तटकरेंच्या सुपुत्राचा आणखी एक 'उद्योग'

तटकरेंच्या सुपुत्राचा आणखी एक 'उद्योग'

07 जूनमहाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांचे सुपुत्र अनिकेत तटकरे यांनी 800 एकर जमीन आणि 140 कंपन्या उघडण्याचा पराक्रम करुन दाखवला असताना आणखी एक 'उद्योग' उघडकीस आला आहे. अनिकेत यांच्या मल्टिव्हेंचर प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीसाठीच्या जमीन खरेदीतही असाच गैरव्यवहार झाला आहे. त्याचेही ठोस पुरावे आयबीएन लोकमतला मिळाले आहे. यानूसार कंपनीसाठी 24 एकर जमीन खोट्या कागदपत्रांच्या आधारे मिळवण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यातल्या धगडवाडीमध्ये ही जमीन 8 मे 2009 रोजी खरेदी करण्यात आली. या खरेदीसाठी 16(1)(ब) या सर्वे नंबरचं परवानगी पत्र जोडण्यात आलं. पण जी जमीन खरेदी करण्यात आली तिचा सर्वे नंबर 16(1)(ब) हा नव्हता. म्हणजे रोह्याचं सब रजिस्ट्रारनं खोटं परवानगी पत्र जोडलं. यावरुन त्यावेळचे अप्पर जिल्हाधिकारी रामदास खडतरे आणि आय. यू. वेताळ या सब रजिस्ट्रार या बेकायदेशीर कामात भागीदार होते, हे स्पष्ट होतं. अशाच प्रकारे महसूलच्या संपूर्ण यंत्रणेला हाताशी धरुन शेकडो एकर जमीन तटकरे कुटुंबीय आणि त्यांच्या निकटवर्तीयांच्या नावावर झालेली आहे.

  • Share this:

07 जून

महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांचे सुपुत्र अनिकेत तटकरे यांनी 800 एकर जमीन आणि 140 कंपन्या उघडण्याचा पराक्रम करुन दाखवला असताना आणखी एक 'उद्योग' उघडकीस आला आहे. अनिकेत यांच्या मल्टिव्हेंचर प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीसाठीच्या जमीन खरेदीतही असाच गैरव्यवहार झाला आहे. त्याचेही ठोस पुरावे आयबीएन लोकमतला मिळाले आहे. यानूसार कंपनीसाठी 24 एकर जमीन खोट्या कागदपत्रांच्या आधारे मिळवण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यातल्या धगडवाडीमध्ये ही जमीन 8 मे 2009 रोजी खरेदी करण्यात आली. या खरेदीसाठी 16(1)(ब) या सर्वे नंबरचं परवानगी पत्र जोडण्यात आलं. पण जी जमीन खरेदी करण्यात आली तिचा सर्वे नंबर 16(1)(ब) हा नव्हता. म्हणजे रोह्याचं सब रजिस्ट्रारनं खोटं परवानगी पत्र जोडलं. यावरुन त्यावेळचे अप्पर जिल्हाधिकारी रामदास खडतरे आणि आय. यू. वेताळ या सब रजिस्ट्रार या बेकायदेशीर कामात भागीदार होते, हे स्पष्ट होतं. अशाच प्रकारे महसूलच्या संपूर्ण यंत्रणेला हाताशी धरुन शेकडो एकर जमीन तटकरे कुटुंबीय आणि त्यांच्या निकटवर्तीयांच्या नावावर झालेली आहे.

First published: June 7, 2012, 1:51 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading