मनसे विनापरवाना मोर्चावर कारवाई होणार - गृहमंत्री

मनसे विनापरवाना मोर्चावर कारवाई होणार - गृहमंत्री

21 ऑगस्टमनसेला मोर्चाची परवानगी नव्हती तरी त्यांनी मोर्चा काढला तेव्हा पोलीस कायद्यनुसार कारवाई करतील. याआधी चौपाटीवरून अनेक वेळा मोर्चे निघाले त्यावेळी पोलिसांनी गुन्हे दाखल केलेत. तशीच इथेही कारवाई होईल, असं गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी स्पष्ट केलंय. शिवाय राजीनाम्याची मागणी राजकीय हेतूने करण्यात आली. त्यामुळे ती गंाभीर्याने घेण्याची गरज नाही. आजचा मोर्चा आणि सभा हे मनसेचं शक्तीप्रदर्शन होतं. विरोधकांकडून 11 ऑगस्टच्या घटनेचं राजकीय भांडवल केलं जातंय. पण पोलिसांच्या सतर्कतेमुळे पुढचे अनर्थ वेळीच टळले. त्यामुळे पोलिसांचे अभिनंदन करावे तेवढे थोडे आहे. मोर्चातल्या ज्या आंदोलकांबद्दल पुरावे आहेत त्यांच्यावर कारवाई केली जाईल. पण राजकीय मोर्चामुळे कारवाई लांबतं आहे असंही ते म्हणाले. दरम्यान, जमावबंदीचा आदेश मोडल्याबद्दल मनसेवर कारवाई होईल. त्याचबरोबर विशेष शाखेचे अधिकारी राज ठाकरेंचं भाषण तपासणार आहे. भाषणात प्रक्षोभक आढळलं तर कारवाई करण्यात येईल असं मुंबई पोलीस आयुक्त अरुप पटनायक यांनी स्पष्ट केलं.

  • Share this:

21 ऑगस्ट

मनसेला मोर्चाची परवानगी नव्हती तरी त्यांनी मोर्चा काढला तेव्हा पोलीस कायद्यनुसार कारवाई करतील. याआधी चौपाटीवरून अनेक वेळा मोर्चे निघाले त्यावेळी पोलिसांनी गुन्हे दाखल केलेत. तशीच इथेही कारवाई होईल, असं गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी स्पष्ट केलंय. शिवाय राजीनाम्याची मागणी राजकीय हेतूने करण्यात आली. त्यामुळे ती गंाभीर्याने घेण्याची गरज नाही. आजचा मोर्चा आणि सभा हे मनसेचं शक्तीप्रदर्शन होतं. विरोधकांकडून 11 ऑगस्टच्या घटनेचं राजकीय भांडवल केलं जातंय. पण पोलिसांच्या सतर्कतेमुळे पुढचे अनर्थ वेळीच टळले. त्यामुळे पोलिसांचे अभिनंदन करावे तेवढे थोडे आहे. मोर्चातल्या ज्या आंदोलकांबद्दल पुरावे आहेत त्यांच्यावर कारवाई केली जाईल. पण राजकीय मोर्चामुळे कारवाई लांबतं आहे असंही ते म्हणाले. दरम्यान, जमावबंदीचा आदेश मोडल्याबद्दल मनसेवर कारवाई होईल. त्याचबरोबर विशेष शाखेचे अधिकारी राज ठाकरेंचं भाषण तपासणार आहे. भाषणात प्रक्षोभक आढळलं तर कारवाई करण्यात येईल असं मुंबई पोलीस आयुक्त अरुप पटनायक यांनी स्पष्ट केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 21, 2012 02:13 PM IST

ताज्या बातम्या