शिवराज पाटील यांचा राजीनामा

शिवराज पाटील यांचा राजीनामा

30 नोव्हेंबर, नवी दिल्लीआशिष दीक्षित केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांनी आपल्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. हा राजीनामा त्यांनी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्याकडे सुपूर्द केला आहे. मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याची नैतिक जबाबदारी स्वीकारत त्यांनी राजीनामा दिला आहे. केंद्रीय मंत्री शिवराज पाटील राजीनामा देणार हे अपेक्षित होतं. देशावरचे वाढते अतिरेकी हल्ले पाहता तसंच मुंबईवर झालेला दहशतवादी हल्ला पाहता भारताच्या संरक्षणाच्यादृष्टीनं कारवाई करण्यात गृहमंत्री असमर्थ आहेत, अशी टीका सुरू झाली होती. देशाच्या सुरक्षिततेच्या मुद्यावरून पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी शनिवारी दुपारी एक बैठक घेतली होती. पंतप्रधानांनी बोलवलेल्या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार एम. के. नारायणन यांना बोलावलं नव्हतं. शिवराज पाटील यांच्यावर पंतप्रधान आणि सोनिया गांधी नाराज होते. शिवराज पाटील यांची असमर्थता आगामी निवडणुकीत काँग्रेसला भोवणार, असं काही काँग्रेस नेत्यांनी म्हंटलं आहे. त्यामुळे गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, असा प्रस्ताव सोनिया गांधी यांच्याकडे इतर काँग्रेस नेत्यांनी ठेवला होता.

  • Share this:

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 30, 2008 07:46 AM IST

ताज्या बातम्या