Elec-widget

मुंबईच्या दहशतवादी हल्ल्यातल्या मृतांचा आकडा 183

30 नोव्हेंबर, मुंबई -मुंबईतल्या दहशतवादाविरोधातली कारवाई संपली आहे. तब्बल 60 तासांच्या धुमश्चक्रीनंतर शनिवारी सकाळी एनएसजीनं ताज हॉटेल सर केलं. या अतिरेकी हल्ल्यातल्या मृतांचा आकडा 183 झाला आहे. त्यात 15 परदेशी नागरिकांचा समावेश आहे. तर जखमींची संख्या 294 आहे. जखमींमध्ये 23 परदेशी नागरिक आहेत. परदेशी नागरिकांचे मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी जे. जे. हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहेत. आजवरचा सर्वात मोठा आणि भीषण अतेरिकी हल्ला म्हणून ओळखला जाणा-या 26 नोव्हेंबर 2008 च्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे. या दहशतवादी हल्यातला गोळीबार आणि हातबॉम्बचा आवाज हॉटेलबाहेर 300 किलोमीटरवर उभं राहून वृत्तांकन करणा-या शेकडो प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींच्या हृदयाचे ठोके चुकवत होता. हॉटेल ट्रायडण्ट (ओबेरॉय), कुलाब्याचं नरिमन हाऊस आणि हॉटेल ताजवर कब्जा मिळवण्यासाठी एनएसजी, मुंबई पोलीस, नौदल आणि लष्कर यांना निकाराची झुंज द्यावी लागली आहे. हॉटेल ताजमधले शनिवारी 29 नोव्हेंबर 2007 सकाळी 8 वाजून 15 मिनिटांनी 3 अतिरेकी ठार केले आणि तीन दिवस चाललेल्या युद्धाला विराम मिळाला आहे. मात्र तरीही काही दहशतवादी मुंबईत लपले असल्याच्या भयानं मुंबईकरांमधील भीती कायम आहे.

  • Share this:

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 30, 2008 06:06 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...