रामगोपाल वर्मा यांना सोबत घेऊन गेलो नाही- मुख्यमंत्री

30 नोव्हेंबर मुंबईमुख्यमंत्री विलासराव देशमुख जेव्हा ताज हॉटेलची पाहणी करण्यासाठी गेले त्यावेळी त्यांच्यासोबत सिने निर्माते रामगोपाल वर्मा होते. तसेच त्यांची दोन्ही मुलं त्याच्यासोबत होती.अशाप्रकारे मुख्यमंत्र्यांनी ताजमध्ये आपल्यासोबत सिनेनिर्माते, कलाकारांना नेणं हे राजशिष्टाचारांच्या विरुद्ध होतं. ही घटना जेव्हा सर्वसामान्यापर्यंत पोहचली. त्यावेळी नागरिकांकडून मुख्यमंत्र्याच्या या कृतीचा निषेध करण्यात आला. स्वत: रतन टाटा यांनी ताजची पाहणी केली. त्यावेळी त्यांनी फक्त बाहेरून चौकशी केली. पण मुख्यमंत्र्यांनी घरची सहल असल्याप्रमाणे सिनेकलाकारांसोबत पाहणी केली. त्यामुळे दोन दिवसांपूर्वीच्या घटनांचं राज्याच्या मुख्यमंत्र्यांना काही दु:ख राहिलेलं दिसतं नाही.अशीच भावना सर्व नागरिकांकडून व्यक्त होत आहे. खरंच राजकारण्यांच्या अशा बेजबाबदार वागण्यामुळेच राज्याची, देशाची हानी होत आहे अशी प्रतिक्रिया सर्वत्र उमटत आहे. परंतु या घटनेबाबत मुंख्यमंत्री विलासराव देशमुखांना पत्रकारांनी विचारलं असता ते म्हणाले, मी रामगोपाल वर्मा यांना सोबत घेऊन गेलो नव्हतो. तर ते स्वत:च त्या परिसराची पाहणी करण्यासाठी तेथे आले होते. पाहणी करताना अनेक अधिकारी, वरिष्ठ पोलीस अधिकारी होते त्यामुळे सिक्युरिटीबाबत कोणताच प्रश्न उद्भवत नाही. आपल्या राजीनाम्याबाबतचा प्रश्न त्यांनी हसत हसत टाळला. माझ्या राजीनाम्याबद्दल माझ्यापेक्षा मीडियालाच माहिती जास्त आहे असं ते पुढे म्हणाले

  • Share this:

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 30, 2008 04:20 PM IST

ताज्या बातम्या