शरद पवार पंतप्रधानांवर नाराज

शरद पवार पंतप्रधानांवर नाराज

20 मार्चमित्रपक्षांमुळे विकासात अडथळे येतात असं विधान पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी काही दिवसांपुर्वी केलं होतं. पंतप्रधानाच्या या विधानावर शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली. गेली सात ते आठ वर्ष आम्ही एकत्र काम करतोय पण कधी अडचणी आल्या नाहीत पण कोणताही निर्णय घेतल्यानंतर त्यांच्या अंमलबजावणीपर्यंत राष्ट्रवादीने कधी वेगळी भूमिका घेतली नाही असं असतांना पंतप्रधानांचे वक्यव्य वेदना देणारे आहे त्यांचे वक्तव्य अस्वस्थ करणारे आहे अशा शब्दात पवारांनी आपल्या नाराजीचा मार्ग मोकळा केला. पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं नेहमी ठामपणे समर्थन करणार्‍या शरद पवारांनी आज त्यांच्यावर उघड नाराजी व्यक्त केली. मुंबईत पत्रकारांशी बोलताना पवारांनी आपली नाराजी बोलून दाखवली. आघाडीच्या राजकारणामुळे निर्णय घेताना अडथळे येतात, असं वक्तव्य पंतप्रधानांनी केलं होतं. पंतप्रधानांचं हे वक्तव्य वेदना देणारं असल्याचं पवारांनी जाहीरपणे म्हटलं. राष्ट्रवादी काँग्रेस सरकारला नेहमीच सहकार्य करतं, त्यामुळे सरसकट सर्वच पक्षांना दोष देणं चुकीचं असल्याचं पवारांनी म्हटलंय. द्रमुक आणि तृणमुल काँग्रेसनं नेहमीच सरकारच्या धोरणांवर टीका केली. पण, शरद पवारांनी मात्र आजपर्यंत कधीही पंतप्रधानांवर टीका केली नव्हती. उलट गेल्याच महिन्यात 2 जी प्रकरणी पवारांनी पंतप्रधानांचं जोरदार समर्थन केलं होतं. पण ममता आणि करुणानिधी यांच्यानंतर आज पवारांनीही नाराजी व्यक्त केली. शरद पवारांनी पहिल्यांदाच पंतप्रधानांच्या वक्तव्यावर नाराजी ही युपीएचं नेतृत्व करणार्‍या काँग्रेससाठी ही धोक्याचीच घंटा आहे. याआधी तृणमुल काँग्रेस वारंवार काँग्रेसच्या निर्णयांना विरोध केला. तिस्ता नदी पाणीवाटपापासून ते रिटेलमध्ये परदेशी गुंतवणूक, पेन्शन सुधारणा विधेयक असे अनेक निर्णय ममतांच्या विरोधामुळे काँग्रेसला मागे घ्यावे लागले आहे. तर द्रमुकच्या सततच्या दबावापुढेही सरकारला झुकावे लागलंय. श्रीलंकेत युद्धकाळात झालेल्या नरसंहाराविरोधात भारत संयुक्त राष्ट्र परिषदेत पहिल्यांदाच श्रीलंकेविरोधात मतदान करणार आहे. आणि आता शरद पवारांनीही पंतप्रधानांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली. दरम्यान, घटकपक्षांमुळे सतत अडचणीत राहणार्‍या युपीए सरकारने आता आठवड्यातून तीन दिवस घटकपक्षांची संयुक्त बैठक घेण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसने मांडलेल्या अनेक विषयांवर तृणमुल, द्रमुकसारख्या काही पक्षांनी वारंवार विरोधाची भूमिका घेतलीय. यापुढे असं होऊ नये आणि घटकपक्षांमध्ये समन्वय राहावा, या उद्देशाने आठवड्यातून तीन दिवस संयुक्त बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला. समन्वय समितीसाठी राष्ट्रवादीसुद्धा आग्रही होती. विशेष म्हणजे शरद पवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पुण्याचे सुप्रसिध्दी बिल्डर संजय काकडे यांनी आपण राज्यसभा निवडणुकीतून माघार घेत आहोत असंही जाहीर केलं.

  • Share this:

20 मार्च

मित्रपक्षांमुळे विकासात अडथळे येतात असं विधान पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी काही दिवसांपुर्वी केलं होतं. पंतप्रधानाच्या या विधानावर शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली. गेली सात ते आठ वर्ष आम्ही एकत्र काम करतोय पण कधी अडचणी आल्या नाहीत पण कोणताही निर्णय घेतल्यानंतर त्यांच्या अंमलबजावणीपर्यंत राष्ट्रवादीने कधी वेगळी भूमिका घेतली नाही असं असतांना पंतप्रधानांचे वक्यव्य वेदना देणारे आहे त्यांचे वक्तव्य अस्वस्थ करणारे आहे अशा शब्दात पवारांनी आपल्या नाराजीचा मार्ग मोकळा केला.

पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं नेहमी ठामपणे समर्थन करणार्‍या शरद पवारांनी आज त्यांच्यावर उघड नाराजी व्यक्त केली. मुंबईत पत्रकारांशी बोलताना पवारांनी आपली नाराजी बोलून दाखवली. आघाडीच्या राजकारणामुळे निर्णय घेताना अडथळे येतात, असं वक्तव्य पंतप्रधानांनी केलं होतं. पंतप्रधानांचं हे वक्तव्य वेदना देणारं असल्याचं पवारांनी जाहीरपणे म्हटलं.

राष्ट्रवादी काँग्रेस सरकारला नेहमीच सहकार्य करतं, त्यामुळे सरसकट सर्वच पक्षांना दोष देणं चुकीचं असल्याचं पवारांनी म्हटलंय. द्रमुक आणि तृणमुल काँग्रेसनं नेहमीच सरकारच्या धोरणांवर टीका केली. पण, शरद पवारांनी मात्र आजपर्यंत कधीही पंतप्रधानांवर टीका केली नव्हती. उलट गेल्याच महिन्यात 2 जी प्रकरणी पवारांनी पंतप्रधानांचं जोरदार समर्थन केलं होतं. पण ममता आणि करुणानिधी यांच्यानंतर आज पवारांनीही नाराजी व्यक्त केली.

शरद पवारांनी पहिल्यांदाच पंतप्रधानांच्या वक्तव्यावर नाराजी ही युपीएचं नेतृत्व करणार्‍या काँग्रेससाठी ही धोक्याचीच घंटा आहे. याआधी तृणमुल काँग्रेस वारंवार काँग्रेसच्या निर्णयांना विरोध केला. तिस्ता नदी पाणीवाटपापासून ते रिटेलमध्ये परदेशी गुंतवणूक, पेन्शन सुधारणा विधेयक असे अनेक निर्णय ममतांच्या विरोधामुळे काँग्रेसला मागे घ्यावे लागले आहे.

तर द्रमुकच्या सततच्या दबावापुढेही सरकारला झुकावे लागलंय. श्रीलंकेत युद्धकाळात झालेल्या नरसंहाराविरोधात भारत संयुक्त राष्ट्र परिषदेत पहिल्यांदाच श्रीलंकेविरोधात मतदान करणार आहे. आणि आता शरद पवारांनीही पंतप्रधानांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली. दरम्यान, घटकपक्षांमुळे सतत अडचणीत राहणार्‍या युपीए सरकारने आता आठवड्यातून तीन दिवस घटकपक्षांची संयुक्त बैठक घेण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसने मांडलेल्या अनेक विषयांवर तृणमुल, द्रमुकसारख्या काही पक्षांनी वारंवार विरोधाची भूमिका घेतलीय. यापुढे असं होऊ नये आणि घटकपक्षांमध्ये समन्वय राहावा, या उद्देशाने आठवड्यातून तीन दिवस संयुक्त बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला. समन्वय समितीसाठी राष्ट्रवादीसुद्धा आग्रही होती.

विशेष म्हणजे शरद पवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पुण्याचे सुप्रसिध्दी बिल्डर संजय काकडे यांनी आपण राज्यसभा निवडणुकीतून माघार घेत आहोत असंही जाहीर केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 20, 2012 02:11 PM IST

ताज्या बातम्या