निवडणुकीच्या आजच्या सर्व बातम्या फक्त 'एका क्लिक'वर

निवडणुकीच्या आजच्या सर्व बातम्या फक्त 'एका क्लिक'वर

  • Share this:

VIDEO : सगळ्यांचा हिशेब मांडला जाईल; मेरठमध्ये मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल

मिरत - 'सगळ्यांचा योग्यवेळी हिशेब मांडला जाईल,'' असं म्हणत पंतप्रधान मोदींनी मेरठमध्ये गुरुवार (28 मार्च) रोजी पार पडलेल्या प्रचारसभेत काँग्रेसवर निशाणा साधला. ''अंतराळात सर्जिकल स्ट्राईक करण्याचं धाडस केवळ भाजप सरकारमध्येच आहे. त्यामुळे संकल्पांना सिद्धीस नेणारं हे सरकार पुन्हा एकदा सत्तेत येणार,'' असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. ''मी चौकीदार आहे कधी कुणावर अन्याय करणार नाही. तुमचं प्रेम मी व्याजासहीत परत करेन'' असंही ते म्हणाले.

पार्थ पवारांची स्टंटबाजी, कोणतीही सभा नसताना धावले? पाहा व्हिडीओ

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसने मावळमधून पार्थ पवार यांना उमेदवारी दिली. पण त्यांना पहिल्या भाषणापासून टीकेचा सामना करावा लागत आहे. मराठी स्पष्ट बोलता येत नसल्याने पार्थ पवारांची सोशल मीडियावर खिल्ली उडवण्यात आली होती. त्यानंतर एका धार्मिक कार्यक्रमात गाण्यावर धरलेला ठेकासुद्धा ट्रोलर्सच्या नजरेतून सुटला नाही.

VIDEO: शरीरानं काँग्रेसमध्ये, मन मात्र तुमच्यातच अडकलं - गडकरी

नागपूर : नागपुरामध्ये प्रचार कार्यालयाच्या उद्घाटन समारंभात नितीन गडकरी म्हणाले की, ''मोठ्या प्रमाणात काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मला फोन करून सांगतात की, काळजी करू नका आणि गैरसमजही करून घेऊ नका. शरीर जरी तिथं असलं तरी मन मात्र तुमच्यातच अडकलं आहे,''

SPECIAL REPORT: मावळमध्ये जोरदार रणधुमाळी; बारणे विरूद्ध पार्थ लढाई रंगात

मावळ : काही दिवसांपूर्वीच आपल्या पहिल्या भाषणामुळे ट्रोल झालेले मावळ लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवारांच्या तोंडून आता विरोधकांची खिल्ली उडवणारी वक्तव्य ऐकायला मिळत आहेत. त्यामुळे ह्या मतदारसंघात उमेदवारांमध्ये वाकयुद्ध चांगलच रंगणार हे स्पष्ट झालय.

पुण्यात काँग्रेसचा सावळा गोंधळ, घोषणा नाही मात्र उमेदवाराचा प्रचार सुरू

पुणे : पुण्याचा उमेदवार निवडण्यावरून काँग्रेसमध्ये सुरू असलेला घोळ अजुन संपलेला नाही. काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांचं नाव काँग्रेसने निश्चित केलंय पण त्याच्या नावाची अधिकृत घोषणा अजुन झालेली नाही. गेली काही दिवस काँग्रेसचा उमेदवार कोण याचीच चर्चा सुरू होती. दिल्लीतल्या श्रेष्ठींनी आपलं मत शिंदे यांच्या पारड्यात टाकल्याने त्यांची उमेदवारी पक्की झाली अशी माहिती सूत्रांनी दिली. घोषणा अजुन होत नसली तरी स्वयंघोषीत उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केलीय.

VIDEO : किरीट सोमय्यांचं काय होणार? मातोश्री भेटीनंतर भाजपचे प्रसाद लाड म्हणतात...

मुंबई: ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात भाजप खासदार किरीट सोमय्या यांच्याविरोधात शिवसैनिकांनी 'एकच स्पीरीट नो किरीट' हा नारा दिला आहे. प्रथम मातोश्रीवरुन सोमय्या यांची भेट नाकारली त्यानंतर शिवसेना आमदार सुनिल राऊत यांनी सोमय्यांच्या विरोधात निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केलं आहे. या पार्श्वभूमीवर तोडगा काढण्यासाठी भाजपचे आमदार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू मानले जाणारे प्रसाद लाड यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे.

VIDEO : सतेज पाटलांबरोबर वाद, अर्ज भरायला निमंत्रण देणार? महाडिकांची पहिली प्रतिक्रिया

कोल्हापूर: कोल्हापूर मतदारसंघातून धनंजय महाडिक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आहेत. मात्र राज्याता आघाडी झालेली असताना कोल्हापुरात मात्र आघाडीच्या नेत्यांमध्ये वाद आहे. काँग्रेस आमदार सतेज पाटील हे शिवसेना उमेदवाराचा प्रचार करत असल्याचा आरोप होत आहे. या सगळ्यावर धनंजय महाडिक यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

शिवाजी पार्कच्‍या बाभळीला बारामतीची बोरे, राज ठाकरे यांच्यावर हल्लाबोल

मुंबई : मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी लोकसभेची निवडणूक न लढविण्याची घोषणा केली मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींविरूद्ध मतदान करा असं आवाहन केलं होतं. राज यांच्या मोदी विरोधामुळे भाजपचे मुंबई शहराध्यक्ष आशीष शेलार यांनी राज ठाकरे यांच्यावर शेलक्या शब्दात टीका केलीय.

VIDEO 'वसंतदादा पाटील घराण्याची वाट काँग्रेस-राष्ट्रवादीनेच लावली'

सांगली : लोकसभेच्या मतदानाला काही दिवस शिल्ल्क असतानाच काँग्रेसचे नेते आणि माजी राज्यमंत्री प्रतिक पाटील यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. त्यामुळे काँग्रेसला धक्का बसलाय. आता महसूलमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक पाटीलांवरून काँग्रेस-राष्ट्रवादीवर गंभीर आरोप केलाय.

VIDEO कसलंही वारं आलं तरी बारामतीत पवारच - सुप्रिया सुळे

बारामती, 28 मार्च: केंद्रातल्या भाजप सरकारने गेल्या पाच वर्षात जाहिरातींवर तब्बल 10 हजार 110 कोटी रुपये खर्च केले असा आरोप राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. हेच पैसे जर जनतेसाठी वापरले असते तर त्यांचं भलं झालं असतं असही त्या म्हणाल्या. देशात आणि राज्यात कसलही वारं आलं तरी बारामतीत पवारच येणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

VIDEO : '...तर हीच बॅट डोक्यात घालणार', अर्ज भरताना राजू शेट्टींची आक्रमक प्रतिक्रिया

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आज हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी राजू शेट्टी म्हणाले की, 'मी शेतकरी आहे, त्यामुळे कोणत्या अवजारांचा कधी वापर करायचा हे मला माहीत आहे. सत्ताधाऱ्यांना जागं करण्यासाठी त्यांच्या डोक्यात बॅट घालू.' ते नेमकं काय म्हणाले पाहा

सुजय विखे Vs संग्राम जगताप लढतीत नवा ट्विस्ट, 'या' उमेदवाराने घेतली उडी

अहमदनगर: अहमदनगर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी आणि भाजपबरोबर आता आणखी एका उमेदवाराने उडी घेतली आहे. मराठा क्रांती मोर्च्याचे समन्वयक आणि शिवप्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजीव भोर हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

जळगावमध्ये नाट्यमय राजकीय घडामोडी, भाजप उमेदवार बदलणार?

जळगाव : जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी भाजपने स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली आहे. मात्र आता स्मिता वाघ यांच्या नावाबाबत भाजपकडून पुनर्विचार केला जातोय की, अशी शक्यता निर्माण झाली आहे. सविस्तर बातमी इथे वाचा

जिवाशिवाची बैलजौडी... राजू शेट्टींच्या यात्रेत का आले योगेंद्र यादव?

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यावेळीही हातकणंगले मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. मागच्या निवडणुकीत ते याच मतदारसंघातून भाजपचा मित्रपक्ष म्हणून लढले होते. आता मात्र त्यांनी भाजपची साथ सोडत आघाडीची गाडी पकडली आहे.

'या' मतदारसंघात 101 उमेदवार, आयोगाला घ्यावा लागणार 1996 सालचा निर्णय?

बेळगाव: लोकसभेच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. सर्वच पक्षांनी कंबर कसली असून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होत आहेत. जवळपास सर्व पक्षांनी उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या आहेत. दरम्यान आता बेळगाव मतदार संघाची चर्चा सुरू आहे. सीमाप्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे बेळगावमध्ये 101 उमेदवारानी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.

'खुदा कसम, ... तर मोदींना तुरुंगात टाकेन'

श्रीनगर: नॅशनल कॉन्फरन्सचे नेते लोन यांच्यानंतर आणखी एका नेत्याने वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. माजी आमदार जावेद अहमद राणा यांनी पूंछ येथे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अपशब्द काढले.

'खातं उघडलं नाही आणि म्हणे पैसे जमा करणार', PM मोदींनी फोडला प्रचाराचा नारळ

मेरठ : ज्यांनी गरिबांची बँक खाती उघडली नाहीत ते त्यांच्या खात्यात पैसे काय जमा करणार, असा सवाल करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर हल्ला चढवला. उत्तर प्रदेशमधील मेरठ येथील प्रचार सभेतून मोदींनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला.

शत्रुघ्न सिन्हांनी सोडला भाजपचा हात, आता देणार राहुल गांधींना साथ!

नवी दिल्ली:भारतीय जनता पक्षाचे बंडखोर नेते आणि खासदार अभिनेते सिन्हा शत्रुघ्न सिन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. सिन्हा यांनी आज काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली. 6 एप्रिलला त्यांची औपचारिक घोषणा होणार आहे.

शिवसेना या राज्यांमध्ये 'भाजप'विरुद्ध निवडणूक लढणार

कोलकता : महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेना 'एकदिलाने' लोकसभेच्या रणांगणात उतरले आहेत. मात्र इतर काही राज्यांमध्ये मात्र शिवसेना भाजपविरुद्ध उमेदवार उभे करणार आहे. पश्चिम बंगालमध्ये शिवसेना पहिल्यांदाच निवडणूक लढविणार आहे.सेनेने 15 जागांवर उमेदवार उभे करणार असून त्यातल्या 11 नावांची घोषणा करण्यात आली आहे.

भारतीय निवडणुकांच्या इतिहासात या उमेदवाराच्या नावावर आहे अनोखा विक्रम

मुंबई : अमूक नेता इतक्या वेळा जिंकला, विजयाची हॅटट्रिक, कधीही न हरलेला नेता अशा अनेक राजकीय यशोगाधा आपण आतापर्यंत ऐकल्या असतील. पण एक उमेदवार भारतीय निवडणुकीच्या इतिहासात गाजला तो सर्वात अपयशी उमेदवार म्हणून. सर्वाधिक वेळा निवडणूक हरण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. तामिळनाडूतील या उमेदवाराचं नाव आहे - डॉ. के पद्मराजन. 'ऑल इंडिया इलेक्शन किंग' असं बिरूद त्यांनी स्वतःच लावून घेतलं आहे.

लालूंच्या कुटुंबात यादवी : आधी पत्नीला घटस्फोट आणि आता भावाला आव्हान

पाटणा : बिहारमधलं महागठबंधन वाचवण्यासाठी कसोशीने प्रयत्न सुरू असतानाच राष्ट्रीय जनता दलामध्येच फूट पडल्याचं समोर आलं आहे. लालूप्रसाद यादव यांचा मुलगा तेजप्रताप यादव हे काही काळ राजकारणापासून दूर होते. पण आता मात्र त्यांनी उमेदवारांची नावं घोषित करून तेजस्वी यादव यांची डोकेदुखी वाढवली आहे. तेजप्रताप यादव यांनी दोन जागांवरच्या उमेदवारांची नावंही घोषित करून टाकली.

First published: March 28, 2019, 8:36 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading