राजवर्धनसिंह यांच्या विरोधात लढणार 'ही' ऑलिम्पिक खेळाडू

राजवर्धनसिंह यांच्या विरोधात लढणार 'ही' ऑलिम्पिक खेळाडू

राहुल गांधी यांच्या या मास्टरस्ट्रोकमुळं राठोड यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते.

  • Share this:

नवी दिल्ली, 2 एप्रिल : लोकसभा निवडणुकीचे ज्वर वाढत असताना, कॉंग्रेसनं सोमवारी रात्री राजस्थान, महाराष्ट्र आणि गुजरात येथील उमेदवारांची यादी जाहीर केली. यामुळं आता जयपूर ग्रामीणमध्ये एक वेगळीच चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. काँग्रेसनं थाळीफेक खेळाडू कृष्णा पुनिया यांना भाजपचे केंद्रीय मंत्री राजवर्धनसिंह राठोड यांच्याविरोधात मैदानात उतरवलं आहे.

पक्षानं सोमवारी रात्री जारी केलेल्या यादीत राजस्थानमधील सहा, महाराष्ट्रातील दोन आणि गुजरातमधील एका उमेदवाराचे नाव जाहीर करण्यात आले आहे. मात्र कृष्णा पुनिया यांना दिलेल्या उमेदवारीमुळं सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. राहुल गांधी यांच्या या मास्टरस्ट्रोकमुळं राठोड यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते.

पुनिया यांनी 2004, 2008 आणि 2012 अशा 3 वेळा थाळीफेक या खेळात ऑलिम्पिकमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. तर २०१०च्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदकही मिळवले. तर, 2004च्या एथेंस ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्य पदक जिंकले आहे. त्यामुळं जयपूर ग्रामीण मध्ये आता रोठोड विरुद्ध पुनिया अशी लढत पाहायला मिळणार आहे. याआधी कॉंग्रेसनं उत्तर प्रदेश आणि अन्य काही राज्यातील मिळून एकूण 315 उमेदावारांची यादी जाहीर केली होती.

VIDEO पार्थ पवार पुन्हा वादात, दैवी शक्तीचा दावा करणाऱ्या 'फादर'ची घेतली भेट

First published: April 2, 2019, 7:46 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading