नवे मुख्यमंत्री संध्याकाळी ठरणार

5 डिसेंबर महाराष्ट्राच्या नव्या मुख्यंमंत्र्यांची घोषणा शुक्रवारी संध्याकाळी होणार आहे. शुक्रवारी सकाळी सोनिया गांधी आणि ए. के. अ‍ॅन्टोनी यांची मीटिंग झाली. मात्र या बैठकीनंतरही नव्या मुख्यमंत्र्यांची घोषणा होऊ शकली नाही. यासंदर्भातली घोषणा शुक्रवारी संध्याकाळी होणार असल्याचा खुलासा ए. के. अ‍ॅन्टोनी यांनी केला आहे.महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून अशोक चव्हाण यांची निवड होण्याची दाट शक्यता आहे. नव्या मुख्यमंत्र्याची निवडीसाठी गुरुवारी काँग्रेसच्या विधीमंडळ पक्षाची बैठक झाली. विलासराव देशमुखांनी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेस विधीमंडळ पक्षाचा नवा नेता निवडण्यासाठी विधानभवनात दुपारी उशीरा काँग्रेस आमदारांची बैठक सुरू झाली. परराष्ट्रमंत्री प्रणव मुखर्जी आणि संरक्षणमंत्री ए. के. अ‍ॅन्टोनी हे पक्ष निरीक्षक म्हणून उपस्थित होते. मुंबई, कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या आमदारांची त्यांनी स्वतंत्रपणे मुलाखत घेतली. काँग्रेच्या पदाधिकार्‍यांशीही त्यांनी चर्चा केली. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत सुरवातीला सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, बाळासाहेब विखे पाटील आणि नारायण राणे यांची नावं चर्चेत होती. नंतर मात्र चव्हाण आणि राणे यांच्यात चुरस राहिली. सूत्रांच्या सागंण्यानुसार अशोक चव्हाण यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं समजतंय. पण, याबाबतचा अंतिम निर्णय काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधीच घेतील, असं प्रणव मुखर्जी यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितलं. "सकाळी सोनिया गांधी यांना भेटून आम्ही बैठकीचा अहवाल देऊ. त्यानंतर त्या मुख्यमंत्र्याचं नाव निश्चित करतील" असं ते म्हणाले.शुक्रवारी सकाळी नव्या मुख्यमंत्र्याची घोषणा अधिकृत होण्याची शक्यता आहे. त्यानंतर राजभवनात शपथविधीही ताबडतोब होईल.

आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Updated On: Dec 5, 2008 04:09 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 5, 2008 04:09 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...