बॉलीवुडचा डर्टी पिक्चर ; ब्लॅक मनी होतोय व्हाईट

10 जुलैबॉलीवुडच्या चंदेरी दुनियेच्या काळा अंधारात होत असलेल्या काळ्या कारभाराचा कोब्रा पोस्ट आणि आयबीएन नेटवर्कने पर्दाफाश केला आहे. बॉलीवुडमध्ये अनेक सिनेमात ब्लॅक मनी व्हाईट करण्याचा धंदा राजरोसपणे सुरु असल्याचं उघड झालं आहे. हा पैसा कोटीच्या घरातला पण व्यवहार होतोय फक्त लाखांच्या घरात..एवढंच नाहीतर फक्त 25 टक्के पैसा हा व्हाईट वापरला जातो आणि बाकीचा 75 टक्के पैसा हा ब्लॅक मनी वापरला जात असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. याही पेक्षा ज्यांच्या चित्रपटांचे तोंडभरून आपण कौतुक केले असे दिग्दर्शक निर्माते या धंद्यात आपल्या तुंबड्या भरत असल्याचे समोर आले आहे. यामध्ये वाशू भगनानी, अनीस बझमी, अनुभव सिन्हा, राजीव कौल कॅमेर्‍यात कैद झाले आहे. हिंदी फिल्म इंडस्ट्रीतला प्रसिध्द निर्माता, वाशू भागनानी... कुली नं. 1, बडे मियाँ छोटे मियाँ, डू नॉट डिस्टर्ब आणि फालतू या सिनेमांची निर्मिती वाशू भागनानीने केली आहे. पण या सिनेमांमध्ये पैसा गुंतवणारे कोण आहेत आणि त्याबदल्यात वाशूने त्यांना कोणते वायदे केले ? आमचे अंडरकव्हर रिपोर्टर वाशू भगनानींना त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन भेटले आणि भगनानीने दाखवलं काळा पैसा पांढरा करण्याचं बॉलीवूडचं डर्टी पिक्चर...त्यांच्यात झालेला हा संवाद वाशू - काळा पैसा पांढरा करण्याचे मला अनेक मार्ग माहिती आहेत...पण पैसे गुंतवणारा माणूस विश्वासाचा पाहिजे, इन्कमटॅक्सच्या जाळ्यात आपण अडकता कामा नयेरिपोर्टर - मग जर आम्हाला 10 कोटी गुंतवायचे असतील, तर मग चेकमध्ये किती आणि कॅशमध्ये किती असतील ?वाशू - आठ कोटी कॅश आणि 2 कोटी चेकमध्ये... कागदावर फक्त दोन कोटीचा व्यवहार असेलरिपोर्टर - ठीक आहे, मग आम्ही करार करण्यासाठी एक कंपनी तयार करतोवाशू - मग गेल्या 50-60 वर्ष सुरु असलेल्या पध्दतीप्रमाणे आपल्याला एक करार करावा लागेल, तुमचे पैसे वसूल झाल्यावर जो नफा होईल त्यात आपला वाटा असेल 50-50...आणि तुमचे पैसे तुम्हाला चेकमध्ये मिळेल. सिनेमा रिलीज झाल्यावर तुम्हाला तुमचे पैसे मिळतील, तुम्ही मला कॅश देऊ शकता, कागदोपत्री व्यवहाराची गरज नाही आणि तुम्हीसुध्दा सिनेमाचे डिस्ट्रीब्युटर असालं.या अशा डीलमध्ये फायनान्सर आणि निर्माते अशा दोघांचाही फायदा आहे, फिल्म डिस्ट्रीब्युशनच्या माध्यमातून फायनान्सरचा काळा पैसा पांढरा होतो, आणि निर्मात्याला सिनेमा बनवायला पैसे मिळतात आणि नफा झालाच तर त्यातला वाटाही मिळतो. बॉलीवुडचा डर्टी पिक्चर: अनीस बाझमी आणि राजीव कौलस्थळ : जुहू हॉटेल, मुंबई वेळ : दु. 2 वा. इथे एक सिक्रेट मीटिंग होणार आहे या मीटिंगचा अजेंडा आहे. बॉलिवूडमार्फत कोट्यवधींचा काळा पैसा पांढरा करण्याचा. या मीटिंगला हजर असलेले दोघेजण ही सिनेमातली दोन बडी नावं आहेत. अनीस बाझमी हा मोठमोठ्या हिट सिनेमांचा दिग्दर्शक आहे. नो एन्ट्री, सिंग इज किंग आणि रेडी हे सिनेमा त्याच्या नावावर आहेत आणि राजीव कौल..आहे प्रतिष्ठिीत लेखक. दिल, बेटा, वेलकम आणि रेडी या सिनेमाचं स्क्रिप्ट त्यानं लिहिलंय आणि एक आहे. कोब्रापोस्टचा अंडरकव्हर रिपोर्टर. त्यानं त्यांच्या काळा पैसा पांढरा करून हवाय, असं नाटक केलंय. रिपोर्टर : सर आमचा प्रॉब्लेम आहे की..आमच्याकडे जास्त कॅश आहे..जास्त काळा पैसा आहे..तो आम्हाला ऍडजस्ट करून हवाय.अनीस - काही हरकत नाही..तुम्हाला जेवढे पैसे हवेत तेवढे रोख द्या आणि हवेत तेवढे चेकने द्या राजीव : मी त्याला (रिपोर्टरला) सांगितलंय..तो मला आता काही कॅश देऊ शकतो. आणि चेक नंतर देऊ शकतो.रिपोर्टर : जेवढा पैसा आम्ही फिल्म बिझनेसमधून टाकतोय तो पांढरा होणं आमच्यासाठी महत्त्वाचं आहे.राजीव : मी तुम्हाला सांगितलंय. यात कॉर्पोरेट्स ही येतील आणि त्यामुळे तुम्हाला ते सोपं होईलरिपोर्टर : अनीस साब..तुमचा ऍडव्हान्स किती असेल ?अनीस : 5 कोटी...4 कोटी..एक कोटी चेकने.रिपोर्टर - मग आम्ही आता कॅशने पैसे देतोय. आम्हाला काही लेखी मिळेल का ?अनीस : हे कसं शक्य आहे..?रिपोर्टर : नाही..काहीतरी..ठोस...खात्रीसाठी ...अनीस : आपण जेव्हा फ्लॅट विकत घेतो तेव्हा 10 हजार स्क्वे. फूटासाठी 4000 रु. देतो आणि ऍग्रीमेंट करतो 6 000 स्क्वे. फुटांचंरिपोर्टर - हो. पण ती प्रॉपर्टी असते.अनीस - हो . हे अगदी प्रॉपर्टी बिझनेससारखंच आहे.अनीस बाझमी समजावून सांगतो. फिल्म इंडस्ट्री आणि रिअल इस्टेटमध्ये काळा पैसा कशी भूमिका निभावतोय. फिल्म इंडस्ट्रीमध्ये गुंतवलेल्या पैशांपैकी 60 टक्के पैसा काळा पैसा आहे. फक्त 40 टक्के पांढरा पैसा आहे. बाझमी अशीही हिंट देतो की कॉर्पोरेटचा पैसा यात येतोय. फिल्म इंडस्ट्रीला पैसा पुरवण्यात काळा पैसा मोठी भूमिका बजावतोय. याबद्दल राजीव कौल आणखी समजावून सांगत आहे. रिपोर्टर - आपले 30-35 कोटी परत येतीलराजीव - हो. तुम्ही काळ्‌या आणि पांढर्‍या पैशाची गुंतवणूक करू शकता. काळे आणि पांढरे पैसे मिळून 40 पर्यंत आहेत.रिपोर्टर - हं..राजीव - उरलेल्या 20 साठी आपण यात कॉर्पोरेटना आणू आणि कॉर्पोरेट आपल्याला व्हाइटमध्ये पेमेंट करेल. आपला पैसा पांढरा होईल आणि फायदाही होईलरिपोर्टर - ओकेराजीव - याचा फायदा असा की हा पैसा कॉर्पोरेट टाकेल आणि त्यांना पांढर्‍या पैशात फंड मिळतीलरिपोर्टर - तर मग...टेन्शन नाहीकाळा पैसा स्वच्छ करण्यासाठी फिल्म मेकर्स कॉर्पोरेटचा कसा वापर करून घेतात हे प्रसिद्ध दिग्दर्शक अनीस बाझमी आणि राजीव कौल यांनीच उघड केलंय. अपूर्ण सिनेमा आधी कॉर्पोरेट फर्म्सना विकला जातो. आणि मग हे कॉर्पोरेट फर्म्स फिल्म मेकरना चेकने पैसे देतात. फिल्म मेकर हे चेक त्यांच्या फिल्मममध्ये काळा पैसा गुंतवणार्‍यांना देतात. आणि या गुंतवणूकदारांचा काळा पैसा पांढरा होऊन जातो. बॉलीवुडचा डर्टी पिक्चर : संदीप मारवाहसंदीप मारवाह यांचा नोएडामधल्या फिल्म सिटीत फिल्म इन्स्टिट्यूट आणि स्टुडिओ आहे. कोब्रा पोस्टचा अंडरकव्हर एजंट संदीप मारवाहांना भेटला. मारवाहानं आम्हाला सांगितलं बोनी कपूर आणि अनिल कपूरशी त्यांचे अगदी घरगुती संबंध आहे. त्यांच्यासोबत एक सिनेमा करू आणि त्या सिनेमात काळा पैसा सहजपणे टाकता येईल. मारवाह : मी आजच संध्याकाळी बोनीशी बोलू शकतो. तो प्रोडक्शनचं सर्व काम सांभाळतो. मला तुमच्याबद्दल थोडी माहिती सांगा.रिपोर्टर : मी एक काम करतो सर, मी माझ्या सीएला एक कंपनी रजिस्टर करायला सांगतो आणि त्या कंपनीच्या नावाखाली तुमच्यासोबत काम करू.रिपोर्टर : आम्हाला सिनेमांबद्दल खूप काही माहिती नाही. तुमच्या सल्ल्यानंच आम्ही काम करू. पण पेमेंटच्या बाबतीत आम्ही फक्त 90 टक्के ब्लॅक देऊ उरलेले 10 टक्के कॅश देऊ.मारवाह : काहीच हरकत नाहीमारवाह : पण प्रोजेक्ट सुरू करण्यासाठी आधी तुम्हाला 5 ते 10 लाख रुपये तात्काळ द्यावे लागतील. रिपोर्टर : ठिक आहे, ठिक आहे70 सिनेमांची निर्मिती करणारे संदीप मारवाह जुने-जाणते निर्माते आहेत. सिनेमाच्या व्यवसायात काळा पैसा सर्रास वापरतात, हे त्यांनीच मान्य केलं. यानंतर आम्ही गेलो मुंबईतल्या जुहू हॉटेलमध्ये. इथे आम्ही शैलेश आर. सिंग या निर्मात्याला भेटलो. त्यांनी तनू वेड्स मनू आणि बस एक पल सारखे सिनेमे केलेत. त्यांनीही कोब्रापोस्टच्या अंडरकव्हर एंजटशी काळ्या पैशासंदर्भात डील फायनल केली. रिपोर्टर : कॅश किती आणि चेकनं किती पैसे द्यायचे? तुम्ही किती ब्लॅक मनी घ्याल?शैलेश सिंग : 80 टक्के कॅशही चालेलरिपोर्टर : इरफानला किती द्यावे लागतील?शैलेश सिंग : सायनिंग अमाऊंट म्हणून किमान 25 लाख रुपये द्यावे लागतील. व्हाईट...इरफान खानला सिनेमात मुख्य भूमिकेत घेऊ, असं आश्वासनच शैलेशनं दिलं. अभिनेतेही त्यांचं पेमेंट चेकपेक्षा कॅश म्हणजेच काळ्या पैशाच्या रुपात घेणं पसंत करतात, असं शैलेशनं आम्हाला सांगितलं. शिवाय पैशांच्या अफरातफरीचेही त्यांचे स्वत:चे काही नियम आहेत. रिपोर्टर : पण तो कॅश किती घेईल?शैलेश सिंग : किमान दीड कोटी. ते तुम्ही पूर्ण कॅश देऊ शकता. काहीच टेंशन नाहीरिपोर्टर : काहीच हरकत नाहीशैलेश सिंग : तो कॅशच पसंत करतोरिपोर्टर : तर समजा 15 कोटी गुंतवले तर किती नफा होईल?शैलेश सिंग : तुम्हाला चेक हवा आहे, बरोबर? आम्ही तुम्हाला चेक देऊ आणि तुम्ही नफा रजिस्टर करून टॅक्स भरू शकता. रिपोर्टर : आणि मला नफ्यात किती वाटा मिळेल?शैलेश सिंग : जो काही मला मिळेत त्याच्या 1/3 (एक तृतीआंश), 35 टक्केइन्कम टॅक्स डिपार्टमेंटचा ससेमिरा लागलेल्या उत्तर प्रदेशचा लिकर बॅरन पॉन्टी चढ्ढा यानेही डिस्ट्रीब्युटर म्हणून तनू वेड्स मनू या सिनेमात पैसा लावल्याचं शैलेश सिंगनं सांगितलं. रिपोर्टर : तनू वेड्स मनूमध्येही असंच झालं होतं का?शैलेश सिंग : पॉन्टी चढ्ढानं दिल्ली आणि उत्तर प्रदेशातल्या चित्रपटगृहांमध्ये गुंतवणूक केली होतीशैलेश सिंग : आम्हाला बोनस मिळालारिपोर्टर : म्हणजे पॉन्टी चढ्ढाला पैसे चेकनं मिळाले, चेक म्हणेज व्हाईट मनीसंदीप मारवाहप्रमाणेच शैलेश सिंग यांनीही बॉलीवुडमधला हा काळा कारभार उघडपणे मान्य केला. ब्लॅक मनी सिनेमात लावायचा आणि तो व्हाईट करून घ्यायचा. पैसा लावणाराही फायद्यात आणि सिनेमाचा निर्माताही..बॉलीवुडचा डर्टी पिक्चर : अनुभव सिन्हा'रा वन' ही बॉलिवूडमधली सगळ्यात महागडी फिल्म आहे. अशाप्रकारचे बिग बजेटच्या फिल्म्सना सिन्हांसारखे दिग्दर्शक पैसा कसा मिळवतात ? किंवा यात काही काळ्या पैशाचा वापर केला जातो ? कोब्रापोस्टचा अंडर रिपोर्टर दिग्दर्शक अनुभव सिन्हाच्या मुंबईतल्या ऑफिसमध्ये भेटला. आणि त्या रिपोर्टरला त्याचा काळा पैसा गुंतवायचा आहे सांगून त्यांने याबाबत अनुभव सिन्हाशी संवाद साधला. अनुभव - मी तुम्हाला आश्वासन देतो की तुम्ही दोन फिल्म्समध्ये 5 कोटी रुपये गुंतवले, तर मी तुम्हाला एका वर्षांत नक्की 6 कोटी परत देईन. रिपोर्टर - ओके ओकेअनुभव - आणि पिक्चर यशस्वी झाला, तर तुम्हाला नफ्यातले 10 किंवा 11 टक्के मिळतीलरिपोर्टर - नफ्याची विभागणी. होय. तेच मला हवंय. अनुभव - बर्‍याचदा लोक पैसे गुंतवतात, पण पोस्टरवर त्यांचं नावही येत नाही. तुमच्या बाबतीतही तसंच करूयात. कारण तुम्ही हे गोपनीय ठेवू इच्छिताय. रिपोर्टर - सावध राहणं कधीही चांगलं. अनुभव - कुणी विचारलं तर मी काही बोलणार नाही. मी अनेकांना भेटतो, जे पैसे गुंतवू इच्छितात. आजवर कुणाचाही पैसा बुडाला नाही. अनुभव - आता मला सांगा, तुम्ही किती पैसा गुंतवणार ?रिपोर्टर - मी 15 पासून सुरुवात करेन. किती ब्लॅक देऊ आणि किती व्हाईट ?अनुभव - तुम्ही 50 टक्के चेकने देऊ शकता ?रिपोर्टर - नाही. मी 25 टक्क्यांपेक्षा जास्त चेकने देऊ शकत नाही. अनुभव - हं. तर, या फिल्ममध्ये केवळ पंचवीस टक्केच व्हाईट मनी होती. तर उर्वरित 75 टक्के हा काळा पैसा या फिल्मसाठी गुंतवण्यात आला होता. अनुभव सिन्हाने सांगितल्याप्रमाणे, या फिल्मसाठी पैसा गुंतवणार्‍या व्यक्तीचं नाव गुपित ठेवलं जाईल. त्या संबंधित व्यक्तीचं नाव फिल्ममध्ये किंवा त्याच्या प्रसिद्धीसाठी वापरल्या जाणार्‍या होर्डिंग्जवरही लिहिलं जाणार नाही. आता फिल्मचा हा सौदा पुढच्या टप्प्यात जाऊन पोहचलाय. अनुभव सिन्हा आता अंडर कव्हर रिपोर्टरला घेऊन त्याच्या सीएकडं पोहचला.अनुभव- तुम्ही याला सगळे प्रश्न विचारू शकतात. (CAकडे बोट दाखवतो)मध्यस्थ - मी कोऑर्डिनेटर आहे. मी नीट सांगतो. या माणसांना 80 टक्के कॅश आणि 20 टक्के चेकने हवे असतात. रिपोर्टर - की 25 - 75 ?सीए - पिक्चर बनवताना बर्‍याच ठिकाणी कॅश द्यावी लागते. म्हणून आपण त्यांना कॅश द्यायची. आणि नंतर ते आपल्याला चेक देतील. फिल्म इंडस्ट्रीमध्ये ब्लॅक मनी व्हाईट करणं हे कसं सहज शक्य आहे, हे अनुभव सिन्हा आणि त्याच्या सहकार्‍यांनी दाखवून दिलंय. बेहिशेबी प्रॉडक्शन खर्च लपवण्यासाठी वापरला जातो. तसेच कलाकारांचं करारा व्यतिरिक्तचं मानधन देण्यासाठी काळ्या पैशाचा वापर होतो. फिल्मला झालेल्या नफ्याचा हिस्सा काही काळानंतर काळा पैसा गुंतवणार्‍याला दिला जातो. शिवाय या नफ्यातला काही हिस्सा हा अनुभव सिन्हा सारखे दिग्दर्शकही घेतात.

आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Updated On: Jul 10, 2012 03:50 PM IST

बॉलीवुडचा डर्टी पिक्चर ; ब्लॅक मनी होतोय व्हाईट

10 जुलै

बॉलीवुडच्या चंदेरी दुनियेच्या काळा अंधारात होत असलेल्या काळ्या कारभाराचा कोब्रा पोस्ट आणि आयबीएन नेटवर्कने पर्दाफाश केला आहे. बॉलीवुडमध्ये अनेक सिनेमात ब्लॅक मनी व्हाईट करण्याचा धंदा राजरोसपणे सुरु असल्याचं उघड झालं आहे. हा पैसा कोटीच्या घरातला पण व्यवहार होतोय फक्त लाखांच्या घरात..एवढंच नाहीतर फक्त 25 टक्के पैसा हा व्हाईट वापरला जातो आणि बाकीचा 75 टक्के पैसा हा ब्लॅक मनी वापरला जात असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. याही पेक्षा ज्यांच्या चित्रपटांचे तोंडभरून आपण कौतुक केले असे दिग्दर्शक निर्माते या धंद्यात आपल्या तुंबड्या भरत असल्याचे समोर आले आहे. यामध्ये वाशू भगनानी, अनीस बझमी, अनुभव सिन्हा, राजीव कौल कॅमेर्‍यात कैद झाले आहे.

हिंदी फिल्म इंडस्ट्रीतला प्रसिध्द निर्माता, वाशू भागनानी... कुली नं. 1, बडे मियाँ छोटे मियाँ, डू नॉट डिस्टर्ब आणि फालतू या सिनेमांची निर्मिती वाशू भागनानीने केली आहे. पण या सिनेमांमध्ये पैसा गुंतवणारे कोण आहेत आणि त्याबदल्यात वाशूने त्यांना कोणते वायदे केले ? आमचे अंडरकव्हर रिपोर्टर वाशू भगनानींना त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन भेटले आणि भगनानीने दाखवलं काळा पैसा पांढरा करण्याचं बॉलीवूडचं डर्टी पिक्चर...

त्यांच्यात झालेला हा संवाद

वाशू - काळा पैसा पांढरा करण्याचे मला अनेक मार्ग माहिती आहेत...पण पैसे गुंतवणारा माणूस विश्वासाचा पाहिजे, इन्कमटॅक्सच्या जाळ्यात आपण अडकता कामा नयेरिपोर्टर - मग जर आम्हाला 10 कोटी गुंतवायचे असतील, तर मग चेकमध्ये किती आणि कॅशमध्ये किती असतील ?वाशू - आठ कोटी कॅश आणि 2 कोटी चेकमध्ये... कागदावर फक्त दोन कोटीचा व्यवहार असेलरिपोर्टर - ठीक आहे, मग आम्ही करार करण्यासाठी एक कंपनी तयार करतोवाशू - मग गेल्या 50-60 वर्ष सुरु असलेल्या पध्दतीप्रमाणे आपल्याला एक करार करावा लागेल, तुमचे पैसे वसूल झाल्यावर जो नफा होईल त्यात आपला वाटा असेल 50-50...आणि तुमचे पैसे तुम्हाला चेकमध्ये मिळेल. सिनेमा रिलीज झाल्यावर तुम्हाला तुमचे पैसे मिळतील, तुम्ही मला कॅश देऊ शकता, कागदोपत्री व्यवहाराची गरज नाही आणि तुम्हीसुध्दा सिनेमाचे डिस्ट्रीब्युटर असालं.

या अशा डीलमध्ये फायनान्सर आणि निर्माते अशा दोघांचाही फायदा आहे, फिल्म डिस्ट्रीब्युशनच्या माध्यमातून फायनान्सरचा काळा पैसा पांढरा होतो, आणि निर्मात्याला सिनेमा बनवायला पैसे मिळतात आणि नफा झालाच तर त्यातला वाटाही मिळतो.

बॉलीवुडचा डर्टी पिक्चर: अनीस बाझमी आणि राजीव कौल

स्थळ : जुहू हॉटेल, मुंबई वेळ : दु. 2 वा. इथे एक सिक्रेट मीटिंग होणार आहे या मीटिंगचा अजेंडा आहे. बॉलिवूडमार्फत कोट्यवधींचा काळा पैसा पांढरा करण्याचा. या मीटिंगला हजर असलेले दोघेजण ही सिनेमातली दोन बडी नावं आहेत. अनीस बाझमी हा मोठमोठ्या हिट सिनेमांचा दिग्दर्शक आहे. नो एन्ट्री, सिंग इज किंग आणि रेडी हे सिनेमा त्याच्या नावावर आहेत आणि राजीव कौल..आहे प्रतिष्ठिीत लेखक. दिल, बेटा, वेलकम आणि रेडी या सिनेमाचं स्क्रिप्ट त्यानं लिहिलंय आणि एक आहे. कोब्रापोस्टचा अंडरकव्हर रिपोर्टर. त्यानं त्यांच्या काळा पैसा पांढरा करून हवाय, असं नाटक केलंय.

रिपोर्टर : सर आमचा प्रॉब्लेम आहे की..आमच्याकडे जास्त कॅश आहे..जास्त काळा पैसा आहे..तो आम्हाला ऍडजस्ट करून हवाय.अनीस - काही हरकत नाही..तुम्हाला जेवढे पैसे हवेत तेवढे रोख द्या आणि हवेत तेवढे चेकने द्या राजीव : मी त्याला (रिपोर्टरला) सांगितलंय..तो मला आता काही कॅश देऊ शकतो. आणि चेक नंतर देऊ शकतो.रिपोर्टर : जेवढा पैसा आम्ही फिल्म बिझनेसमधून टाकतोय तो पांढरा होणं आमच्यासाठी महत्त्वाचं आहे.राजीव : मी तुम्हाला सांगितलंय. यात कॉर्पोरेट्स ही येतील आणि त्यामुळे तुम्हाला ते सोपं होईलरिपोर्टर : अनीस साब..तुमचा ऍडव्हान्स किती असेल ?अनीस : 5 कोटी...4 कोटी..एक कोटी चेकने.रिपोर्टर - मग आम्ही आता कॅशने पैसे देतोय. आम्हाला काही लेखी मिळेल का ?अनीस : हे कसं शक्य आहे..?रिपोर्टर : नाही..काहीतरी..ठोस...खात्रीसाठी ...अनीस : आपण जेव्हा फ्लॅट विकत घेतो तेव्हा 10 हजार स्क्वे. फूटासाठी 4000 रु. देतो आणि ऍग्रीमेंट करतो 6 000 स्क्वे. फुटांचंरिपोर्टर - हो. पण ती प्रॉपर्टी असते.अनीस - हो . हे अगदी प्रॉपर्टी बिझनेससारखंच आहे.

अनीस बाझमी समजावून सांगतो. फिल्म इंडस्ट्री आणि रिअल इस्टेटमध्ये काळा पैसा कशी भूमिका निभावतोय. फिल्म इंडस्ट्रीमध्ये गुंतवलेल्या पैशांपैकी 60 टक्के पैसा काळा पैसा आहे. फक्त 40 टक्के पांढरा पैसा आहे. बाझमी अशीही हिंट देतो की कॉर्पोरेटचा पैसा यात येतोय. फिल्म इंडस्ट्रीला पैसा पुरवण्यात काळा पैसा मोठी भूमिका बजावतोय. याबद्दल राजीव कौल आणखी समजावून सांगत आहे.

रिपोर्टर - आपले 30-35 कोटी परत येतीलराजीव - हो. तुम्ही काळ्‌या आणि पांढर्‍या पैशाची गुंतवणूक करू शकता. काळे आणि पांढरे पैसे मिळून 40 पर्यंत आहेत.रिपोर्टर - हं..राजीव - उरलेल्या 20 साठी आपण यात कॉर्पोरेटना आणू आणि कॉर्पोरेट आपल्याला व्हाइटमध्ये पेमेंट करेल. आपला पैसा पांढरा होईल आणि फायदाही होईलरिपोर्टर - ओकेराजीव - याचा फायदा असा की हा पैसा कॉर्पोरेट टाकेल आणि त्यांना पांढर्‍या पैशात फंड मिळतीलरिपोर्टर - तर मग...टेन्शन नाही

काळा पैसा स्वच्छ करण्यासाठी फिल्म मेकर्स कॉर्पोरेटचा कसा वापर करून घेतात हे प्रसिद्ध दिग्दर्शक अनीस बाझमी आणि राजीव कौल यांनीच उघड केलंय. अपूर्ण सिनेमा आधी कॉर्पोरेट फर्म्सना विकला जातो. आणि मग हे कॉर्पोरेट फर्म्स फिल्म मेकरना चेकने पैसे देतात. फिल्म मेकर हे चेक त्यांच्या फिल्मममध्ये काळा पैसा गुंतवणार्‍यांना देतात. आणि या गुंतवणूकदारांचा काळा पैसा पांढरा होऊन जातो.

बॉलीवुडचा डर्टी पिक्चर : संदीप मारवाह

संदीप मारवाह यांचा नोएडामधल्या फिल्म सिटीत फिल्म इन्स्टिट्यूट आणि स्टुडिओ आहे. कोब्रा पोस्टचा अंडरकव्हर एजंट संदीप मारवाहांना भेटला. मारवाहानं आम्हाला सांगितलं बोनी कपूर आणि अनिल कपूरशी त्यांचे अगदी घरगुती संबंध आहे. त्यांच्यासोबत एक सिनेमा करू आणि त्या सिनेमात काळा पैसा सहजपणे टाकता येईल.

मारवाह : मी आजच संध्याकाळी बोनीशी बोलू शकतो. तो प्रोडक्शनचं सर्व काम सांभाळतो. मला तुमच्याबद्दल थोडी माहिती सांगा.रिपोर्टर : मी एक काम करतो सर, मी माझ्या सीएला एक कंपनी रजिस्टर करायला सांगतो आणि त्या कंपनीच्या नावाखाली तुमच्यासोबत काम करू.रिपोर्टर : आम्हाला सिनेमांबद्दल खूप काही माहिती नाही. तुमच्या सल्ल्यानंच आम्ही काम करू. पण पेमेंटच्या बाबतीत आम्ही फक्त 90 टक्के ब्लॅक देऊ उरलेले 10 टक्के कॅश देऊ.मारवाह : काहीच हरकत नाहीमारवाह : पण प्रोजेक्ट सुरू करण्यासाठी आधी तुम्हाला 5 ते 10 लाख रुपये तात्काळ द्यावे लागतील. रिपोर्टर : ठिक आहे, ठिक आहे

70 सिनेमांची निर्मिती करणारे संदीप मारवाह जुने-जाणते निर्माते आहेत. सिनेमाच्या व्यवसायात काळा पैसा सर्रास वापरतात, हे त्यांनीच मान्य केलं. यानंतर आम्ही गेलो मुंबईतल्या जुहू हॉटेलमध्ये. इथे आम्ही शैलेश आर. सिंग या निर्मात्याला भेटलो. त्यांनी तनू वेड्स मनू आणि बस एक पल सारखे सिनेमे केलेत. त्यांनीही कोब्रापोस्टच्या अंडरकव्हर एंजटशी काळ्या पैशासंदर्भात डील फायनल केली.

रिपोर्टर : कॅश किती आणि चेकनं किती पैसे द्यायचे? तुम्ही किती ब्लॅक मनी घ्याल?शैलेश सिंग : 80 टक्के कॅशही चालेलरिपोर्टर : इरफानला किती द्यावे लागतील?शैलेश सिंग : सायनिंग अमाऊंट म्हणून किमान 25 लाख रुपये द्यावे लागतील. व्हाईट...

इरफान खानला सिनेमात मुख्य भूमिकेत घेऊ, असं आश्वासनच शैलेशनं दिलं. अभिनेतेही त्यांचं पेमेंट चेकपेक्षा कॅश म्हणजेच काळ्या पैशाच्या रुपात घेणं पसंत करतात, असं शैलेशनं आम्हाला सांगितलं. शिवाय पैशांच्या अफरातफरीचेही त्यांचे स्वत:चे काही नियम आहेत.

रिपोर्टर : पण तो कॅश किती घेईल?शैलेश सिंग : किमान दीड कोटी. ते तुम्ही पूर्ण कॅश देऊ शकता. काहीच टेंशन नाहीरिपोर्टर : काहीच हरकत नाहीशैलेश सिंग : तो कॅशच पसंत करतोरिपोर्टर : तर समजा 15 कोटी गुंतवले तर किती नफा होईल?शैलेश सिंग : तुम्हाला चेक हवा आहे, बरोबर? आम्ही तुम्हाला चेक देऊ आणि तुम्ही नफा रजिस्टर करून टॅक्स भरू शकता. रिपोर्टर : आणि मला नफ्यात किती वाटा मिळेल?शैलेश सिंग : जो काही मला मिळेत त्याच्या 1/3 (एक तृतीआंश), 35 टक्के

इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचा ससेमिरा लागलेल्या उत्तर प्रदेशचा लिकर बॅरन पॉन्टी चढ्ढा यानेही डिस्ट्रीब्युटर म्हणून तनू वेड्स मनू या सिनेमात पैसा लावल्याचं शैलेश सिंगनं सांगितलं.

रिपोर्टर : तनू वेड्स मनूमध्येही असंच झालं होतं का?शैलेश सिंग : पॉन्टी चढ्ढानं दिल्ली आणि उत्तर प्रदेशातल्या चित्रपटगृहांमध्ये गुंतवणूक केली होतीशैलेश सिंग : आम्हाला बोनस मिळालारिपोर्टर : म्हणजे पॉन्टी चढ्ढाला पैसे चेकनं मिळाले, चेक म्हणेज व्हाईट मनीसंदीप मारवाहप्रमाणेच शैलेश सिंग यांनीही बॉलीवुडमधला हा काळा कारभार उघडपणे मान्य केला. ब्लॅक मनी सिनेमात लावायचा आणि तो व्हाईट करून घ्यायचा. पैसा लावणाराही फायद्यात आणि सिनेमाचा निर्माताही..

बॉलीवुडचा डर्टी पिक्चर : अनुभव सिन्हा

'रा वन' ही बॉलिवूडमधली सगळ्यात महागडी फिल्म आहे. अशाप्रकारचे बिग बजेटच्या फिल्म्सना सिन्हांसारखे दिग्दर्शक पैसा कसा मिळवतात ? किंवा यात काही काळ्या पैशाचा वापर केला जातो ? कोब्रापोस्टचा अंडर रिपोर्टर दिग्दर्शक अनुभव सिन्हाच्या मुंबईतल्या ऑफिसमध्ये भेटला. आणि त्या रिपोर्टरला त्याचा काळा पैसा गुंतवायचा आहे सांगून त्यांने याबाबत अनुभव सिन्हाशी संवाद साधला.

अनुभव - मी तुम्हाला आश्वासन देतो की तुम्ही दोन फिल्म्समध्ये 5 कोटी रुपये गुंतवले, तर मी तुम्हाला एका वर्षांत नक्की 6 कोटी परत देईन. रिपोर्टर - ओके ओकेअनुभव - आणि पिक्चर यशस्वी झाला, तर तुम्हाला नफ्यातले 10 किंवा 11 टक्के मिळतीलरिपोर्टर - नफ्याची विभागणी. होय. तेच मला हवंय. अनुभव - बर्‍याचदा लोक पैसे गुंतवतात, पण पोस्टरवर त्यांचं नावही येत नाही. तुमच्या बाबतीतही तसंच करूयात. कारण तुम्ही हे गोपनीय ठेवू इच्छिताय. रिपोर्टर - सावध राहणं कधीही चांगलं. अनुभव - कुणी विचारलं तर मी काही बोलणार नाही. मी अनेकांना भेटतो, जे पैसे गुंतवू इच्छितात. आजवर कुणाचाही पैसा बुडाला नाही. अनुभव - आता मला सांगा, तुम्ही किती पैसा गुंतवणार ?रिपोर्टर - मी 15 पासून सुरुवात करेन. किती ब्लॅक देऊ आणि किती व्हाईट ?अनुभव - तुम्ही 50 टक्के चेकने देऊ शकता ?रिपोर्टर - नाही. मी 25 टक्क्यांपेक्षा जास्त चेकने देऊ शकत नाही. अनुभव - हं.

तर, या फिल्ममध्ये केवळ पंचवीस टक्केच व्हाईट मनी होती. तर उर्वरित 75 टक्के हा काळा पैसा या फिल्मसाठी गुंतवण्यात आला होता. अनुभव सिन्हाने सांगितल्याप्रमाणे, या फिल्मसाठी पैसा गुंतवणार्‍या व्यक्तीचं नाव गुपित ठेवलं जाईल. त्या संबंधित व्यक्तीचं नाव फिल्ममध्ये किंवा त्याच्या प्रसिद्धीसाठी वापरल्या जाणार्‍या होर्डिंग्जवरही लिहिलं जाणार नाही. आता फिल्मचा हा सौदा पुढच्या टप्प्यात जाऊन पोहचलाय. अनुभव सिन्हा आता अंडर कव्हर रिपोर्टरला घेऊन त्याच्या सीएकडं पोहचला.

अनुभव- तुम्ही याला सगळे प्रश्न विचारू शकतात. (CAकडे बोट दाखवतो)मध्यस्थ - मी कोऑर्डिनेटर आहे. मी नीट सांगतो. या माणसांना 80 टक्के कॅश आणि 20 टक्के चेकने हवे असतात. रिपोर्टर - की 25 - 75 ?सीए - पिक्चर बनवताना बर्‍याच ठिकाणी कॅश द्यावी लागते. म्हणून आपण त्यांना कॅश द्यायची. आणि नंतर ते आपल्याला चेक देतील.

फिल्म इंडस्ट्रीमध्ये ब्लॅक मनी व्हाईट करणं हे कसं सहज शक्य आहे, हे अनुभव सिन्हा आणि त्याच्या सहकार्‍यांनी दाखवून दिलंय. बेहिशेबी प्रॉडक्शन खर्च लपवण्यासाठी वापरला जातो. तसेच कलाकारांचं करारा व्यतिरिक्तचं मानधन देण्यासाठी काळ्या पैशाचा वापर होतो. फिल्मला झालेल्या नफ्याचा हिस्सा काही काळानंतर काळा पैसा गुंतवणार्‍याला दिला जातो. शिवाय या नफ्यातला काही हिस्सा हा अनुभव सिन्हा सारखे दिग्दर्शकही घेतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 10, 2012 03:50 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...