काँग्रेस नेते गृहमंत्री शिवराज पाटलांवर नाराज !

30 नोव्हेंबर, नवी दिल्लीपल्लवी घोष, आशिष दीक्षित बुधावर 26 नोव्हेंबरपासून तीन दिवस मुंबई दहशतवादी कारावाईंच्या सावटाखाली होती. त्यामुळे देशाच्या सुरक्षेपुढे निर्माण झालेल्या आव्हानावर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी शनिवार 29 नोव्हेंबर, 2008 रोजी त्यांच्या निवासस्थानी दुपारी एक बैठक घेतली होती. पंतप्रधानांनी आयोजित केलेल्या बैठकीस केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार एम. के. नारायणन यांना न बोलवण्यात आल्यानं उलट सुलट चर्चांना उधाण आलं आहे. काँग्रेस नेते केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांच्यावर नाराज असून लवकरच शिवराज पाटील राजीनामा देतील असंही बोललं जात आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांवर इतरांनी कितीही टीका केली तरी सोनिया आजवर शिवराज पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या होत्या. पण शनिवारी 29 नोव्हेंबर, 2008 रोजी संध्याकाळी काँग्रेस वर्किंग कमिटीची तातडीने बैठक बोलवली होती. तातडीने बोलवलेल्या या बैठकीत सोनियांनी शिवराज यांच्या कारभाराविषयी कडक शब्दांत नाराजी व्यक्त केल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनीही गृहमंत्रालयाच्या कामावर नापसंती व्यक्त केल्याचं समजतं आहे. काँग्रेसचे नेतेहीे गृहमंत्र्यांवर नाराज आहेत. तीन तास चाललेल्या वादळी बैठकीत कित्येक काँग्रेस नेत्यांनी म्हटलं की, मुंबईतल्या हल्ल्यांमुळे काँग्रेसची प्रतिमा खराब झाली आहे, असं काही ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांना वाटत आहे. त्यामुळे सद्य परिस्थितीत निवडणुकांना सामोरं जाणं काँग्रेस पक्षासाठी कठीण आहे, असं काही नेत्यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात ज्येष्ठ काँग्रेस नेते जनार्दन द्विवेदी यांना शिवराज पाटील राजीनामा देणार का, असं विचारलं असता ते म्हणाले, " काँग्रेसच्या वर्किंग कमिटीच्या बैठकीत प्रत्येकाने भारताच्या सुरक्षेबाबत आपापली मतं मांडली आहेत. पण आता पुढे काय होईल यासाठी आपल्याला थोडं थांबावं लोगल, " असं सूचक शब्दात उत्तर दिलं आहे. या सगळ्या परिस्थितीवरून असं लक्षात येतंय की, मुंबईवरचा दहशतवादी हल्ला केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांना भोवणार आहे. शिवराज पाटील यांच्या कारभारावर विरोधी पक्षांसोबत काँग्रेसचे मित्र पक्षही नाराज आहेत. त्यामुळे आता तर काँग्रेस नेतेही त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत.

  • Share this:

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 30, 2008 07:43 AM IST

ताज्या बातम्या