अडवाणींना तिकीट नाकारण्याबद्दल काय म्हणाले नितीन गडकरी?

अडवाणींना तिकीट नाकारण्याबद्दल काय म्हणाले नितीन गडकरी?

लालकृष्ण अडवाणी यांना गांधीनगरमधून तिकीट नाकारण्याबाबत नितीन गडकरी यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 24 मार्च : लालकृष्ण अडवाणी यांना गांधीनगरमधून तिकीट नाकाल्यानंतर नितीन गडकरी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. 'अडवाणींचं वय आता 91 वर्षे आहे. त्यामुळे पक्षानं काही निर्णय घेतले. लालकृष्ण अडवाणी हे आमच्यासाठी प्रेरणास्थान होते आणि राहतील. लालकृष्ण अडवाणी यांच्याशी बोलून पक्षाध्यक्षांनी ही निर्णय घेतला असेल असं मत नितीन गडकरी यांनी 'न्यूज18'शी बोलताना व्यक्त केलं. भाजपनं उमेदवारांची यादी जाहीर करताना लालकृष्ण अडवाणी यांना गांधीनगरमधून तिकीट का नाकारलं? यावर त्यांनी आपलं मत व्यक्त केलं. 1991पासून लालकृष्ण अडवाणी हे गांधीनगरमधून सहा वेळा निवडून आले आहेत. त्यांच्या जागी आता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा रिंगणात उतरणार आहेत. त्यावरून बरीच चर्चा रंगली आहे. त्यावर नितीन गडकरी यांनी आपलं मत व्यक्त केलं.

काँग्रेसला हादरे सुरुच, फुटीचं ग्रहण केव्हा संपणार?

आणखी काय म्हणाले गडकरी

तसेच लालकृष्ण अडवाणी यांनी निवडणूक न लढवण्याबाबत पक्षानं काही सांगितलं होतं का? असा सवाल करताच नितीन गडकरी यांनी मला त्याबाबत काहीही माहिती नाही. पण, त्यांच्याशी बोलूनच हा निर्णय घेतला गेला असणार असं मत नोंदवलं. लालकृष्ण अडवाणी यांनी पक्षाच्या जडणघडणीमध्ये मोठा वाटा उचलला असून आम्ही त्यांचा आदर करतो. असं देखील यावेळी नितीन गडकरी म्हणाले.

दरम्यान, लालकृष्ण अडवाणी यांनी गांधीनगरमधून निवडणूक लढवू नये किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही एका सदस्याला निवडणुकीच्या रिंगणात उतरवावे असा प्रस्ताव पक्षानं दिला होता. पण, अडवाणी मात्र निवडणूक लढण्याबाबत ठाम होते. त्यामुळे पक्षानं वाढत्या वयाचा विचार करत अडवाणींनी गांधीनगरमधून उमेदवारी नाकारली अशी माहिती देखील समोर आली. शिवाय, 75 वर्षे वय असलेल्यांना आता उमेदवारी न देण्याचा प्रस्ताव देखील भाजपनं मांडला आहे अशी माहिती देखील आता समोर येत आहे.

VIDEO: जेव्हा शरद पवारांनी उदयनराजेंची कॉलर उडवली...!

First published: March 24, 2019, 10:29 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading