S M L

अंबानी बंधूंनी केजरीवालांचे आरोप फेटाळून लावले

09 नोव्हेंबरअरविंद केजरीवाल यांच्या आरोपानंतर रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी खुलासा केला. आयएसीनं रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि मुकेश अंबानी यांच्यावर केलेल्या आरोपांचं रिलायन्स खंडन करतं आहे. रिलायन्स किंवा मुकेश अंबानी यापैकी कुणाचंही जगात कुठेही बेकायदा खातं नाही. आमचे जगातल्या अनेक देशात उद्योग आहेत. त्याची उलाढाल हजारो कोटींमध्ये आहे. उद्योगाचा भाग म्हणून आम्हाला HSBCसारख्या अनेक जागतिक बँकेसोबत व्यवहार करावे लागतात. ही खाती नियमानुसार आहेत आणि संबंधित संस्थांकडे त्यांची माहितीही देण्यात आलीय. आमच्याविरोधात आएसीकडून सातत्यानं करण्यात येत असलेल्या आरोपांमागे हितसंबंध गुंतले असल्याचं दिसतंय. अनिल अंबानी तर अनिल अंबानी यांचं जिनेवातल्या HSBC बँकेत खातं नाही. आयएसीनं केलेले आधारहीन आरोप निषेधार्ह आहे. कुठल्यातरी हितसंबंधांतून हे आरोप करण्यात येत आहेत असं स्पष्टीकरण अनिल अंबानींनी केलंय. जेट एअरवेजनरेश गोएल यांच्या नावाचं खातं स्वीस बँकेत नाही. मेसर्स टेलविंड कंपनीसंबंधी सर्व माहिती सरकारच्या वेगवेगळ्या खात्यांकडे आहे. इन्कम टॅक्स विभागानं विचारलेल्या सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरं देण्यात आली आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 9, 2012 01:18 PM IST

अंबानी बंधूंनी केजरीवालांचे आरोप फेटाळून लावले

09 नोव्हेंबर

अरविंद केजरीवाल यांच्या आरोपानंतर रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी खुलासा केला. आयएसीनं रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि मुकेश अंबानी यांच्यावर केलेल्या आरोपांचं रिलायन्स खंडन करतं आहे. रिलायन्स किंवा मुकेश अंबानी यापैकी कुणाचंही जगात कुठेही बेकायदा खातं नाही. आमचे जगातल्या अनेक देशात उद्योग आहेत. त्याची उलाढाल हजारो कोटींमध्ये आहे. उद्योगाचा भाग म्हणून आम्हाला HSBCसारख्या अनेक जागतिक बँकेसोबत व्यवहार करावे लागतात. ही खाती नियमानुसार आहेत आणि संबंधित संस्थांकडे त्यांची माहितीही देण्यात आलीय. आमच्याविरोधात आएसीकडून सातत्यानं करण्यात येत असलेल्या आरोपांमागे हितसंबंध गुंतले असल्याचं दिसतंय.

अनिल अंबानी तर अनिल अंबानी यांचं जिनेवातल्या HSBC बँकेत खातं नाही. आयएसीनं केलेले आधारहीन आरोप निषेधार्ह आहे. कुठल्यातरी हितसंबंधांतून हे आरोप करण्यात येत आहेत असं स्पष्टीकरण अनिल अंबानींनी केलंय. जेट एअरवेजनरेश गोएल यांच्या नावाचं खातं स्वीस बँकेत नाही. मेसर्स टेलविंड कंपनीसंबंधी सर्व माहिती सरकारच्या वेगवेगळ्या खात्यांकडे आहे. इन्कम टॅक्स विभागानं विचारलेल्या सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरं देण्यात आली आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 9, 2012 01:18 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close