वसई-विरार मॅरेथॉनमध्ये आशिष चौहानने मारली बाजी

14 ऑक्टोबरवसई-विरार महापालिकेची दुसरी राष्ट्रीय स्तरावरील महापौर मॅरेथॉन आज आयोजित करण्यात आली होती. हाफ मॅरेथॉनमध्ये पुरुष गटात आशिष सिंग चौहान तर महिला गटात कविता राऊतनं बाजी मारली. अनेक सेलिब्रिटींनी आज या मॅरेथॉनला हजेरी लावली होती.अभिनेता रितेश देशमुख बरोबर मराठी इंडस्ट्रीतले अनेक कलाकारही या मॅरेथॉनसाठी हजर होते. पण या मॅरेथॉनचं प्रमुख आकर्षण होता तो ऑलिम्पिक सिल्व्हर मेडल विजेता आणि या मॅरेथॉनचा ब्रँड ऍम्बेसेडर सुशील कुमार..जवळपास 10 हजार स्पर्धक या मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले होते.

आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Updated On: Oct 14, 2012 11:24 AM IST

वसई-विरार मॅरेथॉनमध्ये आशिष चौहानने मारली बाजी

14 ऑक्टोबर

वसई-विरार महापालिकेची दुसरी राष्ट्रीय स्तरावरील महापौर मॅरेथॉन आज आयोजित करण्यात आली होती. हाफ मॅरेथॉनमध्ये पुरुष गटात आशिष सिंग चौहान तर महिला गटात कविता राऊतनं बाजी मारली. अनेक सेलिब्रिटींनी आज या मॅरेथॉनला हजेरी लावली होती.अभिनेता रितेश देशमुख बरोबर मराठी इंडस्ट्रीतले अनेक कलाकारही या मॅरेथॉनसाठी हजर होते. पण या मॅरेथॉनचं प्रमुख आकर्षण होता तो ऑलिम्पिक सिल्व्हर मेडल विजेता आणि या मॅरेथॉनचा ब्रँड ऍम्बेसेडर सुशील कुमार..जवळपास 10 हजार स्पर्धक या मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 14, 2012 11:24 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...