कोटा)- हिरानंदानी गार्डन्स, पवई : 'गॅलेरिया' या आलिशान कमर्शिअल कॉम्प्लेक्समध्ये दोन व्यापारी गाळे- रत्नागिरी : 6 एकर भूखंड- जौनपूर, उत्तर प्रदेश : 8000 स्क्वे.फू. क्षेत्रफळाचा व्यापारी गाळा - पनवेल : 1100 स्क्वे.फू. क्षेत्रफळाचं दुकानकृपाशंकर सिंग यांच्याविरोधात 2011 मध्ये जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. कृपाशंकर यांच्यावर सुरू असलेल्या कारवाईच्या घडामोडींचा एक आढावा कारवाईचा घटनाक्रम- कृपाशंकर सिंह यांच्याविरोधात 2011 साली जनहित याचिका दाखल- संजय तिवारींनी दाखल केली याचिका- हायकोर्टाने 22 फेब्रुवारी 2012 ला गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले- मुंबई पोलिसांनी 23 फेब्रुवारी 2012 रोजी SIT ची स्थापना केली- 28 फेब्रुवारी 2012 रोजी निर्मल नगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला.- कृपाशंकर सिंग, पत्नी मालती देवी, मुलगा नरेंद्र कुमार मोहन सिंग, सून अंकिता नरेंद्र मोहन सिंग, मुलगी सुनिता विजयकुमार सिंग आणि जावई विजयकुमार बिजेंद्रप्रताप सिंग यांची गुन्ह्यात नावं आहेत- 2 मार्च 2012 रोजी कृपाशंकर यांची मालमत्ता जप्त करण्यात आली- 9 मार्च 2012 रोजी सुप्रीम कोर्टाने कृपाशंकर यांच्यावरील कारवाईला तात्पुरती स्थगिती दिली- 3 सप्टेंबर 2012 रोजी सुप्रीम कोर्टाने कृपाशंकर यांची याचिका फेटाळली, तपास सुरु ठेवण्याचे कोर्टाचे आदेश- 4 फेब्रुवारी 2013 ला SITनं अहवाल सादर केलाकृपाशंकर सिंह यांची राजकीय कारकिर्दकृपाशंकर सिंह...मुंबईतल्या उत्तरभारतीयांचे नेते अशी त्यांची ख्याती....प्रत्यक्षात मात्र वशिल्याची किंवा वादग्रस्त कामं दिल्लीश्वरांच्या मागं लागून चुटकीसरशी पूर्ण करणारा तिकडमबाज नेता...उत्तरप्रदेशातल्या जौनपूर जिल्ह्यातल्या सहोदरपूर मधून मुंबईमध्ये रोजीरोटीसाठी आलेले कृपाशंकर सिंह...आधी साधे काँग्रेसचे कार्यकर्ते बनले, त्यानंतर आमदारकी, राज्याचं गृहराज्यमंत्रीपद आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष, अशा कृपाशंकर सिंह यांचा राजकीय प्रवास...पण कांदा बटाटा विक्रेता मुंबई काँग्रेसचा अध्यक्ष होतो, तो कसा होतो, याची कथा फार सुरस आहे. काँग्रेसचे कार्यकर्ते बनताच कृपाशंकर सिंह यांनी इंदिरा गांधींशी जाणीवपूर्वक जवळीक साधली. इंदिरा गांधींच्या विश्वासातले महाराष्ट्रातले जे कोणी नेते होते, आपल्या मधुरवाणीने त्यांचा विश्वास आधी संपादन केला. तसेच दिल्लीतल्या उत्तरप्रदेशातल्या लॉबीला धरुन दिल्लीत उठबस सुरु केली. राजीव गांधींचे मुंबईतले विश्वासू कार्यकर्ता असा लौकिकही कृपाशंकर सिंह यांनी मिळवला होता. आधी शरद पवार आणि नंतर विलासरावांची मर्जी संपादन करुन, कृपाभैय्यांनी स्वतःची मंत्रिमंडळात वर्णी लावून घेतली. एव्हाना कृपाशंकर सिंह यांचं दिल्लीतलं प्रस्थ बरंच वाढलं होतं. मुंबईमध्ये गुरुदास कामत यांना टक्कर देणारा उत्तरभारतीय नेता, अशी नवी ओळख निर्माण करत दिल्लीतलं आपलं प्रस्थ वाढवलं. त्यामुळे 2007 च्या मुंबई महापालिकेतल्या पराभवानंतर काँग्रेसनं मुंबईची जबाबदारी कृपाभैय्यांकडे सोपवली. पक्षाचा वरिष्ठ नेता कसाही असो त्याचं लांगूनचालन करायचं...दिल्लीतल्या नेत्यांना उत्तरभारतीय लॉबीच्या माध्यमातून आपलंसं करायचं. आणि दिल्लीतल्या काँग्रेसच्या लहानमोठ्या नेत्यांना मायानगरी मुंबईचा चस्का लावायचा. त्यांची मुंबईतली सर्व व्यवस्था करायची...त्यात बेमालूमपणे आपली आणि आपल्या हितसंबंधातल्या लोकांची कामं उरकवून घ्यायची असा शिरस्ता कृपाशंकर सिंह यांचा राहिलाय.

  • Share this:

04 फेब्रुवारी

मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि काँग्रेस नेते कृपाशंकर सिंह यांच्यावर बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी एसआयटीने ठपका ठेवला आहे. हा अहवाल सोमवारीच सुप्रीम सादर करण्यात आला आहे. मुंबई पोलीस आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील एसआयटीनं हा अहवाल सादर केला आहेत. कृपाशंकर सिंह यांच्याकडे जाहीर केल्यापेक्षा जास्त मालमत्ता असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. हे प्रकरण उजेडात आल्यानंतर कृपाशंकर यांच्या मुंबईतल्या घरांवर धाडी टाकण्यात आल्या होत्या. त्यानंतर त्यांना मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून हटवण्यात आलं होतं. मात्र तरीही काँग्रेसने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केलेली नाही. आता कोर्टाकडून तरी कृपाशंकर सिंह यांच्याविरोधात कारवाई होईल अशी अपेक्षा विरोधी पक्षांनी व्यक्त केली आहे.

सामाजिक कार्यकर्ते संजय तिवारी यांनी कृपाशंकर सिंह यांच्याविरोधात बेहिशेबी मालमत्तेसंबंधी याचिका दाखल केली होती. तिवारी यांच्या म्हणण्यानुसार कृपाशंकर यांच्याकडे काय काय संपत्ती आहे पाहूया....

एवढी संपत्ती आली कुठून ?

- विलेपार्ले : ज्युपिटर बिल्डिंगमध्ये 1355 स्क्वे.फू. आणि 550 स्क्वे.फू. असे दोन फ्लॅट्स- कार्टर रोड, वांद्रे : 4660 स्क्वे.फू. क्षेत्रफळाचा 'तरंग' बंगला- माऊंट मेरी रोड, वांद्रे : आलिशान फ्लॅट- टर्नर रोड, वांद्रे : 'अफेअर' या आलिशान बिल्डिंगमध्ये 2000 स्क्वे.फू. क्षेत्रफळाचा फ्लॅट- वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स : एचडीआयएल च्या कमर्शिअल कॉम्प्लेक्समध्ये 22500 स्क्वे.फू. क्षेत्रफळाचं ऑफिस- वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स : ट्रेड लिंक, वाधवा बिल्डिंगमध्ये 12000 स्क्वे.फू. क्षेत्रफळाचं ऑफिस- भांडुप पश्चिम : HDIL बिल्डिंगमध्ये दुकानं- सांताक्रूझमध्ये 8650 स्क्वे.फू. क्षेत्रफळाचा भूखंड- हिरानंदानी गार्डन्स, पवई : 700 स्क्वे.फू. क्षेत्रफळाचा फ्लॅट (मुख्यमंत्री कोटा)- हिरानंदानी गार्डन्स, पवई : 'गॅलेरिया' या आलिशान कमर्शिअल कॉम्प्लेक्समध्ये दोन व्यापारी गाळे- रत्नागिरी : 6 एकर भूखंड- जौनपूर, उत्तर प्रदेश : 8000 स्क्वे.फू. क्षेत्रफळाचा व्यापारी गाळा - पनवेल : 1100 स्क्वे.फू. क्षेत्रफळाचं दुकान

कृपाशंकर सिंग यांच्याविरोधात 2011 मध्ये जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. कृपाशंकर यांच्यावर सुरू असलेल्या कारवाईच्या घडामोडींचा एक आढावा

कारवाईचा घटनाक्रम

- कृपाशंकर सिंह यांच्याविरोधात 2011 साली जनहित याचिका दाखल- संजय तिवारींनी दाखल केली याचिका- हायकोर्टाने 22 फेब्रुवारी 2012 ला गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले- मुंबई पोलिसांनी 23 फेब्रुवारी 2012 रोजी SIT ची स्थापना केली- 28 फेब्रुवारी 2012 रोजी निर्मल नगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला.- कृपाशंकर सिंग, पत्नी मालती देवी, मुलगा नरेंद्र कुमार मोहन सिंग, सून अंकिता नरेंद्र मोहन सिंग, मुलगी सुनिता विजयकुमार सिंग आणि जावई विजयकुमार बिजेंद्रप्रताप सिंग यांची गुन्ह्यात नावं आहेत- 2 मार्च 2012 रोजी कृपाशंकर यांची मालमत्ता जप्त करण्यात आली- 9 मार्च 2012 रोजी सुप्रीम कोर्टाने कृपाशंकर यांच्यावरील कारवाईला तात्पुरती स्थगिती दिली- 3 सप्टेंबर 2012 रोजी सुप्रीम कोर्टाने कृपाशंकर यांची याचिका फेटाळली, तपास सुरु ठेवण्याचे कोर्टाचे आदेश- 4 फेब्रुवारी 2013 ला SITनं अहवाल सादर केला

कृपाशंकर सिंह यांची राजकीय कारकिर्द

कृपाशंकर सिंह...मुंबईतल्या उत्तरभारतीयांचे नेते अशी त्यांची ख्याती....प्रत्यक्षात मात्र वशिल्याची किंवा वादग्रस्त कामं दिल्लीश्वरांच्या मागं लागून चुटकीसरशी पूर्ण करणारा तिकडमबाज नेता...उत्तरप्रदेशातल्या जौनपूर जिल्ह्यातल्या सहोदरपूर मधून मुंबईमध्ये रोजीरोटीसाठी आलेले कृपाशंकर सिंह...आधी साधे काँग्रेसचे कार्यकर्ते बनले, त्यानंतर आमदारकी, राज्याचं गृहराज्यमंत्रीपद आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष, अशा कृपाशंकर सिंह यांचा राजकीय प्रवास...पण कांदा बटाटा विक्रेता मुंबई काँग्रेसचा अध्यक्ष होतो, तो कसा होतो, याची कथा फार सुरस आहे.

काँग्रेसचे कार्यकर्ते बनताच कृपाशंकर सिंह यांनी इंदिरा गांधींशी जाणीवपूर्वक जवळीक साधली. इंदिरा गांधींच्या विश्वासातले महाराष्ट्रातले जे कोणी नेते होते, आपल्या मधुरवाणीने त्यांचा विश्वास आधी संपादन केला. तसेच दिल्लीतल्या उत्तरप्रदेशातल्या लॉबीला धरुन दिल्लीत उठबस सुरु केली. राजीव गांधींचे मुंबईतले विश्वासू कार्यकर्ता असा लौकिकही कृपाशंकर सिंह यांनी मिळवला होता. आधी शरद पवार आणि नंतर विलासरावांची मर्जी संपादन करुन, कृपाभैय्यांनी स्वतःची मंत्रिमंडळात वर्णी लावून घेतली. एव्हाना कृपाशंकर सिंह यांचं दिल्लीतलं प्रस्थ बरंच वाढलं होतं. मुंबईमध्ये गुरुदास कामत यांना टक्कर देणारा उत्तरभारतीय नेता, अशी नवी ओळख निर्माण करत दिल्लीतलं आपलं प्रस्थ वाढवलं. त्यामुळे 2007 च्या मुंबई महापालिकेतल्या पराभवानंतर काँग्रेसनं मुंबईची जबाबदारी कृपाभैय्यांकडे सोपवली.

पक्षाचा वरिष्ठ नेता कसाही असो त्याचं लांगूनचालन करायचं...दिल्लीतल्या नेत्यांना उत्तरभारतीय लॉबीच्या माध्यमातून आपलंसं करायचं. आणि दिल्लीतल्या काँग्रेसच्या लहानमोठ्या नेत्यांना मायानगरी मुंबईचा चस्का लावायचा. त्यांची मुंबईतली सर्व व्यवस्था करायची...त्यात बेमालूमपणे आपली आणि आपल्या हितसंबंधातल्या लोकांची कामं उरकवून घ्यायची असा शिरस्ता कृपाशंकर सिंह यांचा राहिलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 4, 2013 12:35 PM IST

ताज्या बातम्या