कोरोनाचा कहर सुरूच, मृतांच्या आकड्यांमध्ये चीनलाही मागे टाकणार भारत?

कोरोनाचा कहर सुरूच, मृतांच्या आकड्यांमध्ये चीनलाही मागे टाकणार भारत?

लॉकडाऊनमध्येही गेल्या 7 दिवसात दररोज 6 हजारांपेक्षा अधिक नवीन रुग्ण समोर आले आहेत. दुसरीकडे मृतांच्या आकड्यातही वाढ होत आहे

  • Share this:

नवी दिल्ली, 28 मे : भारतात पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहेल. लॉकडाऊनमध्येही गेल्या 7 दिवसात दररोज 6 हजारांपेक्षा अधिक नवीन रुग्ण समोर आले आहेत. दुसरीकडे मृतांच्या आकड्यातही वाढ होत आहे. बुधवारी देशात 4500 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. दरम्यान, आता मृतांच्या आकड्यांमध्ये भारत चीनलाही मागू टाकू शकतो. तर, जगभरात आतापर्यंत 3.55 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे.

आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, भारतात बुधवारी 4337 लोकांचा कोरोनामुळं मृत्यू झाला. Worldometersनं दिलेल्या माहितीनुसार बुधवारी रात्रीपर्यंत ही संख्या 4534 होती. तर चीनमध्ये आतापर्यंत 4634 लोकांचा मृत्यू झाल्याचा अधिकृत आकडा आहे. मात्र चीनमध्ये याहून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची शंका व्यक्त करण्यात आली आहे. मात्र भारत आता 4600 हा आकडा आज गाठू शकतो.

वाचा-कोव्हिड-19 रुग्णालयालाच लागली भीषण आग, 5 कोरोना रुग्णांचा आगीत होरपळून मृत्यू

अमेरिकेत 1 लाख लोकांचा मृत्यू

जगभरात आतापर्यंत 57.34 लाख लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील एकट्या अमेरिकेत 17.33 कोरोना रुग्ण आहे. सध्या अमेरिकेत एक लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाले आहे. कोणत्याही आपत्तीपेक्षा अमेरिकेतील मृतांची संख्या ही जास्त आहे. याशिवायत ब्रिटेन (37,460) दूसऱ्या आणि इटली (33,072) तिसऱ्या क्रमांकावर आहे.

वाचा-भयानक! औरंगाबादेत एकाच दिवशी 6 कोरोनाबाधितांचा मृत्यू, रुग्णसंख्या 1362

आशियामध्ये सर्वात जास्त मृत्यू इराणमध्ये

आशियामध्ये सर्वात जास्त मृत्यू इराणमध्ये झाले आहेत. इराणमध्ये आतापर्यंत 7 हजार 564 लोकांचा मृत्यू झाला आहे. इराणनंतर चीन आणि भारताचा क्रमांक लागतो. आतापर्यंत मृतांच्या आकड्यात चीन दुसऱ्या क्रमांकावर तर भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे.

वाचा-धक्कादायक! मुंबईतील अपंग मुलाला शिर्डीतील क्वारंटाईन सेंटरमध्ये अमानुष मारहाण

मृतांच्या आकड्यात भारत 14व्या क्रमांकावर

कोरोनामुळं मृतांच्या आकड्यांमध्ये भारताचा 14वा क्रमांक लागतो. अमेरिका, ब्रिटन आणि इटली या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहेत. यानंतर फ्रान्स, स्पेन, ब्राझील, बेल्जियम, जर्मनी आठवें, मॅक्सिको, नॉर्व्हे आणि इराण यांचा क्रमांक लागतो. तर कॅनाडा 11व्या, नेदरलॅंड 12, चीन 13 आणि भारत 14व्या क्रमांकावर आहे.

First published: May 28, 2020, 9:29 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading