युपीच्या मुख्यमंत्रीपदी अखिलेश यादव ?

युपीच्या मुख्यमंत्रीपदी अखिलेश यादव ?

09 मार्चदेशातील सर्वात मोठं राज्य असलेल्या उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री मुलायम सिंग यादव होणार की त्यांचा मुलगा अखिलेश यादव, अशी चर्चा गेले काही दिवस रंगली आहे. पण मुख्यमंत्री पदाची धुरा अखिलेशच सांभाळणार अशी माहिती मिळतेय. अखिलेश यादव यांना मुख्यमंत्री करायला पक्षातल्या काही वरिष्ठ नेत्यांचा विरोध होता. विरोध करणार्‍यांमध्ये मुलायम यांचे भाऊ शिवपाल सिंग आणि आझम खान यांचा समावेश आहे. या नेत्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न मुलायम सिंग करत होते. आणि यात त्यांना यश आल्याचं समजतंय. त्यामुळे अखिलेश यांचा मुख्यमंत्री पदाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याचबरोबर पक्षामधूनही अखिलेश यांनी मुख्यमंत्री व्हावे असा आग्रह धरला आहे.अखिलेश यादव उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होतील, अशी दाट शक्यता वाटत होती. त्याला काय कारणं ?- समाजवादी पक्षाच्या यशात अखिलेशचा सिंहाचा वाटा- तिकीटवाटपात अखिलेश यांची मोठी भूमिका होती- पक्षाचं कामकाज पाहण्यासाठी मुलायमनी अखिलेशना पूर्ण मोकळीक दिली होती- मुलायम यांची तब्येत खालावलीय- मुलायम यांचं लक्ष दिल्लीतल्या राजकारणात आहे- त्यामुळे राज्यात सक्रिय होण्यासाठी अखिलेशना मोठी संधी आहे

  • Share this:

09 मार्च

देशातील सर्वात मोठं राज्य असलेल्या उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री मुलायम सिंग यादव होणार की त्यांचा मुलगा अखिलेश यादव, अशी चर्चा गेले काही दिवस रंगली आहे. पण मुख्यमंत्री पदाची धुरा अखिलेशच सांभाळणार अशी माहिती मिळतेय. अखिलेश यादव यांना मुख्यमंत्री करायला पक्षातल्या काही वरिष्ठ नेत्यांचा विरोध होता. विरोध करणार्‍यांमध्ये मुलायम यांचे भाऊ शिवपाल सिंग आणि आझम खान यांचा समावेश आहे. या नेत्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न मुलायम सिंग करत होते. आणि यात त्यांना यश आल्याचं समजतंय. त्यामुळे अखिलेश यांचा मुख्यमंत्री पदाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याचबरोबर पक्षामधूनही अखिलेश यांनी मुख्यमंत्री व्हावे असा आग्रह धरला आहे.

अखिलेश यादव उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होतील, अशी दाट शक्यता वाटत होती. त्याला काय कारणं ?

- समाजवादी पक्षाच्या यशात अखिलेशचा सिंहाचा वाटा- तिकीटवाटपात अखिलेश यांची मोठी भूमिका होती- पक्षाचं कामकाज पाहण्यासाठी मुलायमनी अखिलेशना पूर्ण मोकळीक दिली होती- मुलायम यांची तब्येत खालावलीय- मुलायम यांचं लक्ष दिल्लीतल्या राजकारणात आहे- त्यामुळे राज्यात सक्रिय होण्यासाठी अखिलेशना मोठी संधी आहे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 9, 2012 05:23 PM IST

ताज्या बातम्या