लष्करी तुकड्यांचं वृत्त मूर्खपणाचं -लष्करप्रमुख

05 एप्रिलजानेवारी महिन्यात 16 आणि 17 तारखेला लष्करी तुकड्यांच्या अनपेक्षित हालचालींबद्दल इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या बातमीवर लष्करप्रमुख व्ही. के. सिंग यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली.हे वृत्त पूर्णपणे मूर्खपणाचं आहे, अशी तोफच लष्करप्रमुखांनी डागली. लष्करप्रमुख तीन दिवसांच्या चर्चासत्रासाठी नेपाळमध्ये आहेत. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. लष्कराच्या वादावर लष्करप्रमुखांनी देशाबाहेर स्पष्टीकरण देण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे.16 जानेवारीची मध्यरात्र.. हरियाणातल्या हिसरमधून 33 वी आर्मर्ड डिव्हिजन दिल्लीच्या दिशेने निघाली. त्याच वेळी.. आग्रा येथील पारस या 50 पॅरा ब्रिगेडनंही राजधानीकडे कूच केलं.आणि ही हालचाल सरकारला न कळवता करण्यात आली होती. या दरम्यान लष्करप्रमुख आणि सरकारमधील संबंध ताणले गेले असतानाच.. या घटना घडल्यानं.. संशयाचं वातावरण निर्माण झालं. मात्र सरकारने वृत्त फेटाळून लावले आहे. काल पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी, संरक्षण मंत्रालयानं स्पष्टीकरण दिलंय. या बातम्या भीती पसरवणार्‍या आहेत. त्याला फार महत्त्व देण्याची गरज नाही. लष्करप्रमुख हे प्रतिष्ठित पद आहे. त्याला धक्का पोहोचू न देणं हे आपलं कर्तव्य आहे. त्याचा आदर राखलाच पाहिजे असं स्पष्टीकरण दिलं. तर आज खुद्द लष्करप्रमुखांनीच हे वृत्त मूर्खपणाचं आहे अशी प्रतिक्रिया दिली.

आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Updated On: Apr 5, 2012 11:00 AM IST

लष्करी तुकड्यांचं वृत्त मूर्खपणाचं -लष्करप्रमुख

05 एप्रिल

जानेवारी महिन्यात 16 आणि 17 तारखेला लष्करी तुकड्यांच्या अनपेक्षित हालचालींबद्दल इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या बातमीवर लष्करप्रमुख व्ही. के. सिंग यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली.हे वृत्त पूर्णपणे मूर्खपणाचं आहे, अशी तोफच लष्करप्रमुखांनी डागली. लष्करप्रमुख तीन दिवसांच्या चर्चासत्रासाठी नेपाळमध्ये आहेत. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. लष्कराच्या वादावर लष्करप्रमुखांनी देशाबाहेर स्पष्टीकरण देण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे.

16 जानेवारीची मध्यरात्र.. हरियाणातल्या हिसरमधून 33 वी आर्मर्ड डिव्हिजन दिल्लीच्या दिशेने निघाली. त्याच वेळी.. आग्रा येथील पारस या 50 पॅरा ब्रिगेडनंही राजधानीकडे कूच केलं.आणि ही हालचाल सरकारला न कळवता करण्यात आली होती. या दरम्यान लष्करप्रमुख आणि सरकारमधील संबंध ताणले गेले असतानाच.. या घटना घडल्यानं.. संशयाचं वातावरण निर्माण झालं. मात्र सरकारने वृत्त फेटाळून लावले आहे. काल पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी, संरक्षण मंत्रालयानं स्पष्टीकरण दिलंय. या बातम्या भीती पसरवणार्‍या आहेत. त्याला फार महत्त्व देण्याची गरज नाही. लष्करप्रमुख हे प्रतिष्ठित पद आहे. त्याला धक्का पोहोचू न देणं हे आपलं कर्तव्य आहे. त्याचा आदर राखलाच पाहिजे असं स्पष्टीकरण दिलं. तर आज खुद्द लष्करप्रमुखांनीच हे वृत्त मूर्खपणाचं आहे अशी प्रतिक्रिया दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 5, 2012 11:00 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...