अफवा पसरवणार्‍या साईट्सवर फौजदारी गुन्हे दाखल होणार

अफवा पसरवणार्‍या साईट्सवर फौजदारी गुन्हे दाखल होणार

21 ऑगस्टद्वेषपूर्ण मजकूर पसरवणार्‍या सोशल नेटवर्किंग साईट्सवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश गृहमंत्रालयाने दिले आहे. या सोशल नेटवर्किंग साईट्सनी प्रक्षोभक मजकूर काढायला नकार दिल्याने ही कारवाई करण्यात येणार आहे. यासाठी अमेरिकच्या सरकारचीही मदत घेतली जाणार आहे. आपल्या वेब पेजेसवर टाकण्यात येणारे बहुतांश प्रक्षोभक मजकूर हे पाकिस्तानातून अपलोड झाल्याची माहिती गुगल आणि फेसबुकने दिली आहे. दरम्यान, उद्यापर्यंत 310 वेब पेजेस आणि अकाऊंट्स ब्लॉक करण्यात येतील, असं समजतंय. काल सोमवारी आसाम दंगली प्रकरणावरुन देशात अंशातता माजवणारा मजकूर असलेल्या 245 वेबसाईट्सवर आतापर्यंत कारवाई करण्यात आली आहे. या सर्व वेबसाईट्स ब्लॉक करण्यात आल्या आहे.

  • Share this:

21 ऑगस्ट

द्वेषपूर्ण मजकूर पसरवणार्‍या सोशल नेटवर्किंग साईट्सवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश गृहमंत्रालयाने दिले आहे. या सोशल नेटवर्किंग साईट्सनी प्रक्षोभक मजकूर काढायला नकार दिल्याने ही कारवाई करण्यात येणार आहे. यासाठी अमेरिकच्या सरकारचीही मदत घेतली जाणार आहे. आपल्या वेब पेजेसवर टाकण्यात येणारे बहुतांश प्रक्षोभक मजकूर हे पाकिस्तानातून अपलोड झाल्याची माहिती गुगल आणि फेसबुकने दिली आहे. दरम्यान, उद्यापर्यंत 310 वेब पेजेस आणि अकाऊंट्स ब्लॉक करण्यात येतील, असं समजतंय. काल सोमवारी आसाम दंगली प्रकरणावरुन देशात अंशातता माजवणारा मजकूर असलेल्या 245 वेबसाईट्सवर आतापर्यंत कारवाई करण्यात आली आहे. या सर्व वेबसाईट्स ब्लॉक करण्यात आल्या आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 21, 2012 05:43 PM IST

ताज्या बातम्या