माजी पंतप्रधान व्ही.पी सिंग यांचं निधन

27 नोव्हेंबर दिल्लीभारताचे माजी पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंग यांचं दिल्ली इथे निधन झालं. 1989मध्ये विश्वनाथ प्रताप सिंग पंतप्रधान झाले होते. ते 77 वर्षाचे होते. त्यांचा जन्म 25जून1931 झाला. त्यांनी अलाहाबाद आणि पुणे विद्यापीठातून शिक्षण घेतलं. 1980 साली इंदिरा गांधींनी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी निवड केली .या काळात त्यांनी राज्याच्या ग्रामीण भागातील दरोडेखोरी, डाकू यांच्या सुळसुळाटाचा बंदोबस्त केला.1984 राजीव गांधींनी त्यांची अर्थमंत्रीपदी नेमणूक केली. अर्थ खात्याला त्यांनी करचुकव्यांकडून करवसुलीसाठी जादा अधिकार देऊ केले. करवसुलीसाठी घातलेल्या धाडींमध्ये मोठे नामांकितही होते. कॉग्रेसला निवडणुकीत मदत करणारे अनेक उद्योगपती त्यांच्या यादीत होते म्हणून नाईलाजाने राजीव गांधींनी त्यांना संरक्षण मंत्री बनविले. संरक्षण खात्यात काम करताना त्यांना बोफोर्स तोफांच्या व्यवहाराविषयी माहिती हाती मिळाली. त्या माहितीच्या आधारे पंतप्रधान खाते अडचणीत येणार होते. त्यामुळे त्यांना काढून टाकण्यात आलं. खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी जनता दल पक्षाची स्थापना केली.1889 साली भाजपाच्या साथीने त्यांनी काँग्रेसचा पराभव केला. सामाजिक क्षेत्रातल्या नोक-यांत ओबीसींना आरक्षण मिळावं यासाठी मंडल आयोगाच्या शिफारशी अंमलात आणायच्या त्यांनी ठरविल्यामुळे तसंच रामजन्मभूमी अशा मुद्यावर त्याचे भाजपासोबत मतभेद झाल्यामुळे त्याचं सरकार कोसळलं . 1998 मध्ये त्यांना कॅन्सर झाल्याचं डॉक्टरांच्या तपासणीत निष्पन्न झालं. 2003 मध्ये थोडा आराम पडल्यावर पुन्हा ते जनता दलाच्या सामाजिक कार्यात दिसू लागले होते.

आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Updated On: Nov 27, 2008 10:08 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 27, 2008 10:08 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...