'भारत बंद'ने काय साधलं ?

20 सप्टेंबरथेट परकीय गुंतवणूक, डिझेल दरवाढ आणि घरगुती गॅस सिलेंडरच्या सबसिडीवर घातलेली मर्यादा या निर्णयाविरोधात भारत बंद पुकारण्यात आला होता. एनडीए सोबतच समाजवादी पक्ष आणि डाव्या पक्षांनीही हा बंद पुकारला होता. दिल्लीत जंतर-मंतरवर भाजपच्या व्यासपीठावरून डाव्या पक्षांनी सरकारविरोधात निदर्शनं केली. त्यानंतर मुलायम सिंह यादव यांनी डाव्या पक्षांच्या नेत्यांबरोबर संसद मार्ग पोलीस स्टेशनवर मोर्चा काढून अटक करवून घेतली. या बंदमुळे राजधानी दिल्लीतली अनेक बाजार बंद होते. रस्त्यावर काही काळ वाहतुकीची कोंडीही झाली होती. पण महाराष्ट्रात बंदला समिश्र प्रतिसाद मिळाला. मुंबई,पुण्यात अगोदरच शिवसेना,मनसे,भाजपने सहभागी होणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं. एकीकडे गणेशोत्सव आणि त्यात बंद करुन काय साधायचं हाच प्रश्न राज्यातील पक्षांनी उपस्थित केला होता. या बंदमुळे कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री म्हणजेच CIIनुसार आजच्या भारत बंदमुळे देशाचं 12 हजार 500 कोटी रुपयांचं नुकसान झालंय. उत्तरप्रदेश,छत्तीसगढमध्ये कडकडीत बंदउत्तर भारताला बंदचा सर्वात जास्त फटका बसला. हिमाचल प्रदेशात मात्र कडकडीत बंद पाळण्यात आला. दुपारनंतर रस्त्यावर थोडी वर्दळ दिसली.राजस्थानातही बंदचा परिणाम जाणवला. काही दुकानं आणि बँका जबरदस्तीनं बंद करण्यात आल्या. पंजाब आणि हरियाणामध्ये बंदचा संमिश्र प्रतिसाद दिसला. चंदिगड, अमृतसर आणि अंबालामध्ये काही ठिकाणी तुरळक हिंसक घटना घडल्या. दुपारनंतर दुकानं सुरू करण्यात आली. मध्य भारतात मात्र बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. इंदूर वगळता संपूर्ण मध्यप्रदेशात व्यवहार सुरळीत सुरू होते. पण शेजारच्या छत्तीसगढमध्ये 100 टक्के बंद शांततेत पाळण्यात आला. बिहारमध्ये रेल रोको करण्यात आला. दुकानंही बंद होती. झारखंडमध्येही पूर्ण बंद पाळण्यात आला. राजकीय नेत्यांनी अटकही करवून घेतली. गुजरातमध्येही सर्व दुकानं बंद होती. त्यामुळे बंद यशस्वी झाला. पण वाहतूक सुरळीत सुरू होती. ओडिशामध्ये बिजू जनता दलानं बंदला पाठिंबा दिलेला नसला तरी राज्यात बंद यशस्वी झाला. दक्षिण भारतात बंदचा सर्वात जास्त फटका कर्नाटकला बसला. बंगळुरूमध्ये सर्व ऑफिसेस बंद होती. पण शेजारच्या तामिळनाडूमध्ये बंदला अगदीच तुरळक प्रतिसाद मिळाला.या बंदमुळे देशाचं किती आर्थिक नुकसान झालं ?कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री म्हणजेच CIIनुसार आजच्या भारत बंदमुळे देशाचं 12 हजार 500 कोटी रुपयांचं नुकसान झालंय. तर उद्योजकांची आणखी एक संघटना असलेल्या असोचॅमच्या मते या बंदमुळे भारताचं दहा हजार कोटी रुपयांचं नुकसान झालंय. पण भारत सरकारनं नुकसानीचा आकडा इतका मोठा नसल्याचं म्हटलंय. विरोधकांच्या आजच्या भारत बंदमुळे देशाचं दोन हजार कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचं अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी म्हटलं आहे. एनडीएनं दरवाढीविरोधात हा दुसर्‍यावेळी पुकारलेला बंद आहे. मागच्या दरवाढीला कडकडीत बंद पाळण्यात आला पण यावेळी दरवाढीविरोधापेक्षा यूपीएविरोधात विरोधक रस्त्यावर उतरल्याचं दिसून आलं. यातच मुलायम सिंग यादव यांनी यूपीएला इशारा देत तिसर्‍या आघाडीचे संकेत दिले त्यामुळे 'एनडीए'नं 'भारत बंद' करुन काय सांधलं असा सवाल जनता विचारत आहे.

आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Updated On: Sep 20, 2012 04:43 PM IST

'भारत बंद'ने काय साधलं ?

20 सप्टेंबर

थेट परकीय गुंतवणूक, डिझेल दरवाढ आणि घरगुती गॅस सिलेंडरच्या सबसिडीवर घातलेली मर्यादा या निर्णयाविरोधात भारत बंद पुकारण्यात आला होता. एनडीए सोबतच समाजवादी पक्ष आणि डाव्या पक्षांनीही हा बंद पुकारला होता. दिल्लीत जंतर-मंतरवर भाजपच्या व्यासपीठावरून डाव्या पक्षांनी सरकारविरोधात निदर्शनं केली. त्यानंतर मुलायम सिंह यादव यांनी डाव्या पक्षांच्या नेत्यांबरोबर संसद मार्ग पोलीस स्टेशनवर मोर्चा काढून अटक करवून घेतली. या बंदमुळे राजधानी दिल्लीतली अनेक बाजार बंद होते. रस्त्यावर काही काळ वाहतुकीची कोंडीही झाली होती. पण महाराष्ट्रात बंदला समिश्र प्रतिसाद मिळाला. मुंबई,पुण्यात अगोदरच शिवसेना,मनसे,भाजपने सहभागी होणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं. एकीकडे गणेशोत्सव आणि त्यात बंद करुन काय साधायचं हाच प्रश्न राज्यातील पक्षांनी उपस्थित केला होता. या बंदमुळे कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री म्हणजेच CIIनुसार आजच्या भारत बंदमुळे देशाचं 12 हजार 500 कोटी रुपयांचं नुकसान झालंय.

उत्तरप्रदेश,छत्तीसगढमध्ये कडकडीत बंद

उत्तर भारताला बंदचा सर्वात जास्त फटका बसला. हिमाचल प्रदेशात मात्र कडकडीत बंद पाळण्यात आला. दुपारनंतर रस्त्यावर थोडी वर्दळ दिसली.राजस्थानातही बंदचा परिणाम जाणवला. काही दुकानं आणि बँका जबरदस्तीनं बंद करण्यात आल्या. पंजाब आणि हरियाणामध्ये बंदचा संमिश्र प्रतिसाद दिसला. चंदिगड, अमृतसर आणि अंबालामध्ये काही ठिकाणी तुरळक हिंसक घटना घडल्या. दुपारनंतर दुकानं सुरू करण्यात आली. मध्य भारतात मात्र बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. इंदूर वगळता संपूर्ण मध्यप्रदेशात व्यवहार सुरळीत सुरू होते.

पण शेजारच्या छत्तीसगढमध्ये 100 टक्के बंद शांततेत पाळण्यात आला. बिहारमध्ये रेल रोको करण्यात आला. दुकानंही बंद होती. झारखंडमध्येही पूर्ण बंद पाळण्यात आला. राजकीय नेत्यांनी अटकही करवून घेतली. गुजरातमध्येही सर्व दुकानं बंद होती. त्यामुळे बंद यशस्वी झाला. पण वाहतूक सुरळीत सुरू होती. ओडिशामध्ये बिजू जनता दलानं बंदला पाठिंबा दिलेला नसला तरी राज्यात बंद यशस्वी झाला. दक्षिण भारतात बंदचा सर्वात जास्त फटका कर्नाटकला बसला. बंगळुरूमध्ये सर्व ऑफिसेस बंद होती. पण शेजारच्या तामिळनाडूमध्ये बंदला अगदीच तुरळक प्रतिसाद मिळाला.या बंदमुळे देशाचं किती आर्थिक नुकसान झालं ?कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री म्हणजेच CIIनुसार आजच्या भारत बंदमुळे देशाचं 12 हजार 500 कोटी रुपयांचं नुकसान झालंय. तर उद्योजकांची आणखी एक संघटना असलेल्या असोचॅमच्या मते या बंदमुळे भारताचं दहा हजार कोटी रुपयांचं नुकसान झालंय. पण भारत सरकारनं नुकसानीचा आकडा इतका मोठा नसल्याचं म्हटलंय. विरोधकांच्या आजच्या भारत बंदमुळे देशाचं दोन हजार कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचं अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी म्हटलं आहे.

एनडीएनं दरवाढीविरोधात हा दुसर्‍यावेळी पुकारलेला बंद आहे. मागच्या दरवाढीला कडकडीत बंद पाळण्यात आला पण यावेळी दरवाढीविरोधापेक्षा यूपीएविरोधात विरोधक रस्त्यावर उतरल्याचं दिसून आलं. यातच मुलायम सिंग यादव यांनी यूपीएला इशारा देत तिसर्‍या आघाडीचे संकेत दिले त्यामुळे 'एनडीए'नं 'भारत बंद' करुन काय सांधलं असा सवाल जनता विचारत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 20, 2012 04:43 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...