विलासरावांच्या अंत्यदर्शनासाठी लोटला जनसागर

15 ऑगस्टमाजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या अंत्यदर्शनासाठी कार्यकर्त्यांची रीघ लागली आहे. त्यांच्या परिवाराचं सांत्वन करण्यासाठी लातूरात मोठ्या संख्याने लोक उपस्थित आहे. येणार्‍यांना भेटण्यासाठी विलासरावांचे कुटुंबीय, पत्नी वैशालीताई, अमित, रितेश आणि धीरज देशमुख उपस्थित आहेत. काही वेळापुर्वीच पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी पोहचल्या आहे. देशमुख कुटुंबियांचं त्यांनी सांत्वन केलं. सर्वपक्षीय नेत्यांनी विलासरावांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी बाभळगावात आले आहेत. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, माणिकराव ठाकरे,आर.आर.पाटील,गोपीनाथ मुंडे यांच्या आमदार,खासदार विलासरावांना श्रध्दांजली वाहिली. तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे पत्नीसह आणि कार्यकर्त्यांसह बाभळगावला पोचले. त्यांनी विलासरावांचं अंत्यदर्शन घेतलं आणि कुटुंबियांचीही भेट घेतली. बॉलिवूडच्या कलाकारांनी अंत्यदर्शन घेऊन श्रध्दांजली वाहिली आहे. आपल्या लाडक्या नेत्याचे अंत्यदर्शन घेण्यासाठी लातूरकर जड पावलांनी बाभळगावच्या परिसरात आलेत. यावेळी अनेकांना अश्रू अणावरण झाले नाही. आमचा नेता गेला अशी हळहळ व्यक्त करत अनेकांनी अश्रूना मार्ग मोकळा करुन दिला. लाडक्या नेत्याना निरोप घेण्यासाठी लाखोंच्या संख्येनं लोक हजर आहे. थोड्याच वेळ्यात विलासरावांची अंत्ययात्रा निघणार आहे. बााभळगावसारख्या लहान खेड्याचा सरपंच ते केंद्रीय मंत्री व्हाया राज्याचा आठ वर्ष मुख्यमंत्री, अशी दिमाखदार राजकीय कारकिर्द घडवणारे नेते म्हणून विलासराव देशमुख परिचित आहेत. वसंतराव नाईक यांच्यानंतर राज्याचा सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेला हरहुन्नरी चेहरा म्हणजे विलासराव देशमुख. आपल्या राजकीय मुत्सद्दीपणाच्या बळावर विलासराव 1999 मध्ये सर्वसंमतीने काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीचे पहिले मुख्यमंत्री बनले. त्यानंतर 2009 च्या निवडणुकांमध्ये पुन्हा आघाडीची सत्ता आल्यावर दुसर्‍यांदा विलासराव देशमुखांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली. 26/11 च्या मुंबई हल्ल्यानंतरची 'हॉटेल ताज' वारी त्यांना भोवली. त्यात त्यांना आपलं मुख्यमंत्री सोडावं लागलं. पण आधी राज्यसभेवर आणि त्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळात विलासरावांनी वर्णी लावून घेत दमदार कमबॅक केलं.

आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Updated On: Aug 15, 2012 08:37 AM IST

विलासरावांच्या अंत्यदर्शनासाठी लोटला जनसागर

15 ऑगस्ट

माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या अंत्यदर्शनासाठी कार्यकर्त्यांची रीघ लागली आहे. त्यांच्या परिवाराचं सांत्वन करण्यासाठी लातूरात मोठ्या संख्याने लोक उपस्थित आहे. येणार्‍यांना भेटण्यासाठी विलासरावांचे कुटुंबीय, पत्नी वैशालीताई, अमित, रितेश आणि धीरज देशमुख उपस्थित आहेत. काही वेळापुर्वीच पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी पोहचल्या आहे. देशमुख कुटुंबियांचं त्यांनी सांत्वन केलं. सर्वपक्षीय नेत्यांनी विलासरावांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी बाभळगावात आले आहेत. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, माणिकराव ठाकरे,आर.आर.पाटील,गोपीनाथ मुंडे यांच्या आमदार,खासदार विलासरावांना श्रध्दांजली वाहिली. तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे पत्नीसह आणि कार्यकर्त्यांसह बाभळगावला पोचले. त्यांनी विलासरावांचं अंत्यदर्शन घेतलं आणि कुटुंबियांचीही भेट घेतली. बॉलिवूडच्या कलाकारांनी अंत्यदर्शन घेऊन श्रध्दांजली वाहिली आहे. आपल्या लाडक्या नेत्याचे अंत्यदर्शन घेण्यासाठी लातूरकर जड पावलांनी बाभळगावच्या परिसरात आलेत. यावेळी अनेकांना अश्रू अणावरण झाले नाही. आमचा नेता गेला अशी हळहळ व्यक्त करत अनेकांनी अश्रूना मार्ग मोकळा करुन दिला. लाडक्या नेत्याना निरोप घेण्यासाठी लाखोंच्या संख्येनं लोक हजर आहे. थोड्याच वेळ्यात विलासरावांची अंत्ययात्रा निघणार आहे.

बााभळगावसारख्या लहान खेड्याचा सरपंच ते केंद्रीय मंत्री व्हाया राज्याचा आठ वर्ष मुख्यमंत्री, अशी दिमाखदार राजकीय कारकिर्द घडवणारे नेते म्हणून विलासराव देशमुख परिचित आहेत. वसंतराव नाईक यांच्यानंतर राज्याचा सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेला हरहुन्नरी चेहरा म्हणजे विलासराव देशमुख. आपल्या राजकीय मुत्सद्दीपणाच्या बळावर विलासराव 1999 मध्ये सर्वसंमतीने काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीचे पहिले मुख्यमंत्री बनले. त्यानंतर 2009 च्या निवडणुकांमध्ये पुन्हा आघाडीची सत्ता आल्यावर दुसर्‍यांदा विलासराव देशमुखांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली. 26/11 च्या मुंबई हल्ल्यानंतरची 'हॉटेल ताज' वारी त्यांना भोवली. त्यात त्यांना आपलं मुख्यमंत्री सोडावं लागलं. पण आधी राज्यसभेवर आणि त्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळात विलासरावांनी वर्णी लावून घेत दमदार कमबॅक केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 15, 2012 08:37 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...