दहशतवादी कसाबला फाशीच !

दहशतवादी कसाबला फाशीच !

29 ऑगस्टमुंबईवर झालेल्या 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यातील मुख्य आरोपी अजमल कसाबला फाशीची शिक्षा होणार आहे. सुप्रीम कोर्टाने कसाबची फाशीची शिक्षा कायम ठेवली आहे. कसाबने केलेले सर्व युक्तिवाद कोर्टाने फेटाळून लावले आहे. कसाबने राष्ट्राविरुद्ध युद्ध पुकारल्याचं सिद्ध झाले आहे. कसाबला त्याची बाजू मांडण्याची पूर्ण संधी देण्यात आली त्याच्या या कृत्याबद्दल त्याला फाशी देण्याशिवाय आमच्याकडे कोणताही पर्याय नाही, असंही कोर्टाने नमूद केलंय. मोहम्मद अजमल आमीर कसाब आता फासावर जाणार.. यावर शिक्कामोर्तब झालंय. 26 नोव्हेंबरच्या दिवशी मुंबई सीएसटीमध्ये निष्पापांवर बेछूट गोळीबार करणार्‍या या पाकिस्तानी अतिरेक्याला भारतातल्या सर्वोच्च न्यायालयानेही दोषी ठरवलंय. कसाबला त्याची बाजू मांडण्याची पूर्ण संधी देण्यात आली, असा निर्वाळाही कोर्टाने दिला. खून, गुन्हेगारी कट रचणे आणि राष्ट्राविरुद्ध युद्ध पुकारणे हे गुन्हे कसाबविरुद्ध सिद्ध झालेत. न्यायमूर्ती आफ्ताब आलम आणि न्यायमूर्ती सी के प्रसाद यांनी निकाल वाचून दाखवताना म्हटलं. 'कसाबचा पहिला आणि महत्त्वाचा गुन्हा म्हणजे भारत सरकारविरुद्ध युद्ध पुकारणे. ज्या प्रमाणात प्राणहानी झाली, संपत्तीचं नुकसान झालं आणि दहशत पसरली, त्यावरून हा खटला दुर्मिळातला दुर्मिळच आहे. किंबहुना या प्रजासत्ताकाच्या जन्मापासून या सर्वोच्च न्यायालयाने असा खटला पाहिला नव्हता. त्यामुळे कसाबला फाशी देण्यावाचून आमच्यासमोर दुसरा पर्याय नाही.'कसाबला सुप्रीम कोर्टातही तुल्यबळ वकील देण्यात आले होते. त्यांनी युक्तिवाद केला की कसाबला खालच्या कोर्टांमध्ये योग्य वकील मिळाले नाहीत. कबुलीजबाब स्वेच्छेने दिला नव्हता राष्ट्राविरुद्ध युद्ध पुकारल्याचं सिद्ध होत नाही. पण कोर्टाला हे म्हणणं अजिबात पटलं नाही. ही केस सुरवातीपासून लढवणार्‍या विशेष सरकारी वकिलांनी निकालावर समाधान व्यक्त केलंय. पण सहआरोपी फहीम अन्साही आणि सबाउद्दीन अहमद यांची मात्र निर्दोष मुक्तता करण्यात आली. याबद्दल पुनर्विचार याचिका दाखल करू, असे संकेत गृहमंत्री आर आर पाटील यांनी दिलेत.अजमल आमिर कसाब याला पाच गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवून फाशी देण्यात आली.गुन्हा क्र. 1भारताविरोधात युद्ध पुकारणं(शिक्षा-फाशी)गुन्हा क्र. 2बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्यांतर्गत अतिरेकी कारवाईप्रकरणी दोषी (शिक्षा-फाशी)गुन्हा क्र. 3हल्ल्याचा कट आखणे (शिक्षा-फाशी)गुन्हा क्र. 4पोलीस अधिकारी अशोक कामटे, विजय साळसकर, हेमंत करकरे, तुकारम ओंबाळे, अमरसिंह सोळंकींसह 7 जणांची हत्या करणे(शिक्षा-फाशी)गुन्हा क्र. 5159 जणांच्या हत्येसाठी चिथावणी देणे (शिक्षा-फाशी)कसाबसमोरचे पर्यायराष्ट्रपतींकडे दयेची याचिका सादर करण्याचा कसाबला अधिकारसध्या राष्ट्रपतींकडे 20 याचिका प्रलंबितनियमानुसार सर्व प्रलंबित याचिका मार्गी लागल्याशिवाय कसाबच्या याचिकेवर विचार होऊ शकत नाहीपण एखादी विशिष्ट याचिका सुनावणीसाठी आधी घेण्याचा राष्ट्रपतींना अधिकारसंसद हल्ल्यातला अतिरेकी अफजल गुरूची वादग्रस्त याचिका प्रलंबितखटल्याचा घटनाक्रम...26 नोव्हें. 2008 - कसाब आणि इतर 9 अतिरेक्यांचा मंुबईवर हल्ला27 नोव्हें. 2008 - अजमल कसाब सापडला6 मे 2009 - आरोपपत्र दाखल23 जून 2009 - हाफीज सईद, झकी-उर-रहमान लख्वीसह 22 जणांविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट 3 मे 2010 - विशेष कोर्टात कसाब दोषी, सबाऊद्दीन आ णि फहीम अन्सारी निर्दोष6 मे 2010 - विशेष कोर्टानं कसाबला फाशीची शिक्षा सुनावली18 ऑक्टो. 2010 - मुंबई हायकोर्टात खटला सुरू, कसाब व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर21 फेब्रु. 2011 - कसाबच्या फाशीची शिक्षा हायकोर्टात कायम, सबाऊद्दीन आणि फहीम अन्सारी निर्दोषआणि आज ....29 ऑगस्ट 2012 - कसाबच्या फाशीच्या शिक्षेवर सुप्रीम कोर्टाकडून शिक्कामोर्तब झालं.

  • Share this:

29 ऑगस्ट

मुंबईवर झालेल्या 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यातील मुख्य आरोपी अजमल कसाबला फाशीची शिक्षा होणार आहे. सुप्रीम कोर्टाने कसाबची फाशीची शिक्षा कायम ठेवली आहे. कसाबने केलेले सर्व युक्तिवाद कोर्टाने फेटाळून लावले आहे. कसाबने राष्ट्राविरुद्ध युद्ध पुकारल्याचं सिद्ध झाले आहे. कसाबला त्याची बाजू मांडण्याची पूर्ण संधी देण्यात आली त्याच्या या कृत्याबद्दल त्याला फाशी देण्याशिवाय आमच्याकडे कोणताही पर्याय नाही, असंही कोर्टाने नमूद केलंय.

मोहम्मद अजमल आमीर कसाब आता फासावर जाणार.. यावर शिक्कामोर्तब झालंय. 26 नोव्हेंबरच्या दिवशी मुंबई सीएसटीमध्ये निष्पापांवर बेछूट गोळीबार करणार्‍या या पाकिस्तानी अतिरेक्याला भारतातल्या सर्वोच्च न्यायालयानेही दोषी ठरवलंय. कसाबला त्याची बाजू मांडण्याची पूर्ण संधी देण्यात आली, असा निर्वाळाही कोर्टाने दिला. खून, गुन्हेगारी कट रचणे आणि राष्ट्राविरुद्ध युद्ध पुकारणे हे गुन्हे कसाबविरुद्ध सिद्ध झालेत. न्यायमूर्ती आफ्ताब आलम आणि न्यायमूर्ती सी के प्रसाद यांनी निकाल वाचून दाखवताना म्हटलं.

'कसाबचा पहिला आणि महत्त्वाचा गुन्हा म्हणजे भारत सरकारविरुद्ध युद्ध पुकारणे. ज्या प्रमाणात प्राणहानी झाली, संपत्तीचं नुकसान झालं आणि दहशत पसरली, त्यावरून हा खटला दुर्मिळातला दुर्मिळच आहे. किंबहुना या प्रजासत्ताकाच्या जन्मापासून या सर्वोच्च न्यायालयाने असा खटला पाहिला नव्हता. त्यामुळे कसाबला फाशी देण्यावाचून आमच्यासमोर दुसरा पर्याय नाही.'

कसाबला सुप्रीम कोर्टातही तुल्यबळ वकील देण्यात आले होते. त्यांनी युक्तिवाद केला की कसाबला खालच्या कोर्टांमध्ये योग्य वकील मिळाले नाहीत. कबुलीजबाब स्वेच्छेने दिला नव्हता राष्ट्राविरुद्ध युद्ध पुकारल्याचं सिद्ध होत नाही. पण कोर्टाला हे म्हणणं अजिबात पटलं नाही. ही केस सुरवातीपासून लढवणार्‍या विशेष सरकारी वकिलांनी निकालावर समाधान व्यक्त केलंय.

पण सहआरोपी फहीम अन्साही आणि सबाउद्दीन अहमद यांची मात्र निर्दोष मुक्तता करण्यात आली. याबद्दल पुनर्विचार याचिका दाखल करू, असे संकेत गृहमंत्री आर आर पाटील यांनी दिलेत.

अजमल आमिर कसाब याला पाच गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवून फाशी देण्यात आली.

गुन्हा क्र. 1भारताविरोधात युद्ध पुकारणं(शिक्षा-फाशी)

गुन्हा क्र. 2बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्यांतर्गत अतिरेकी कारवाईप्रकरणी दोषी (शिक्षा-फाशी)

गुन्हा क्र. 3हल्ल्याचा कट आखणे (शिक्षा-फाशी)

गुन्हा क्र. 4पोलीस अधिकारी अशोक कामटे, विजय साळसकर, हेमंत करकरे, तुकारम ओंबाळे, अमरसिंह सोळंकींसह 7 जणांची हत्या करणे(शिक्षा-फाशी)

गुन्हा क्र. 5159 जणांच्या हत्येसाठी चिथावणी देणे (शिक्षा-फाशी)

कसाबसमोरचे पर्यायराष्ट्रपतींकडे दयेची याचिका सादर करण्याचा कसाबला अधिकारसध्या राष्ट्रपतींकडे 20 याचिका प्रलंबितनियमानुसार सर्व प्रलंबित याचिका मार्गी लागल्याशिवाय कसाबच्या याचिकेवर विचार होऊ शकत नाहीपण एखादी विशिष्ट याचिका सुनावणीसाठी आधी घेण्याचा राष्ट्रपतींना अधिकारसंसद हल्ल्यातला अतिरेकी अफजल गुरूची वादग्रस्त याचिका प्रलंबित

खटल्याचा घटनाक्रम...

26 नोव्हें. 2008 - कसाब आणि इतर 9 अतिरेक्यांचा मंुबईवर हल्ला27 नोव्हें. 2008 - अजमल कसाब सापडला6 मे 2009 - आरोपपत्र दाखल23 जून 2009 - हाफीज सईद, झकी-उर-रहमान लख्वीसह 22 जणांविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट 3 मे 2010 - विशेष कोर्टात कसाब दोषी, सबाऊद्दीन आ णि फहीम अन्सारी निर्दोष6 मे 2010 - विशेष कोर्टानं कसाबला फाशीची शिक्षा सुनावली18 ऑक्टो. 2010 - मुंबई हायकोर्टात खटला सुरू, कसाब व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर21 फेब्रु. 2011 - कसाबच्या फाशीची शिक्षा हायकोर्टात कायम, सबाऊद्दीन आणि फहीम अन्सारी निर्दोषआणि आज ....29 ऑगस्ट 2012 - कसाबच्या फाशीच्या शिक्षेवर सुप्रीम कोर्टाकडून शिक्कामोर्तब झालं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 29, 2012 09:25 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...