Election 2019 : रणनीतीकारांमुळे नव्हे तर 'या' व्यक्तीमुळे झाले नरेंद्र मोदी पंतप्रधान

Election 2019 : रणनीतीकारांमुळे नव्हे तर 'या' व्यक्तीमुळे झाले नरेंद्र मोदी पंतप्रधान

नरेंद्र मोदी आज देशाचे पंतप्रधान असले तरी त्यामागे अनेकांचा हात आहे. त्यापैकी मोदीपर्वाची सुरुवात करणारी ही व्यक्ती आता सक्रिय राजकारणातून बाहेर पडून राज्यपालपदावर पोहोचली आहे.

  • Share this:

मुंबई, 21 मार्च : मोदी! मोदी! मोदी! 2014मध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात सारा देश मोदीमय झाला होता. त्या लाटेत विरोधकांची धुळधाण उडाली आणि नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाले. गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा तीन वेळा समर्थपणे सांभाळल्यानंतर मोदी देशाचे पंतप्रधान झाले. त्यांच्या नेतृत्वात भाजपनं 2014मध्ये 282 इतक्या विक्रमी जागा जिंकत मोठी कामगिरी केली होती. पण, मोदी याचा राजकीय प्रवास नेमका आहे कसा झाला? मोदींना पंतप्रधानपदी पोहोचवण्यामागे भाजपचे चाणक्य म्हणवले गेलेले अमित शहा किंवा 2014 च्या निवडणुकांसाठी भाजपसाठी आखणी करणारे रणनीतीकार प्रशांत किशोर अशा अनेकांची नावं घेतली जातात. पण एक व्यक्ती अशी आहे, जिच्यापासून मोदीपर्वाची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली होती.

कुणामुळे नरेंद्र मोदी यांचा पंतप्रधानपदाचा प्रवास सुरू झाला? त्यांच्यासाठी कुणी दिला आमदारकीचा राजीनामा? संघाचे स्वयंसेवक असणारे मोदी आधी मुख्यमंत्री आणि मग देशाचे पंतप्रधान झाले कसे? त्यांचा हा प्रवास देखील रंजक आणि खडतर असाच आहे.

2014मध्ये प्रशांत किशोर यांनी भाजपसाठी देशव्यापी निवडणूक प्रचार केला. अर्थात त्यांना त्यानंतर देश रणनीतीकार म्हणून म्हणून ओळखू लागला. चाय पे चर्चा, अच्छे दिन, अबकी बार मोदी सरकार अशा अनेक घोषणांचा देशभर जल्लोष सुरू होता. भाजपनं मिळवलेल्या या विजयामुळे प्रसारमाध्यमांमध्ये मोदींचा, भाजपचा चाणक्य कोण? यावर चर्चा सुरू होती. पण, मोदी मोठ्या पदांवर विराजमान झाले त्यामागे सिंहाचा वाटा होता तो वजुभाई वाला यांचा! कारण,मोदी पहिल्यांदा पोटनिवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी विजयी झाले होते. पण, 2002मध्ये मोदींसाठी आपल्या आमदारकीचा राजीनामा देण्याचं औदार्य दाखवलं होतं ते वजुभाई वाला यांनी . वजुभाई वाला यांनी केवळ राजीनामा न देता नरेंद्र मोदींचा प्रचार देखील केला. त्यामुळे नरेंद्र मोदींचा विजय हा आणखी सुखकर झाला होता.

'कभी तू चायवाला लगता है, कभी चोर चौकीदार', धनंजय मुडेंचा मोदींवर प्रहार

'त्या' भूकंपानं मोदींचं राजकीय आयुष्य बदललं

संघाचे स्वयंसेवक असलेल्या नरेंद्र मोदींवर 1995मध्ये भाजपच्या सेक्रेटरीपदाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यानंतर तीन वर्षांनी त्यांची जनरल सेक्रेटरी म्हणून निवड झाली. पण, नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. 2001मध्ये भूजमध्ये भूकंप झाला. यामध्ये जवळपास 20 हजार जणांना आपला जीव गमवावा लागला. त्यावेळी केशुभाई पटेल हे मुख्यमंत्री होते. भूकंपानंतरची परिस्थिती हाताळण्यास मुख्यमंत्र्यांना अपयश आलं. केशुभाई पटेल यांच्या विरोधातील नाराजी पाहता त्यांच्या जागी नरेंद्र मोदी यांची वर्णी लागली. 3 ऑक्टोबर 2001मध्ये नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारली. त्यानंतर 24 फेब्रुवारी 2002मध्ये नरेंद्र मोदी हे राजकोटमधून पोट निवडणुकीमध्ये विजयी झाले. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार अश्विन मेहता यांचा 14 हजार 728 मतांनी पराभव केला होता.

विशेष बाब म्हणजे कर्नाटकचे विद्यमान राज्यपाल वजुभाई वाला यांनी त्यावेळी राजकोटच्या जागेच्या आमदारकीचा राजीनामा दिला होता. वजुभाई वाला हे त्यावेळी 9 वर्षं अर्थमंत्री पदावर होते. पण, मोदींसाठी त्यांनी राजकोट येथून राजीनामा देत नरेंद्र मोदींच्या प्रचारार्थ मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला होता. राजकोट येथे मिळवलेल्या विजयानंतर नरेंद्र मोदी यांनी केव्हाच मागे वळून पाहिलं नाही. त्यानंतर नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात गुजरातमध्ये भाजपनं 2002, 2007 आणि 2012मध्ये देखील विजय मिळवला. नरेंद्र मोदी यांनी आत्तापर्यंत पाच वेळा निवडणुका लढवल्या आहेत. पण, एकाही निवडणुकीमध्ये त्यांनी पराभवाचं तोंड पाहिलं नाही.

वडोदऱ्यातून मोदींचा विक्रमी विजय

2014मध्ये लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी वाराणसी आणि वडोदरा या दोन ठिकाणांहून निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांनी दोन्ही ठिकाणांहून विजय मिळवला होता. वडोदरा मतदारसंघात नरेंद्र मोदींना 11 लाख 63 हजार मतांपैकी तब्बल 8 लाख 45 हजार 464 मतं मिळाली होती. तर, मोदींविरोधात उभे असलेले काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी मधुसदन मिस्त्री यांना 2 लाख 75 हजार 336 मतं मिळाली होती. तर, 18 हजार मतदारांनी नोटा अर्थात NONE OF THE ABOVE पर्याय निवडला होता. 2009मध्ये वडोदऱ्यामधून भाजपचे बाळू शुक्ला 1 लाख 36 हजार मतांनी विजयी झाले होते.

5 वर्षांत 2 कोटी पुरुष बेरोजगार झाले, 'NSSO' चा धक्कादायक रिपोर्ट

वाराणसी देखील मोदींनी जिंकली

2014मध्ये नरेंद्र मोदी हे वाराणसीतून देखील उभे राहिले होते. या ठिकाणी त्यांना आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी आव्हान दिलं होतं. पण, नरेंद्र मोदी यांना 5 लाख 16 हजार 593 आणि अरविंद केजरीवाल यांना 1लाख 79 हजार 739 मतं मिळाली होती. वाराणसीमध्ये मोदींनी 3 लाख 37 हजार मतांनी केजरीवाल यांचा पराभव केला होता. वाराणसीतील 10 लाख 28 हजार मतांपैकी नरेंद्र मोदी यांना 50 टक्के मतं मिळाली होती.

2002ची दंगल, मोदी आणि वाजपेयी

नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असताना गुजरातमध्ये जातीय दंगल उसळली होती. यावेळी तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी गुजरात दौरा करत नरेंद्र मोदींना राजधर्माचं पालन करण्याचा सल्ला दिला होता. ऑन कॅमेरा घडलेली ही गोष्ट आज देखील चर्चिली जाते. त्यानंतर अमेरिकेनं देखील नरेंद्र मोदी यांना व्हिसा नाकारला होता.

VIDEO : पंतप्रधान मोदींनी साधला चौकीदारांशी संवाद, म्हणाले...

First published: March 21, 2019, 1:25 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading