'टायगर'ला हुसकावले, 'भारतीय' सुरुच राहणार !

'टायगर'ला हुसकावले, 'भारतीय' सुरुच राहणार !

13 ऑगस्टसलमान खान आणि कटरिना कैफ यांचा बहुचर्चित 'एक था टायगर' सिनेमा 15 ऑगस्टला रिलीज होणार आहे यासाठी देशभरातील मल्टिप्लेक्सने दार उघडे करुन दिले होते यामुळे इतर सिनेमांसह मराठी सिनेमे मल्टिप्लेक्स बाहेर पडणार होती. याचा सर्वाधिक फटका शुक्रवारीच रिलीज झालेल्या 'भारतीय' सिनेमाला बसणार होता. पण आता पीव्हीआर थिएटरमधून भारतीय चित्रपट काढला जाणार नाही असं आश्वासन मनसे चित्रपट सेना आणि भारतीय चित्रपट सेनेला देण्यात आलंय. सेना-मनसेच्या दणक्यानंतर मल्टिप्लेक्स मालकांची नरमाईची भूमिका घेतली आहे. 'एक था टायगर' या सिनेमाला जास्त शो मिळवून देण्यासाठी मराठी चित्रपटाला मल्टिप्लेक्सनं दारं बंद केल्याचा आरोप चित्रपट निर्मात्यांनी केला होता. याचीच दखल घेत मनसे चित्रपट सेना आणि भारतीय चित्रपट सेना यांची फिनिक्स मिल मधल्या पीव्हीआर थिएटरमध्ये धडक दिली. त्यावेळी हे आश्वासन देण्यात आलं. सलमान खान आणि कतरिना कैफ यांची प्रमुख भूमिका असलेला हा सिनेमा परवा म्हणजे 15 ऑगस्टला देशभरात रिलीज होतोय. या सिनेमासाठी मुंबईतील तसेच राज्यातील इतर मल्टिप्लेक्स मालकांनी या थिएटरमधील संपूर्ण शो मोकळे ठेवण्याचा निर्णय घेतला होता. याचा मोठा फटका मराठी चित्रपटांना बसला असता.

  • Share this:

13 ऑगस्ट

सलमान खान आणि कटरिना कैफ यांचा बहुचर्चित 'एक था टायगर' सिनेमा 15 ऑगस्टला रिलीज होणार आहे यासाठी देशभरातील मल्टिप्लेक्सने दार उघडे करुन दिले होते यामुळे इतर सिनेमांसह मराठी सिनेमे मल्टिप्लेक्स बाहेर पडणार होती. याचा सर्वाधिक फटका शुक्रवारीच रिलीज झालेल्या 'भारतीय' सिनेमाला बसणार होता. पण आता पीव्हीआर थिएटरमधून भारतीय चित्रपट काढला जाणार नाही असं आश्वासन मनसे चित्रपट सेना आणि भारतीय चित्रपट सेनेला देण्यात आलंय. सेना-मनसेच्या दणक्यानंतर मल्टिप्लेक्स मालकांची नरमाईची भूमिका घेतली आहे.

'एक था टायगर' या सिनेमाला जास्त शो मिळवून देण्यासाठी मराठी चित्रपटाला मल्टिप्लेक्सनं दारं बंद केल्याचा आरोप चित्रपट निर्मात्यांनी केला होता. याचीच दखल घेत मनसे चित्रपट सेना आणि भारतीय चित्रपट सेना यांची फिनिक्स मिल मधल्या पीव्हीआर थिएटरमध्ये धडक दिली. त्यावेळी हे आश्वासन देण्यात आलं. सलमान खान आणि कतरिना कैफ यांची प्रमुख भूमिका असलेला हा सिनेमा परवा म्हणजे 15 ऑगस्टला देशभरात रिलीज होतोय. या सिनेमासाठी मुंबईतील तसेच राज्यातील इतर मल्टिप्लेक्स मालकांनी या थिएटरमधील संपूर्ण शो मोकळे ठेवण्याचा निर्णय घेतला होता. याचा मोठा फटका मराठी चित्रपटांना बसला असता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 13, 2012 09:59 AM IST

ताज्या बातम्या