वसईच्या 29 गावांकडे पालिकेचे दुर्लक्ष

06 एप्रिलवसई विरार महानगरपालिकेतून 52 गावं वगळण्यात यावीत यासाठी आमदार विवेक पंडित यांनी एक मोठं आंदोलन उभारलं होतं. पण तरीही या गावांना घेऊनच महानगरपालिकेची स्थापना झाली. विवेक पंडित यांनी त्याचा लढा सुरुच ठेवला. आणि 2010 मध्ये वसई ते वर्षा असा लाँग मार्च काढला. त्यानंतर सरकारने त्यांच्यापुढे झुकत महानगरपालिकेतून 29 गावं वगळण्याचा अध्यादेश काढला. पण महानगरपालिकेला मात्र ही गावं आपल्या अखत्यारीत हवी होती. त्यासाठी सरकारच्या या नियमाला आव्हान देत महानगरपालिका हायकोर्टात गेली. आणि त्या केसचा निकाल लागेपर्यंत कोर्टाने सरकारच्या निर्णयाला स्टे दिला. पण यामुळे या 29 गावांची स्थिती 'ना घर का ना घाट का' अशी झाली. आता महानगरपालिका त्यांच्याकडे लक्षं देत नाही. रस्ते वीज या मुलभूत सोयी सुविधा मोडकळीस आल्या आहेत. रस्त्यांवरुन गाडी जाऊ शकत नाही अशी अवस्था झाली. तर गटारी गेल्या कित्येक वर्ष साफ करण्यात आलेल्या नाही. महानगरपालिका लक्ष देत नाही, ग्रामपंचायत बरखास्त झालेली. अशा अवस्थेत दाद मागायला कुठं जायचं असा प्रश्न इथल्या नागरीकांना पडला.

आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Updated On: Apr 6, 2012 09:27 AM IST

वसईच्या 29 गावांकडे पालिकेचे दुर्लक्ष

06 एप्रिल

वसई विरार महानगरपालिकेतून 52 गावं वगळण्यात यावीत यासाठी आमदार विवेक पंडित यांनी एक मोठं आंदोलन उभारलं होतं. पण तरीही या गावांना घेऊनच महानगरपालिकेची स्थापना झाली. विवेक पंडित यांनी त्याचा लढा सुरुच ठेवला. आणि 2010 मध्ये वसई ते वर्षा असा लाँग मार्च काढला. त्यानंतर सरकारने त्यांच्यापुढे झुकत महानगरपालिकेतून 29 गावं वगळण्याचा अध्यादेश काढला. पण महानगरपालिकेला मात्र ही गावं आपल्या अखत्यारीत हवी होती.

त्यासाठी सरकारच्या या नियमाला आव्हान देत महानगरपालिका हायकोर्टात गेली. आणि त्या केसचा निकाल लागेपर्यंत कोर्टाने सरकारच्या निर्णयाला स्टे दिला. पण यामुळे या 29 गावांची स्थिती 'ना घर का ना घाट का' अशी झाली. आता महानगरपालिका त्यांच्याकडे लक्षं देत नाही. रस्ते वीज या मुलभूत सोयी सुविधा मोडकळीस आल्या आहेत. रस्त्यांवरुन गाडी जाऊ शकत नाही अशी अवस्था झाली. तर गटारी गेल्या कित्येक वर्ष साफ करण्यात आलेल्या नाही. महानगरपालिका लक्ष देत नाही, ग्रामपंचायत बरखास्त झालेली. अशा अवस्थेत दाद मागायला कुठं जायचं असा प्रश्न इथल्या नागरीकांना पडला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 6, 2012 09:27 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...