...तोपर्यंत वेश्या व्यवसाय बंद करा, संशोधकांचा केंद्र सरकारला सल्ला

...तोपर्यंत वेश्या व्यवसाय बंद करा, संशोधकांचा केंद्र सरकारला सल्ला

लॉकडाउननंतरही रेड लाईट परिसर बंद ठेवण्याची शिफारस सरकारला शास्त्रज्ञांनी केली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली,  18 मे : कोरोना व्हायरसचा नायनाट करण्यासाठी लस तयार होईपर्यंत भारताने सर्व रेड लाईट क्षेत्र बंद करावी,  असा सल्ला संशोधकांनी केंद्र सरकारला दिला आहे. तसंच, रेड लाईट क्षेत्र बंद ठेवला तर कोरोनाच्या नवीन घटनांमध्ये ७२  टक्क्यांनी घट होऊ शकते, असा दावाही संशोधकांनी केला आहे.

अमेरिकेतील येल स्कूल ऑफ मेडिसिनच्या संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार, लैंगिक कार्याची ही ठिकाणे बंद केल्यास भारतातील अंदाजे कोविड -19 मृत्यू दर 63 टक्क्यांनी कमी होईल. लॉकडाउननंतर प्रभावी उपचार किंवा लस तयार होईपर्यंत सर्व वेशाव्यवसाय क्षेत्र बंद ठेवली पाहिजेत, ज्यामुळे भारतीयांमध्ये कोविड-19 या आजाराचा धोका बर्‍याच प्रमाणात कमी होईल. या अभ्यासाचे निष्कर्ष भारत सरकार आणि विविध राज्य सरकारांना सांगितले गेले आहेत.

हेही वाचा -लॉकडाऊननंतरही कोरोनाचा कहर सुरूच, 24 तासांत 157 रुग्णांनी गमावले प्राण

लॉकडाउननंतरही रेड लाईट परिसर बंद ठेवण्याची शिफारस सरकारला संशोधकांनी केली आहे. जर सरकारने हा निर्णय घेतला तर यामुळे 45 दिवसांत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी होईल. त्यामुळे ही साखळी खंडित करण्यासाठी सरकारला अतिरिक्त 17 दिवस मिळू शकते, असा दावाही संशोधकांनी केला आहे.

या अतिरिक्त कालावधीमुळे सरकारला तयारीसाठी अधिक वेळ मिळेल, असं संशोधकांना वाटत आहे. हा कालावधी सरकारला जनतेचे आरोग्य व अर्थव्यवस्था वाचविण्यासाठी उपयोगी आणता येईल,असं संशोधकांचं म्हणणं आहे.

हेही वाचा - चार वर्षं गंभीर आजारशी लढत होती सुश्मिता सेन, आता केला धक्कादायक खुलासा

लॉकडाउननंतर रेड लाईट एरिया बंद ठेवल्यास 60 दिवसांत कोरोना विषाणूमुळे होणारी मृत्यू संख्या 63 टक्के कमी होऊ शकते  राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेच्या (एनसीओ ) नुसार देशभरात सुमारे 6 लाख 37 हजार 500 वेश्या आहेत. यासह, सुमारे पाच लाख ग्राहक दररोज रेड लाइट क्षेत्रात येतात.

 

First published: May 18, 2020, 1:23 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading