वसंत ढोबळेंचा धडाका ; बेकायदेशीर स्टॉलवर कारवाई

22 सप्टेंबरएसीपी वसंत ढोबळे यांची क्राईम ब्रँचमधून वाकोला विभागाच्या सहाय्यक आयुक्त पदी नियुक्ती झाली. आणि याठिकाणी येताच ढोबळे यांनी पुन्हा कारवाईला सुरुवात केलीय. यावेळी त्यांची कारवाई रस्त्यावर बेकायदेशीर अन्नपदार्थ विकणार्‍या तसेच त्यासाठी घरगुती गॅसचा वापर करणार्‍यांविरोधात सुरू आहे. फूटपाथवर चालणार्‍यांना अडथळा करणं, रस्त्यावर अन्न शिजवणं आणि ते विकणं हा कायद्याने गुन्हा आहे. या कायद्यांची अंमलबजावणी करायला ढोबळेंनी सुरुवात केली आहे. त्यानुसार त्यांनी चहाचे स्टॉल, पावभाजी केंद्र, वडापावची गाडी, पानवाले यांच्या विरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. त्यानुसार वाकोला तसेच विलेपार्ले पोलिसांनी गेल्या दोन दिवसांत 16 स्टॉल धारकांवर कारवाई केली आहे. यावेळी घरगुती गॅसही जप्त करण्यात आलेत. हे गॅस काळ्या बाजारात मिळत असल्याचं उघडकीला आलंय. वसंत ढोबळे ही क्राईम ब्रँच मध्ये समाजसेवा शाखेच्या सहाय्यक पोलीस आयुक्त असताना त्यांनी उशिरा पर्यत चालणार्‍या बारवर कारवाई केली होती. बारचं नव्हे तर पब वेशा व्यवसाय चालवणारे दलाल तसेच बालकामगार ठेवणार्‍या मालकांवर कारवाई केली होती. त्यांच्या कारवाईला शहरभरातून कुठे विरोध होत होता तर कुठे पाठिंबा मिळत होता. मात्र, त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. त्यांची नियुक्ती आता वाकोला विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त पदी करण्यात आली आहे.मात्र, या ठिकाणी आल्यावर हि त्यांची कारवाई सुरुच आहे.

आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Updated On: Sep 22, 2012 02:33 PM IST

वसंत ढोबळेंचा धडाका ; बेकायदेशीर स्टॉलवर कारवाई

22 सप्टेंबर

एसीपी वसंत ढोबळे यांची क्राईम ब्रँचमधून वाकोला विभागाच्या सहाय्यक आयुक्त पदी नियुक्ती झाली. आणि याठिकाणी येताच ढोबळे यांनी पुन्हा कारवाईला सुरुवात केलीय. यावेळी त्यांची कारवाई रस्त्यावर बेकायदेशीर अन्नपदार्थ विकणार्‍या तसेच त्यासाठी घरगुती गॅसचा वापर करणार्‍यांविरोधात सुरू आहे.

फूटपाथवर चालणार्‍यांना अडथळा करणं, रस्त्यावर अन्न शिजवणं आणि ते विकणं हा कायद्याने गुन्हा आहे. या कायद्यांची अंमलबजावणी करायला ढोबळेंनी सुरुवात केली आहे. त्यानुसार त्यांनी चहाचे स्टॉल, पावभाजी केंद्र, वडापावची गाडी, पानवाले यांच्या विरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. त्यानुसार वाकोला तसेच विलेपार्ले पोलिसांनी गेल्या दोन दिवसांत 16 स्टॉल धारकांवर कारवाई केली आहे. यावेळी घरगुती गॅसही जप्त करण्यात आलेत. हे गॅस काळ्या बाजारात मिळत असल्याचं उघडकीला आलंय.

वसंत ढोबळे ही क्राईम ब्रँच मध्ये समाजसेवा शाखेच्या सहाय्यक पोलीस आयुक्त असताना त्यांनी उशिरा पर्यत चालणार्‍या बारवर कारवाई केली होती. बारचं नव्हे तर पब वेशा व्यवसाय चालवणारे दलाल तसेच बालकामगार ठेवणार्‍या मालकांवर कारवाई केली होती. त्यांच्या कारवाईला शहरभरातून कुठे विरोध होत होता तर कुठे पाठिंबा मिळत होता. मात्र, त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. त्यांची नियुक्ती आता वाकोला विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त पदी करण्यात आली आहे.मात्र, या ठिकाणी आल्यावर हि त्यांची कारवाई सुरुच आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 22, 2012 02:33 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...