कोडनानीला 28 वर्ष, बजरंगीला मरेपर्यंत जन्मठेप

कोडनानीला 28 वर्ष, बजरंगीला मरेपर्यंत जन्मठेप

31 ऑगस्टनरोडा-पाटिया दंगल प्रकरणी सर्व 32 दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या प्रकरणातील भाजपच्या आमदार माया कोडनानीला 28 वर्षांची जन्मठेप सुनावण्यात आली आहे. तर बजरंग दलाचा नेता बाबू बजरंगीला मरेपर्यंत जन्मठेप सुनावण्यात आली आहे. गुजरात विशेष कोर्टाने आपला राखीव निकाल आज जाहीर केला. या निकालाचं सर्वस्तरातून स्वागत केलं जातं आहे. कोडनानी आणि बजरंगी यांच्यासह बाकीच्या दोषींमध्ये 22 जणांना 14 वर्षांची तर 7 जणांना 21 वर्षांची जन्मठेप ठोठवण्यात आली. गेल्या 10 वर्षांपासून या खटल्यावर सुनावणी सुरु होती अखेर दहा वर्षांनंतर नरोडा पाटिया दंगलपीडितांना न्याय मिळाला आहे. हा निर्णय एकाअर्थी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद मोदींना चपराक आहे. गोंध्रा हत्याकांडानंतर 28 फेब्रुवारी 2002 ला नरोडा पाटिया भागात 97 अल्पसंख्याकांची हत्या करण्यात आली होती. माया कोडनानी.. गुजरातच्या माजी महिला बाल कल्याण मंत्री आणि नरेंद्र मोदींच्या निकटवर्तीय.. 2002 साली गोध्रा कांडानंतर उसळलेल्या नरोडा पाटिया दंगलीत निष्पापांची कत्तल करण्यासाठी त्यांना ट्रायल कोर्टानं 18 वषंर् आणि 10 वषंर् अशी एकूण 28 वर्षांची जन्मठेप सुनावली आहे. तर याच प्रकरणात बजरंग दलाचा नेता बाबू बजरंगी याला मरेपर्यंत जन्मठेप सुनावण्यात आली आहे. गुजरातमधल्या नरोडा पाटियामध्ये उसळलेल्या दंगलींमध्ये 97 निरपराध लोक मारले गेले. याप्रकरणी शिक्षा झालेल्यांमध्ये ही दोन बडी नावं. याप्रकरणात इतर 29 जणांना 31 वर्षांची जन्मठेप झाली आहे. गुजरातमधल्या दंगलींमध्ये सर्वात जास्त बळी हे नरोडा पाटियातल्या दंगलीत गेले. इतकंच नाही तर जितक्या निर्दयपणे लोकांना मारण्यात आलं तेही अंगावर शहारा आणणारं होतं. कौसर बानो नावाच्या 9 महिन्यांच्या गरोदर महिलेवर बलात्कार करून तिला जाळून टाकण्यात आलं आणि म्हणूनच या निकालावर पीडितांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.कोर्टाच्या आजच्या निकालातल्या दोन महत्त्वाच्या बाबी म्हणजे माया कोडनानी यांना सुनावण्यात आलेली 10 वर्षं आणि 18 वर्षांची शिक्षा ही एकत्र नाही तर वेगवेगळी भोगावी लागणार. शिवाय या दंगलीत बलात्कार झालेल्या महिलेला पाच लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेशही कोर्टाने दिलेत. गोध्राकांडानंतर उसळलेल्या एकूण 8 पैकी पाच दंगलींमध्ये आरोपींना शिक्षा सुनावण्यात आलीय. त्यामुळे सुप्रीम कोर्टानं स्थापन केलेल्या स्पेशल इन्वेस्टिगेशन टीम म्हणजे एसआयटीसाठीसुद्धा हा मोठा विजय आहे. इतकंच नाही तर देशातल्या दंगलीच्या इतिहासात सर्वात जास्त आरोपींना शिक्षा होण्याचीही ही पहिलीच वेळ आहे.काय झालं नरोडामध्ये ?- नरोडा पाटियामध्ये 97 लोक मारले गेले- विश्व हिंदू परिषदेनं पुकारलेल्या बंद दरम्यान हा हल्ला झाला- या हिंसाचारात शकिला बानो यांच्या घरातले 8 जण मारले गेले- या प्रकरणाचा तपास पहिल्यांदा गुजरात पोलिसांनी केला- 2009 साली सुप्रीम कोर्टाने याच्या तपासासाठी एसआयटीची स्थापना केली- माया कोडनानी आणि बाबू बजरंगीसह याप्रकरणात 64 आरोपी होते गोध्रा कांडानंतर गुजरातमध्ये जातीय दंगली उसळल्या. एकूण आठपैकी पाच दंगलीतले निकाल आत्तापर्यंत लागले आहे. या सर्व निकालांवर एक नजर टाकूया...साबरमती एक्सप्रेस जळीतकांड27 फेब्रु. 2002 - साबरमती एक्सप्रेसमध्ये 59 प्रवाशांची जाळून हत्या1 मार्च 2011 - 11 जणांना फाशीची शिक्षा, 20 जणांना जन्मठेप ओड हत्याकांड1 मार्च 2002 - 23 जणांची हत्या 19 एप्रिल 2012 - 18 जणांना जन्मठेप, 5 जणांना 7 वर्षांची शिक्षासरदारपुरा हत्याकांड1 मार्च 2002 - 33 जणांची हत्या 10 नोव्हें. 2011 - 31 जणांना जन्मठेपदिपडा दरवाजा हत्याकांड 28 फेब्रु. 2002 - 11 जणांची हत्या 30 जुलै 2012 - 21 जणांना जन्मठेपनरोडा पाटिया हत्याकांड28 फेब्रु. 2002 - 97 जणांची हत्या 31 ऑगस्ट 2012 - 31 जणांना जन्मठेपबेस्ट बेकरी हत्याकांड1 मार्च 2001 - 14 लोकांची हत्याफेब्रु. 2006 - मुंबईतल्या सेशन्स कोर्टानं 9 जणांना दोषी ठरवलंजुलै 2012 - मुंबई हायकोर्टानं 5 जणांना निर्दोष सोडलं

  • Share this:

31 ऑगस्ट

नरोडा-पाटिया दंगल प्रकरणी सर्व 32 दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या प्रकरणातील भाजपच्या आमदार माया कोडनानीला 28 वर्षांची जन्मठेप सुनावण्यात आली आहे. तर बजरंग दलाचा नेता बाबू बजरंगीला मरेपर्यंत जन्मठेप सुनावण्यात आली आहे. गुजरात विशेष कोर्टाने आपला राखीव निकाल आज जाहीर केला. या निकालाचं सर्वस्तरातून स्वागत केलं जातं आहे. कोडनानी आणि बजरंगी यांच्यासह बाकीच्या दोषींमध्ये 22 जणांना 14 वर्षांची तर 7 जणांना 21 वर्षांची जन्मठेप ठोठवण्यात आली. गेल्या 10 वर्षांपासून या खटल्यावर सुनावणी सुरु होती अखेर दहा वर्षांनंतर नरोडा पाटिया दंगलपीडितांना न्याय मिळाला आहे. हा निर्णय एकाअर्थी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद मोदींना चपराक आहे. गोंध्रा हत्याकांडानंतर 28 फेब्रुवारी 2002 ला नरोडा पाटिया भागात 97 अल्पसंख्याकांची हत्या करण्यात आली होती.

माया कोडनानी.. गुजरातच्या माजी महिला बाल कल्याण मंत्री आणि नरेंद्र मोदींच्या निकटवर्तीय.. 2002 साली गोध्रा कांडानंतर उसळलेल्या नरोडा पाटिया दंगलीत निष्पापांची कत्तल करण्यासाठी त्यांना ट्रायल कोर्टानं 18 वषंर् आणि 10 वषंर् अशी एकूण 28 वर्षांची जन्मठेप सुनावली आहे. तर याच प्रकरणात बजरंग दलाचा नेता बाबू बजरंगी याला मरेपर्यंत जन्मठेप सुनावण्यात आली आहे. गुजरातमधल्या नरोडा पाटियामध्ये उसळलेल्या दंगलींमध्ये 97 निरपराध लोक मारले गेले. याप्रकरणी शिक्षा झालेल्यांमध्ये ही दोन बडी नावं. याप्रकरणात इतर 29 जणांना 31 वर्षांची जन्मठेप झाली आहे. गुजरातमधल्या दंगलींमध्ये सर्वात जास्त बळी हे नरोडा पाटियातल्या दंगलीत गेले. इतकंच नाही तर जितक्या निर्दयपणे लोकांना मारण्यात आलं तेही अंगावर शहारा आणणारं होतं. कौसर बानो नावाच्या 9 महिन्यांच्या गरोदर महिलेवर बलात्कार करून तिला जाळून टाकण्यात आलं आणि म्हणूनच या निकालावर पीडितांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

कोर्टाच्या आजच्या निकालातल्या दोन महत्त्वाच्या बाबी म्हणजे माया कोडनानी यांना सुनावण्यात आलेली 10 वर्षं आणि 18 वर्षांची शिक्षा ही एकत्र नाही तर वेगवेगळी भोगावी लागणार. शिवाय या दंगलीत बलात्कार झालेल्या महिलेला पाच लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेशही कोर्टाने दिलेत. गोध्राकांडानंतर उसळलेल्या एकूण 8 पैकी पाच दंगलींमध्ये आरोपींना शिक्षा सुनावण्यात आलीय. त्यामुळे सुप्रीम कोर्टानं स्थापन केलेल्या स्पेशल इन्वेस्टिगेशन टीम म्हणजे एसआयटीसाठीसुद्धा हा मोठा विजय आहे. इतकंच नाही तर देशातल्या दंगलीच्या इतिहासात सर्वात जास्त आरोपींना शिक्षा होण्याचीही ही पहिलीच वेळ आहे.

काय झालं नरोडामध्ये ?

- नरोडा पाटियामध्ये 97 लोक मारले गेले- विश्व हिंदू परिषदेनं पुकारलेल्या बंद दरम्यान हा हल्ला झाला- या हिंसाचारात शकिला बानो यांच्या घरातले 8 जण मारले गेले- या प्रकरणाचा तपास पहिल्यांदा गुजरात पोलिसांनी केला- 2009 साली सुप्रीम कोर्टाने याच्या तपासासाठी एसआयटीची स्थापना केली- माया कोडनानी आणि बाबू बजरंगीसह याप्रकरणात 64 आरोपी होते

गोध्रा कांडानंतर गुजरातमध्ये जातीय दंगली उसळल्या. एकूण आठपैकी पाच दंगलीतले निकाल आत्तापर्यंत लागले आहे. या सर्व निकालांवर एक नजर टाकूया...

साबरमती एक्सप्रेस जळीतकांड27 फेब्रु. 2002 - साबरमती एक्सप्रेसमध्ये 59 प्रवाशांची जाळून हत्या1 मार्च 2011 - 11 जणांना फाशीची शिक्षा, 20 जणांना जन्मठेप

ओड हत्याकांड1 मार्च 2002 - 23 जणांची हत्या 19 एप्रिल 2012 - 18 जणांना जन्मठेप, 5 जणांना 7 वर्षांची शिक्षा

सरदारपुरा हत्याकांड1 मार्च 2002 - 33 जणांची हत्या 10 नोव्हें. 2011 - 31 जणांना जन्मठेपदिपडा दरवाजा हत्याकांड 28 फेब्रु. 2002 - 11 जणांची हत्या 30 जुलै 2012 - 21 जणांना जन्मठेप

नरोडा पाटिया हत्याकांड28 फेब्रु. 2002 - 97 जणांची हत्या 31 ऑगस्ट 2012 - 31 जणांना जन्मठेप

बेस्ट बेकरी हत्याकांड1 मार्च 2001 - 14 लोकांची हत्याफेब्रु. 2006 - मुंबईतल्या सेशन्स कोर्टानं 9 जणांना दोषी ठरवलंजुलै 2012 - मुंबई हायकोर्टानं 5 जणांना निर्दोष सोडलं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 31, 2012 11:10 AM IST

ताज्या बातम्या