टीम अण्णा उद्या उपोषण सोडणार, राजकारणात उतरणार

02 ऑगस्टदेशातील जनतेला आता वेगळा पर्याय देणे गरजेचं आहे. भ्रष्टाचाराविरोधात वेगळा राजकीय पर्याय देण्याची गरज आहे. यासाठी आम्ही राजकीय पक्ष उघडणार पण मी त्यामध्ये जाणार नाही बाहेरुन पाठिंबा देईल.मला स्वत:हून निवडणूक लढवायची नाही असं अण्णांनी जाहीर केलं. जे 65 वर्षात झाले नाही ते 3 वर्षात करुन दाखवू असा विश्वासही अण्णांनी व्यक्त केला. तसेच उद्या संध्याकाळी पाच वाजता टीम अण्णांचे सगळे सदस्य उपोषण सोडणार असल्याची घोषणाही टीम अण्णांनी केली. यानंतर ठीक दुपारी साडे तीनच्या सुमाराला अण्णा हजारे यांनी भाषणाला सुरुवात केली. हे सरकार लोकपाल विधेयक आणणार नाही हे स्पष्ट झालं आहे. यांना जनआंदोलनाची भाषा समजत नाही. आम्हाला अनेक मान्यवरांनी राजकारणात उतरण्याचा सल्ला दिला. देशालाही आता वेगळ्या पर्यायाची गरज आहे. आमचा लढा हा व्यवस्था परिवर्तनासाठी आहे. काँग्रेस सरकारला खाली खेचण्यासाठी नाही. जर देशातील तरुणांनी पर्याय दिला तर राजकीय पक्ष शक्य आहे. यासाठी स्वच्छ चारित्र्याचे,सुशिक्षित, सामाजिक कार्यकर्त्यांनी देशसेवेसाठी पुढे यावे त्यांना निवडणुकीत पाठिंबा देऊ असं अण्णांनी जाहीर केलं. जे 65 वर्षात झाले नाही ते 3 वर्षात करुन दाखवू असा विश्वासही अण्णांनी व्यक्त केला. टीम अण्णांचे मुख्य सदस्य अरविंद केजरीवाल यांनी सरकारवर घणाघाती टीका केली. या सरकारला जनतेशी काही घेणं देणं नाही. ते आपल्या राजकारणात दंग आहे. आपण निवडून दिलेल्या प्रतिनिधींनीच भ्रष्टाचाराचा डोंगर उभारला आहे. आता यांना यांची जाग दाखवण्याची वेळ आली आहे. मान्यवरांनी दिलेल्या सल्ला आम्हाला मान्य आहे याबद्दल जनतेनी आम्हाला लोकं कसे निवडावे याबद्दल सुचना दोन दिवसात द्याव्यात असं आवाहन केजरीवाल यांनी केलं. या सरकारकडून आम्हाला कोणत्याही अपेक्षा नाही मुळात हे सरकार मुके बहिरे झाले आहे. यांना जनतेचा आवाज ऐकू जात नाही यांना यांच्यासोबत येऊन लढा द्यावा लागणार आहे. राजकीय पक्ष काढण्याबाबत लवकरच टीम अण्णांची कोअर कमिटीची बैठक होईल त्यात योग्य तो निर्णय घेतला जाईल.आमचा लढा भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे यासाठी स्वच्छ चारित्र्याच्या लोकांना आम्ही पाठिंबा देऊ असंही केजरीवाल यांनी स्पष्ट केलं. अण्णांनी या अगोदर आयबीएन नेटवर्कला दिलेल्या मुलाखतीत राजकारणाच्या आखाड्यात उतरण्याचे संकेत दिले होते.गेल्या दीड वर्षांपासून टीम अण्णांनी पुकारलेल्या जनलोकपाल आंदोलनाने आज राजकीय वळण घेतले आहे. चार उपोषण करुन सरकारने कोणतीच पावलं उचलली नसल्याचा आरोप करत टीम अण्णांनी पंतप्रधानांसह 15 केंद्रीय मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप केला. याची चौकशी व्हावी यामागणीसाठी गेल्या नऊ दिवसांपासून टीम अण्णा उपोषण करत आहे. नऊ दिवस होऊन सुध्दा सरकारने या आंदोलनाची कोणतीच दखल घेतली नाही. माजी लष्करप्रमुख व्ही.के.सिंग, व्ही.आर.कृष्णा अय्यर, माजी निवडणूक आयुक्त लिंगडोह, कुलदीप नायर आणि अभिनेते अनुपम खेर यांनी अण्णांनी उपोषण सोडावे आणि संसदेत लढा द्यावा असं आवाहन आज सकाळी केलं होतं.

आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Updated On: Aug 2, 2012 10:48 AM IST

टीम अण्णा उद्या उपोषण सोडणार, राजकारणात उतरणार

02 ऑगस्ट

देशातील जनतेला आता वेगळा पर्याय देणे गरजेचं आहे. भ्रष्टाचाराविरोधात वेगळा राजकीय पर्याय देण्याची गरज आहे. यासाठी आम्ही राजकीय पक्ष उघडणार पण मी त्यामध्ये जाणार नाही बाहेरुन पाठिंबा देईल.मला स्वत:हून निवडणूक लढवायची नाही असं अण्णांनी जाहीर केलं. जे 65 वर्षात झाले नाही ते 3 वर्षात करुन दाखवू असा विश्वासही अण्णांनी व्यक्त केला. तसेच उद्या संध्याकाळी पाच वाजता टीम अण्णांचे सगळे सदस्य उपोषण सोडणार असल्याची घोषणाही टीम अण्णांनी केली.

यानंतर ठीक दुपारी साडे तीनच्या सुमाराला अण्णा हजारे यांनी भाषणाला सुरुवात केली. हे सरकार लोकपाल विधेयक आणणार नाही हे स्पष्ट झालं आहे. यांना जनआंदोलनाची भाषा समजत नाही. आम्हाला अनेक मान्यवरांनी राजकारणात उतरण्याचा सल्ला दिला. देशालाही आता वेगळ्या पर्यायाची गरज आहे. आमचा लढा हा व्यवस्था परिवर्तनासाठी आहे. काँग्रेस सरकारला खाली खेचण्यासाठी नाही. जर देशातील तरुणांनी पर्याय दिला तर राजकीय पक्ष शक्य आहे. यासाठी स्वच्छ चारित्र्याचे,सुशिक्षित, सामाजिक कार्यकर्त्यांनी देशसेवेसाठी पुढे यावे त्यांना निवडणुकीत पाठिंबा देऊ असं अण्णांनी जाहीर केलं. जे 65 वर्षात झाले नाही ते 3 वर्षात करुन दाखवू असा विश्वासही अण्णांनी व्यक्त केला.

टीम अण्णांचे मुख्य सदस्य अरविंद केजरीवाल यांनी सरकारवर घणाघाती टीका केली. या सरकारला जनतेशी काही घेणं देणं नाही. ते आपल्या राजकारणात दंग आहे. आपण निवडून दिलेल्या प्रतिनिधींनीच भ्रष्टाचाराचा डोंगर उभारला आहे. आता यांना यांची जाग दाखवण्याची वेळ आली आहे. मान्यवरांनी दिलेल्या सल्ला आम्हाला मान्य आहे याबद्दल जनतेनी आम्हाला लोकं कसे निवडावे याबद्दल सुचना दोन दिवसात द्याव्यात असं आवाहन केजरीवाल यांनी केलं.

या सरकारकडून आम्हाला कोणत्याही अपेक्षा नाही मुळात हे सरकार मुके बहिरे झाले आहे. यांना जनतेचा आवाज ऐकू जात नाही यांना यांच्यासोबत येऊन लढा द्यावा लागणार आहे. राजकीय पक्ष काढण्याबाबत लवकरच टीम अण्णांची कोअर कमिटीची बैठक होईल त्यात योग्य तो निर्णय घेतला जाईल.आमचा लढा भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे यासाठी स्वच्छ चारित्र्याच्या लोकांना आम्ही पाठिंबा देऊ असंही केजरीवाल यांनी स्पष्ट केलं. अण्णांनी या अगोदर आयबीएन नेटवर्कला दिलेल्या मुलाखतीत राजकारणाच्या आखाड्यात उतरण्याचे संकेत दिले होते.

गेल्या दीड वर्षांपासून टीम अण्णांनी पुकारलेल्या जनलोकपाल आंदोलनाने आज राजकीय वळण घेतले आहे. चार उपोषण करुन सरकारने कोणतीच पावलं उचलली नसल्याचा आरोप करत टीम अण्णांनी पंतप्रधानांसह 15 केंद्रीय मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप केला. याची चौकशी व्हावी यामागणीसाठी गेल्या नऊ दिवसांपासून टीम अण्णा उपोषण करत आहे. नऊ दिवस होऊन सुध्दा सरकारने या आंदोलनाची कोणतीच दखल घेतली नाही. माजी लष्करप्रमुख व्ही.के.सिंग, व्ही.आर.कृष्णा अय्यर, माजी निवडणूक आयुक्त लिंगडोह, कुलदीप नायर आणि अभिनेते अनुपम खेर यांनी अण्णांनी उपोषण सोडावे आणि संसदेत लढा द्यावा असं आवाहन आज सकाळी केलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 2, 2012 10:48 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...