सत्यदेव दुबे, गजानन परांजपे : यंदाच्या ' तन्वीर पुरस्कार 'चे मानकरी

2 डिसेंबर, पुणेस्नेहल शास्त्री डॉ. श्रीराम लागू यांचा दिवंगत मुलगा तन्वीर याच्या स्मरणार्थ दरवर्षी 9 डिसेंबरला तन्वीर पुरस्कार दिला जातो. यावर्षी ' तन्वीर सन्माना 'साठी ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शक सत्यदेव दुबे तर ' तन्वीर नाट्यकर्मी ' पुरस्कारासाठी ज्येष्ठ अभिनेते गजानन परांजपे यांची निवड झालीये. नाट्यक्षेत्रातल्या भरीव कामगिरीसाठी तन्वीर सन्मान दिला जातो. यापूर्वी रंगकर्मी चेतन दातार, रामू रामनाथन, संजना कपूर हे या ' तन्वीर सन्मान 'चे मानकरी ठरले आहेत. यावर्षी या पुरस्कार सोहळ्याला नाटककार श्री. गो.पु. देशपांडे , गोविंद निहलानी, डॉ. श्रीधर कुलकर्णी येणार आहेत.

आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Updated On: Dec 2, 2008 05:31 AM IST

सत्यदेव दुबे, गजानन परांजपे : यंदाच्या ' तन्वीर पुरस्कार 'चे मानकरी

2 डिसेंबर, पुणेस्नेहल शास्त्री डॉ. श्रीराम लागू यांचा दिवंगत मुलगा तन्वीर याच्या स्मरणार्थ दरवर्षी 9 डिसेंबरला तन्वीर पुरस्कार दिला जातो. यावर्षी ' तन्वीर सन्माना 'साठी ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शक सत्यदेव दुबे तर ' तन्वीर नाट्यकर्मी ' पुरस्कारासाठी ज्येष्ठ अभिनेते गजानन परांजपे यांची निवड झालीये. नाट्यक्षेत्रातल्या भरीव कामगिरीसाठी तन्वीर सन्मान दिला जातो. यापूर्वी रंगकर्मी चेतन दातार, रामू रामनाथन, संजना कपूर हे या ' तन्वीर सन्मान 'चे मानकरी ठरले आहेत. यावर्षी या पुरस्कार सोहळ्याला नाटककार श्री. गो.पु. देशपांडे , गोविंद निहलानी, डॉ. श्रीधर कुलकर्णी येणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 2, 2008 05:31 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...