भारत - इस्रायलची गायब झालेली फाईल वेटरने दिली आणून

भारत - इस्रायलची गायब झालेली फाईल वेटरने दिली आणून

भारत आणि इस्रायलमधल्या लष्करी व्यवहाराची एक फाइल गायब झाली होती. ही फाईल एका वेटरच्या हाती लागली आणि त्याने ती दूतावासात आणून दिली.

  • Share this:

नवी दिल्ली, ३ एप्रिल : भारत आणि फ्रान्समध्ये राफेल विमानांबद्दल झालेल्या व्यवहारावरून बराच गदारोळ झाला.राफेलची कागदपत्रं गायब झाली की नाही याबद्दल बरीच चर्चा झाली आणि गोंधळ उडाला.

या सगळ्या प्रकरणानंतर आता आणखी एक संरक्षणविषयक फाइल गायब झाल्याचं प्रकरण समोर आलं आहे पण एका वेटरच्या हुशारीमुळे ही कागदपत्रं सापडली.

भारत आणि इस्रायलमधल्या लष्करी व्यवहाराची एक फाइल गायब झाली होती हे पीटीआय ने दिलेल्या एका बातमीमध्ये हे समोर आलं आहे.

यावर्षीच्या जानेवारी महिन्यात इस्रायली अधिकारी मेर बेन शब्बात हे राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या काही सदस्यांसोबत भारतात आले होते. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचीही भेट घेतली. इस्रायलमधल्या एका वृत्तपत्रात या बैठकीची बातमी आली होती. या बैठकीत भारत आणि इस्रायलमधल्या शस्त्रास्त्र खरेदी व्यवहाराची चर्चा झाली.

इस्रायलशी केलेल्या या शस्त्रास्त्र व्यवहारात टोही विमान, ड्रोन विमान, रणगाडे भेदणारं क्षेपणास्त्रं, तोफा तसंच रडार प्रणालीचा समावेश आहे.

शब्बात यांच्या सहकाऱ्यांनी या शस्त्रास्त्र व्यवहाराची कागदपत्रं गोपनीय ठेवली होती. हे प्रतिनिधी विमानात चढण्यापूर्वी एका रेस्टॉरंटमध्ये गेले आणि ही कागदपत्रं तिथेच राहिली.

हे सगळे अधिकारी हॉटेलमधून निघून गेल्यानंतर त्या हॉटेलमधल्या एका वेटरला ही कागदपत्रं मिळाली. योगायोग म्हणजे या वेटरच्या मित्राची आई इस्रायली दूतावासात काम करत होती. वेटरने मित्राला फोन केला आणि हे कागद इस्रायली दूतावासात पोहोचवले.

संरक्षण व्यवहाराची ही महत्त्वाची कागदपत्रं अशा पद्धतीने इस्रायली सुरक्षा अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचली. या सगळ्या प्रकरणात शब्बात यांच्या हलगर्जीपणाबद्दल त्यांना दोषी ठरवण्यात आलं आहे पण ही कागदपत्रं सुरक्षित ठेवल्याबदद्ल या वेटरचे आभार मानले जात आहेत.

===========================================================================================================================================================

VIDEO : 'लकडी की काठी, काठी पे घोडा', उर्मिलाचा असाही प्रचार!

First published: April 3, 2019, 8:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading