ओबेरॉयमधली कारवाई पूर्ण

ओबेरॉयमधली कारवाई पूर्ण

28 नोव्हेंबर, मुंबई10 PMहॉटेल ओबेरॉय मधली एनएसजीची कारवाईत संपली असून हॉटेल आबेरॉय सध्या एनएसजीच्या ताब्यात आहे. हॉटेल ओबेरॉयमधून आज 24 आणि काल 6 मृतदेह मिळाले आहेत. यात काही परदेशी नागरिकांचाही समावेश आहे. या कारवाईत जवानांनी दोन अतिरेक्यांचा खातमा केला आहे. हॉटेल ओबेरॉय जगभरातील गर्भश्रीमंतांचं आवडीचं ठिकाण. या हॉटेलात गेले दोन दिवस दहशतवाद्यांनी हैदोस घातला. कधी फायरिंग, तर कधी हँड ग्रेनेडचा मारा... त्यांनी यावेळी शेकडो परदेशी नागरिकांना ओलीस ठेवलं होतं. मात्र आज त्यांचा खात्मा झालाच. एनएसजीच्या जवानांनी निर्भिडपणे हॉटेलात घुसून त्यांना संपवलं.ठार झालेल्या दहशतवाद्यांकडं प्रचंड शस्त्रास्त्र आहेत. प्रामुख्यानं वरच्या मजल्यावर हे अतिरेकी होते. त्यांनी केलेल्या हल्ल्यात हॉटेल मधले सहा परदेशी नागरिकांचा मृत्यु झालाय. दहशतवाद्यांनी अनेक परदेशी नागरिकांना मारून जिन्यावर टाकलं. पण ओबेरॉयमधल्या सर्व अतिरेक्यांचा खात्मा झालाय. त्यांच्याकडून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आलाय. हॉटेलात ओलिसांचे 30 मृतदेह सापडलेत. त्यापैकी दोन 2 परदेशी नागरिकांचे मृतदेह आहेत. अपुर्व पारेख, केतन देसाई, सिद्धार्थ त्यागी, अमरजित सेठी या चौघांना तातडीनं ब्रिचकँडी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलंय. कोणत्याही ओलिसाला इजा होऊ नये याची काळजी घेऊन ही कारवाई केल्याने कारवाईला वेळ लागल्याचं एनएसजीच्या डायरेक्टरनी स्पष्ट केलं.ओबेरॉयचं ऑपरेशन संपवून एनएसजीनं आता तिथला ताबा मुंबई पोलिसांकडं दिलाय. मुंबई पोलीस आता मृतदेह ताब्यात घेऊन पंचनाम्यासाठी पाठवणार आहेत.

  • Share this:

First published: November 28, 2008, 6:41 AM IST
Tags:

ताज्या बातम्या