मुख्यमंत्र्यांमुळे अजित पवारांचा 'नाराजी'नामा

मुख्यमंत्र्यांमुळे अजित पवारांचा 'नाराजी'नामा

26 एप्रिलसिंचन विभागातल्या भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून अजित पवारांनी राजीनामा दिला आहे पण त्यांची नाराजी ही मुख्यत: मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावरच आहे. मेरीचे चीफ इंजिनिअर विजय पांढरे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रावर मुख्यमंत्र्यंानी परस्पर चौकशीचे आदेश दिल्यानं अजित पवार आणि राष्ट्रवादीचे नेते नाराज आहेत. मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांना याबाबत चौकशी करण्याचे आदेश दिले होते. पांढरे यांनी सिंचन विभागातल्या गैरकारभाराबाबत राज्यपाल, मुख्यमंत्री आणि जलसंपदा विभागाच्या सचिवांना 20 फेब्रुवारीला पत्र लिहिले होते. तशाच प्रकराचं पत्र त्यांनी 5 मे रोजीही लिहिले. त्याबाबत मुख्यमंत्र्यांनी अजित पवार आणि जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांच्याशी चर्चा केली नाही तसेच त्यांना विश्वासातही घेतली नाही.नेमक्या कोणत्या कारणांमुळे अजित पवार मुख्यमंत्र्यांवर वैतागले आहेत ती कारणं पाहूयात.. - राज्य शिखर बँकेचं संचालक मंडळ मुख्यमंत्र्यांनी बरखास्त केलं- अजित पवार होते शिखर बँकेच्या बरखास्त झालेल्या संचालक मंडळावर- राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या सहा जिल्हा बँका अडचणीत- 551 कोटी रुपयांचा समभाग द्यायला मुख्यमंत्र्यांची चालढकल- सिंचन श्वेतपत्रिकेची घोषणा करून मुख्यमंत्र्यांनी केली राष्ट्रवादीची कोंडी- सिंचन खात्यातला गैरव्यवहार बाहेर आल्यामुळे राष्ट्रवादीची प्रतिमा डागाळली- विजय पांढरेंच्या तक्रार पत्रांवर मुख्यमंत्र्यांनी परस्पर दिले चौकशीचे आदेश- महाराष्ट्र सदन घोटाळ्याच्या खुल्या चौकशीची मुख्यमंत्र्यांनी दाखवली तयारी- पवारांची संकल्पना असलेल्या लवासा कॉर्पोरेशनवर फौजदारी कारवाईची शक्यता- IPS अधिकार्‍यांच्या बदल्या आणि एकंदरीतच गृह खात्यात मुख्यमंत्र्यांचा वाढता हस्तक्षेप- सिंचनापाठोपाठ आता ऊर्जा खातं मुख्यमंत्र्यांच्या निशाण्यावर येण्याची शक्यता

  • Share this:

26 एप्रिल

सिंचन विभागातल्या भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून अजित पवारांनी राजीनामा दिला आहे पण त्यांची नाराजी ही मुख्यत: मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावरच आहे. मेरीचे चीफ इंजिनिअर विजय पांढरे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रावर मुख्यमंत्र्यंानी परस्पर चौकशीचे आदेश दिल्यानं अजित पवार आणि राष्ट्रवादीचे नेते नाराज आहेत. मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांना याबाबत चौकशी करण्याचे आदेश दिले होते. पांढरे यांनी सिंचन विभागातल्या गैरकारभाराबाबत राज्यपाल, मुख्यमंत्री आणि जलसंपदा विभागाच्या सचिवांना 20 फेब्रुवारीला पत्र लिहिले होते. तशाच प्रकराचं पत्र त्यांनी 5 मे रोजीही लिहिले. त्याबाबत मुख्यमंत्र्यांनी अजित पवार आणि जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांच्याशी चर्चा केली नाही तसेच त्यांना विश्वासातही घेतली नाही.

नेमक्या कोणत्या कारणांमुळे अजित पवार मुख्यमंत्र्यांवर वैतागले आहेत ती कारणं पाहूयात..

- राज्य शिखर बँकेचं संचालक मंडळ मुख्यमंत्र्यांनी बरखास्त केलं- अजित पवार होते शिखर बँकेच्या बरखास्त झालेल्या संचालक मंडळावर- राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या सहा जिल्हा बँका अडचणीत- 551 कोटी रुपयांचा समभाग द्यायला मुख्यमंत्र्यांची चालढकल- सिंचन श्वेतपत्रिकेची घोषणा करून मुख्यमंत्र्यांनी केली राष्ट्रवादीची कोंडी- सिंचन खात्यातला गैरव्यवहार बाहेर आल्यामुळे राष्ट्रवादीची प्रतिमा डागाळली- विजय पांढरेंच्या तक्रार पत्रांवर मुख्यमंत्र्यांनी परस्पर दिले चौकशीचे आदेश- महाराष्ट्र सदन घोटाळ्याच्या खुल्या चौकशीची मुख्यमंत्र्यांनी दाखवली तयारी- पवारांची संकल्पना असलेल्या लवासा कॉर्पोरेशनवर फौजदारी कारवाईची शक्यता- IPS अधिकार्‍यांच्या बदल्या आणि एकंदरीतच गृह खात्यात मुख्यमंत्र्यांचा वाढता हस्तक्षेप- सिंचनापाठोपाठ आता ऊर्जा खातं मुख्यमंत्र्यांच्या निशाण्यावर येण्याची शक्यता

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 26, 2012 08:03 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading