रेव्ह पार्टीच्या आयोजकाला 25 मेपर्यंत पोलीस कोठडी

रेव्ह पार्टीच्या आयोजकाला 25 मेपर्यंत पोलीस कोठडी

21 मेमुंबईत रविवारी जुहू इथं पोलिसांनी रेव्ह पार्टीवर टाकलेल्या छाप्यात पार्टीचा आयोजक विषय हांडा याला अटक केली आहे. विषय हांडा याला आज कोर्टात हजर केले असता त्याला 25 मेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. रविवारी रात्री जुहु येथील हॉटेल ओकवूडमध्ये पश्चिम मुंबईचे अतिरिक्त पोलिस आयुक्त विश्वास नागरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली छापा टाकण्यात आला होता. या पार्टीत पोलिसांनी 25 परदेशी नागरिकांसह 128 जणांना ताब्यात घेतले. विशेष म्हणजे पुणे वॉरियर्सचा खेळाडू स्पिनर बॉलर राहुल शर्मा आणि वेन पारनेल (दक्षिण आफ्रिका) या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. मात्र त्यांची चौकशी करुन सोडून देण्यात आलं. या पार्टीमध्ये कोकेन, चरस, नशेच्या गोळ्यांचा वापर केला गेला होता. ताब्यात घेण्यात आलेल्या सर्व नशाबाज मुला-मुलींचे युरीन सॅम्पल आणि ब्लड सॅम्पल घेण्यात आले असून त्यांनी लॅबमध्ये पाठवण्यात आलं आहे. विशेष म्हणजे या पार्टीचे आयोजन फेसबुकच्या माध्यमातून केल्याचे समोर आले आहे.

  • Share this:

21 मे

मुंबईत रविवारी जुहू इथं पोलिसांनी रेव्ह पार्टीवर टाकलेल्या छाप्यात पार्टीचा आयोजक विषय हांडा याला अटक केली आहे. विषय हांडा याला आज कोर्टात हजर केले असता त्याला 25 मेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. रविवारी रात्री जुहु येथील हॉटेल ओकवूडमध्ये पश्चिम मुंबईचे अतिरिक्त पोलिस आयुक्त विश्वास नागरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली छापा टाकण्यात आला होता. या पार्टीत पोलिसांनी 25 परदेशी नागरिकांसह 128 जणांना ताब्यात घेतले. विशेष म्हणजे पुणे वॉरियर्सचा खेळाडू स्पिनर बॉलर राहुल शर्मा आणि वेन पारनेल (दक्षिण आफ्रिका) या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. मात्र त्यांची चौकशी करुन सोडून देण्यात आलं. या पार्टीमध्ये कोकेन, चरस, नशेच्या गोळ्यांचा वापर केला गेला होता. ताब्यात घेण्यात आलेल्या सर्व नशाबाज मुला-मुलींचे युरीन सॅम्पल आणि ब्लड सॅम्पल घेण्यात आले असून त्यांनी लॅबमध्ये पाठवण्यात आलं आहे. विशेष म्हणजे या पार्टीचे आयोजन फेसबुकच्या माध्यमातून केल्याचे समोर आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 21, 2012 10:10 AM IST

ताज्या बातम्या