TikTok स्टारची हत्या, व्हिडिओ शूट करताना झाडल्या गोळ्या

TikTok स्टारची हत्या, व्हिडिओ शूट करताना झाडल्या गोळ्या

मोहित नेहमी TikTokवर व्हिडिओ बनवायचा. TikTokवर त्याचे लाखो फॉलोअर्स आहे. असाच एक व्हिडिओ तयार करताना त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या आहेत.

  • Share this:

बहादूरगड (हरियाणा)21 मे : 'TikTok' वर व्हिडिओ बनवणाऱ्या एका तरुणाची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. तरुण TikTokवर व्हिडिओ बनवत असतानाच त्याच्यावर अज्ञातांनी गोळी झाडली. गंभीर जखम झाल्यामुळे तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मोहित मोर असं मृत तरुणाचं नाव आहे. मोहित नेहमी TikTokवर व्हिडिओ बनवायचा. TikTokवर त्याचे लाखो फॉलोअर्स आहे. असाच एक व्हिडिओ तयार करताना त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. या सगळा धक्कादायक प्रकार हरियाणाच्या बहादूरगडमध्ये घडला आहे.

मोहितचा फोटो स्डुडिओ होता. त्याच स्टुडिओमध्ये तो व्हिडिओ शूट करून अपलोड करत होता. त्यावेळी अज्ञातांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. या हल्ल्यामध्ये मोहितचा जागीच मृत्यू झाला आहे. तर या प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे.

हेही वाचा : मालिकेत डाॅ. आंबेडकरांचं बालपण साकारणारा अभिनेता आहे कोण?

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. तर घटनास्थळावरून मोहितचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. दरम्यान, पोलीस आता या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.

पोलिसांनी संपूर्ण परिसरात चौकशी सुरू केली असून हल्ला झाल्यानंतर हल्लेखोर फरार आहेत. त्यामुळे त्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस आता परिसराती सीसीटीव्ही तपासणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या प्रकरणात मोहितच्या कुटुंबीयांचीही चौकशी होणार आहे.

हल्लीची तरुणाई टिकटॉकवर व्हिडिओ बनवण्यात व्यस्त आहे. रोज नाही म्हटलं तरी लाखो लोक टिकटॉकवर व्हिडिओ तयार करतात. त्यांना लाखोंहून जास्त फॉलोअर आहेत. पण यातून गुन्हेगारी वाढण्यास सुरुवात झाली आहे.

मालकाने पाठ फिरवताच तो 5 लाखांचं सोनं घेऊन पळाला, पाहा हा VIDEO

First published: May 21, 2019, 7:46 PM IST
Tags: tik tok

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading