टाट्रा ट्रक खरेदीत अनेक गैरव्यवहार चव्हाट्यावर

03 एप्रिलटाट्रा लष्करी ट्रक खरेदीच्यावेळी आपल्याला लाच देऊ केल्याचा आरोप लष्कर प्रमुखांनी केला आणि देशात एकच खळबळ उडाली. या घोटाळ्याचा छडा लावण्याचे काम आता सीबीआय करतेय. ज्या लष्करी ट्रक खरेदीत हा सगळा गैरप्रकार झाल्याचं बोललं जातंय, त्याची काही महत्त्वाची कागदपत्रं आयबीएन नेटवर्कच्या हाती लागली आहे. टाट्रा या कंपनीने अनेक गैरव्यवहार केल्याच या कागदपत्रांवरुन स्पष्ट होतं. लष्कराची जीवनवाहिनी असलेले हे दणकट ट्रक दशकभरापासून लष्कराच्या सेवेत आहेत. पण या ट्रक्सना लष्कर प्रमुख व्ही. के. सिंग यांनी विरोध केला.हे ट्रक निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप तर त्यांनी केलाच.. शिवाय हे ट्रक खरेदी करण्यासाठी लेफ्टनंट जनरल तेजिंदर सिंग यांनी आपल्याला लाच देऊ केल्याचा खळबळजनक आरोपही त्यांनी केला. संरक्षण दलाची बेमल या कंपनीने टाट्रा आणि व्हेक्ट्रा या कंपन्यांकडून हे ट्रक खरेदी केलेत. - या लष्करी ट्रकसाठी झेकोस्लोव्हाकियाच्या ओमनीपॉल या कंपनीशी सर्वात आधी 1986मध्ये करार करण्यात आला- 1992 मध्ये झेकोस्लोव्हाकियाच्या फाळणीनंतर टाट्रा सिपॉक्स, यूके या कंपनीकडून ट्रक खरेदी करण्यात आलेमूळ उत्पादक कंपनीकडूनच खरेदी करावी, असा नियम आहे. पण टाट्रा सिपॉक्स यूके, ज्या कंपनीकडून भारतीय लष्करानं ट्रक खरेदी केले. ती या ट्रकचे उत्पादन करत नाही. फक्त खरेदी-विक्रीचा व्यवहार करते.एनआरआय रवी ऋषी आणि जोसेफ मॅजेस्की हे या कंपनीचे शेअर होल्डर्स आहेत. माहितीनुसार आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी मॅजेस्की याला तुरुंगवासही झाला. एवढंच नाही तर टाट्रा सिपॉक्सबरोबर ज्यावेळी खरेदीचा करार करण्यात आला, त्यावेळी आध्यात्मिक, धार्मिक आणि समाजसेवा करणारी कंपनी असं या कंपनीचं रजिस्ट्रेशन करण्यात आलं होतं.संरक्षण दलाच्या इक्विपमेंट शाखेने 2003 साली या खरेदी करारावर सर्वात पहिल्यांदा आक्षेप घेतला. या शाखेनं एक पत्र लिहून काही प्रश्न उपस्थित केलेत. टाट्रा करारावर आक्षेप हे ट्रक बनवणारी मूळ कंपनी कोणती ?कोणत्या मार्गानं हे ट्रक खरेदी करण्यात आले ?हे ट्रक किती किंमतीला खरेदी करण्यात आले ?या खरेदी व्यवहारात टाट्रा सिपॉक्स युके या कंपनीची भूमिका काय ?टाट्रा सिपॉक्सची जी कागदपत्रं आयबीएन नेटवर्कच्या हाती आली. त्यानुसार या कंपनीची लंडनव्यतिरिक्त इतर कुठेही शाखा नाही. एनआरआय रवी ऋषी हे टाट्रा सिपॉक्सचे शेअरहोल्डर आहेत. भारतात हा लष्करी ट्रक खरेदी करार दरवर्षी करावा लागतो. शेवटचा करार माजी लष्कर प्रमुख जनरल दीपक कपूर यांनी 2010 साली केला. या करारावर सर्वात आधी आक्षेप घेतला तो जनरल व्ही. के. सिंग यांनी. त्यांनी आता हा करार पुढे सुरू ठेवायला विरोध केला.

आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Updated On: Apr 3, 2012 05:00 PM IST

टाट्रा ट्रक खरेदीत अनेक गैरव्यवहार चव्हाट्यावर

03 एप्रिल

टाट्रा लष्करी ट्रक खरेदीच्यावेळी आपल्याला लाच देऊ केल्याचा आरोप लष्कर प्रमुखांनी केला आणि देशात एकच खळबळ उडाली. या घोटाळ्याचा छडा लावण्याचे काम आता सीबीआय करतेय. ज्या लष्करी ट्रक खरेदीत हा सगळा गैरप्रकार झाल्याचं बोललं जातंय, त्याची काही महत्त्वाची कागदपत्रं आयबीएन नेटवर्कच्या हाती लागली आहे. टाट्रा या कंपनीने अनेक गैरव्यवहार केल्याच या कागदपत्रांवरुन स्पष्ट होतं. लष्कराची जीवनवाहिनी असलेले हे दणकट ट्रक दशकभरापासून लष्कराच्या सेवेत आहेत. पण या ट्रक्सना लष्कर प्रमुख व्ही. के. सिंग यांनी विरोध केला.हे ट्रक निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप तर त्यांनी केलाच.. शिवाय हे ट्रक खरेदी करण्यासाठी लेफ्टनंट जनरल तेजिंदर सिंग यांनी आपल्याला लाच देऊ केल्याचा खळबळजनक आरोपही त्यांनी केला. संरक्षण दलाची बेमल या कंपनीने टाट्रा आणि व्हेक्ट्रा या कंपन्यांकडून हे ट्रक खरेदी केलेत.

- या लष्करी ट्रकसाठी झेकोस्लोव्हाकियाच्या ओमनीपॉल या कंपनीशी सर्वात आधी 1986मध्ये करार करण्यात आला- 1992 मध्ये झेकोस्लोव्हाकियाच्या फाळणीनंतर टाट्रा सिपॉक्स, यूके या कंपनीकडून ट्रक खरेदी करण्यात आले

मूळ उत्पादक कंपनीकडूनच खरेदी करावी, असा नियम आहे. पण टाट्रा सिपॉक्स यूके, ज्या कंपनीकडून भारतीय लष्करानं ट्रक खरेदी केले. ती या ट्रकचे उत्पादन करत नाही. फक्त खरेदी-विक्रीचा व्यवहार करते.

एनआरआय रवी ऋषी आणि जोसेफ मॅजेस्की हे या कंपनीचे शेअर होल्डर्स आहेत. माहितीनुसार आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी मॅजेस्की याला तुरुंगवासही झाला. एवढंच नाही तर टाट्रा सिपॉक्सबरोबर ज्यावेळी खरेदीचा करार करण्यात आला, त्यावेळी आध्यात्मिक, धार्मिक आणि समाजसेवा करणारी कंपनी असं या कंपनीचं रजिस्ट्रेशन करण्यात आलं होतं.

संरक्षण दलाच्या इक्विपमेंट शाखेने 2003 साली या खरेदी करारावर सर्वात पहिल्यांदा आक्षेप घेतला. या शाखेनं एक पत्र लिहून काही प्रश्न उपस्थित केलेत.

टाट्रा करारावर आक्षेप

हे ट्रक बनवणारी मूळ कंपनी कोणती ?कोणत्या मार्गानं हे ट्रक खरेदी करण्यात आले ?हे ट्रक किती किंमतीला खरेदी करण्यात आले ?या खरेदी व्यवहारात टाट्रा सिपॉक्स युके या कंपनीची भूमिका काय ?

टाट्रा सिपॉक्सची जी कागदपत्रं आयबीएन नेटवर्कच्या हाती आली. त्यानुसार या कंपनीची लंडनव्यतिरिक्त इतर कुठेही शाखा नाही. एनआरआय रवी ऋषी हे टाट्रा सिपॉक्सचे शेअरहोल्डर आहेत. भारतात हा लष्करी ट्रक खरेदी करार दरवर्षी करावा लागतो. शेवटचा करार माजी लष्कर प्रमुख जनरल दीपक कपूर यांनी 2010 साली केला. या करारावर सर्वात आधी आक्षेप घेतला तो जनरल व्ही. के. सिंग यांनी. त्यांनी आता हा करार पुढे सुरू ठेवायला विरोध केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 3, 2012 05:00 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...