पुन्हा गरिबांची थट्टा, 28 रुपये कमवणारे गरीब नाही !

पुन्हा गरिबांची थट्टा, 28 रुपये कमवणारे गरीब नाही !

20 मार्चकाही महिन्यांपूर्वी 32 रुपयांपेक्षा जास्त पैसै कमावणारे गरीब नाहीत असा जावईशोध लावणार्‍या नियोजन आयोगाने आता आणखी धक्कादायक निष्कर्ष काढला आहे. 2009-2010 या वर्षात देशातील गरीबी कमी झाल्याचे आपल्या नवीन रिपोर्टमध्ये म्हटलंय. नियोजन आयोगाच्या नव्या निष्कर्षाप्रमाणे ग्रामीण भागात 22 रुपये तर शहरी भागात 28 रुपये कमावणारी व्यक्ती गरीब नसल्याचं आयागोनं म्हटलं आहे. गेल्या पाच वर्षात देशातील गरीबांची संख्या8 टक्क्यांनी घटल्याचं या अहवालात म्हटलं आहे. या रिपोर्टनुसार ईशान्येकडील राज्यांमध्ये गरिबी वाढली आहे. तर उत्तरप्रदेश,बिहारमध्ये, छत्तीसगढ या राज्यांमध्ये गरीबी कमी झाल्याचंही या अहवालात म्हटलं आहे. या रिपोर्टनुसार आसाम, मनिपूर, मेघालय, मिझोराम आणि नागालंँड मध्ये गरिबीत वाढ झाली आहे. तर महाराष्ट्र, हिमालय, मध्य प्रदेश, ओरिसा, सिक्की, तामिळनाडू, कर्नाटक आणि उत्तराखंड या राज्यात गरिबी कमी झाली असल्याच या रिपोर्ट मध्ये सांगण्यात आल आहे.

  • Share this:

20 मार्च

काही महिन्यांपूर्वी 32 रुपयांपेक्षा जास्त पैसै कमावणारे गरीब नाहीत असा जावईशोध लावणार्‍या नियोजन आयोगाने आता आणखी धक्कादायक निष्कर्ष काढला आहे. 2009-2010 या वर्षात देशातील गरीबी कमी झाल्याचे आपल्या नवीन रिपोर्टमध्ये म्हटलंय. नियोजन आयोगाच्या नव्या निष्कर्षाप्रमाणे ग्रामीण भागात 22 रुपये तर शहरी भागात 28 रुपये कमावणारी व्यक्ती गरीब नसल्याचं आयागोनं म्हटलं आहे. गेल्या पाच वर्षात देशातील गरीबांची संख्या8 टक्क्यांनी घटल्याचं या अहवालात म्हटलं आहे.

या रिपोर्टनुसार ईशान्येकडील राज्यांमध्ये गरिबी वाढली आहे. तर उत्तरप्रदेश,बिहारमध्ये, छत्तीसगढ या राज्यांमध्ये गरीबी कमी झाल्याचंही या अहवालात म्हटलं आहे. या रिपोर्टनुसार आसाम, मनिपूर, मेघालय, मिझोराम आणि नागालंँड मध्ये गरिबीत वाढ झाली आहे. तर महाराष्ट्र, हिमालय, मध्य प्रदेश, ओरिसा, सिक्की, तामिळनाडू, कर्नाटक आणि उत्तराखंड या राज्यात गरिबी कमी झाली असल्याच या रिपोर्ट मध्ये सांगण्यात आल आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 20, 2012 11:55 AM IST

ताज्या बातम्या