व्हिसलब्लोअर्सना संरक्षण द्या : हायकोर्ट

व्हिसलब्लोअर्सना संरक्षण द्या : हायकोर्ट

01 नोव्हेंबरव्हिसलब्लोअर्सना संरक्षण देण्याच्या आदेशांकडे दुर्लक्ष केल्यामुळे हायकोर्टाने राज्य सरकारला चांगलेच फटकारले आहे. आरटीआय कार्यकर्ते सतीश शेट्टींच्या हत्येनंतर व्हिसलब्लोअर्सच्या संरक्षणासाठी हायकोर्टाने राज्य सरकारला काही सूचना दिल्या होत्या. आरटीआय कार्यकर्त्यांच्या संरक्षणाबाबत उपाय सुचवण्यासाठी एक समिती नेमावी, असे आदेश हायकोर्टाने दिले होते. कार्यकर्त्यांना धमक्या येत असतील तर पोलीस संरक्षण देण्याच्याही सूचना हायकोर्टाने केल्या होत्या. पण सरकारने मात्र त्यावर काहीच पावलं उचलली नाहीत. सरकार अजून कशाची वाट बघतंय, असं संतप्त सवाल हायकोर्टाने विचारला आहे. व्हिसलब्लोअर्सना संरक्षण द्या आणि 2010 ला दिलेल्या आदेशांचं पालन करा असे नव्यानं आदेश हायकोर्टाने सरकारला दिले आहे.

  • Share this:

01 नोव्हेंबर

व्हिसलब्लोअर्सना संरक्षण देण्याच्या आदेशांकडे दुर्लक्ष केल्यामुळे हायकोर्टाने राज्य सरकारला चांगलेच फटकारले आहे. आरटीआय कार्यकर्ते सतीश शेट्टींच्या हत्येनंतर व्हिसलब्लोअर्सच्या संरक्षणासाठी हायकोर्टाने राज्य सरकारला काही सूचना दिल्या होत्या. आरटीआय कार्यकर्त्यांच्या संरक्षणाबाबत उपाय सुचवण्यासाठी एक समिती नेमावी, असे आदेश हायकोर्टाने दिले होते. कार्यकर्त्यांना धमक्या येत असतील तर पोलीस संरक्षण देण्याच्याही सूचना हायकोर्टाने केल्या होत्या. पण सरकारने मात्र त्यावर काहीच पावलं उचलली नाहीत. सरकार अजून कशाची वाट बघतंय, असं संतप्त सवाल हायकोर्टाने विचारला आहे. व्हिसलब्लोअर्सना संरक्षण द्या आणि 2010 ला दिलेल्या आदेशांचं पालन करा असे नव्यानं आदेश हायकोर्टाने सरकारला दिले आहे.

First published: November 1, 2012, 3:15 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading