'हत्ती'पडला,सायकल सुसाट

'हत्ती'पडला,सायकल सुसाट

06 मार्चपाच राज्यांच्या निवडणुकात सर्वात मोठा आणि महत्वाच्या उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत समाजवादी पार्टी पहिल्या क्रमांकाचा पक्ष म्हणून समोर आला आहेत. काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांचा करिष्माही या ठिकाणी दिसला नाही. तर सत्तेत असलेल्या बसपावरची मायाही आटली. समाजवादी पक्षाला सत्ता स्थापण्यासाठी इतर पक्षांची गरज पडण्याची शक्यताही कमीच आहे. 403 सदस्यांच्या विधानसभेत सत्ता स्थापन करण्यासाठी आवश्यक असलेली आकडेवारी सपानं गाठली आहे. समाजवादी पार्टीकडे सध्या 224 जागा आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री समाजवादीचाच होणार हे स्पष्ट झालं आहे. मोठ्या प्रमाणात सभा आणि रोड शो घेणार्‍या राहुल गांधी यांच्या प्रयत्नांना मात्र यश मिळालेलं नाही. तर गेल्या निवडणुकीत बसपानं 206 जागा जिंकल्या होत्या. पण यावेळी बसपाला अजून शंभरचा आकडाही गाठता आलेला नाही. उत्तरप्रदेशमधल्या यशानंतर लखनौमधल्या सपाच्या कार्यालयासमोर सपाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा दिल्या. फटाके फोडून कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला.मुलायमसिंग हेच मुख्यमंत्री - अखिलेश यादव अखिलेश यादव यांची चोख कामगिरी उत्तरप्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाच्या यशाचे शिल्पकार ठरले ते त्यांच्या पक्षाचे तरुण नेते अखिलेश यादव...समाजवादी पक्षाचा तरुण चेहरा...मिळालेल्या यशाचा चेहर्‍यावर दिसणारा आनंद...पण त्यातही भविष्यातल्या जबाबदारीचं असलेलं भान..उत्तरप्रदेशच्या निवडणुकीत समाजवादी पक्षाची एकहाती धुरा सांभाळली ती अखिलेश यादव यांनी.अमरसिंह जसे पक्षातून बाहेर पडले, त्यानंतर अखिलेशनं पक्षाची कमान सांभाळली आणि संघटनात्मक ढाचाच बदलून टाकला. एवढंच नाही, तर पक्षातल्या नेत्यांवर जबाबदारीनं विश्वासही टाकला. त्याचंच हे यश...समाजवादी पक्षाची पार्श्वभूमी ही गुन्हेगारी आहे, त्यातच त्यांना यावेळी स्पष्ट बहुमत मिळालंय. त्यावरुन अनेक प्रश्न उपस्थित होताहेत. त्यावर या तरुण नेत्यानं दिलेलं उत्तर..अखिलेश यादव म्हणतात, हम भरोसा दिलाते है की कोई भी व्यक्ती. उत्तरप्रदेशच्या संपूर्ण निवडणुकीत मुलायम सिंह यांनी निवडणुकीची धुरा अखिलेशवर सोपवली होती. पण मुलायम सिंह पडद्यामागून या सगळ्यावर लक्ष ठेवून होते. त्यांनी या सगळ्याचं यशाचं श्रेय अखिलेशला दिलंय.अखिलेशचा उत्तरप्रदेशातला झंझावात पाहून काँग्रेसनं त्यांच्या युवराजांना मैदानात उतरवलं. पण फायदा काहीच झाला नाही, उलट युवराजांवर अपयशाचं खापर कसं फोडायचं म्हणून नेतेच जबाबदारी स्वीकारताना दिसत होते. काँग्रेस राहुल गांधींना जरुर उत्तरप्रदेशचा चेहरा म्हणून उतरवत असलं, तरी आजच्या निकालावरुन भविष्यात अखिलेश हाच उत्तरप्रदेशचा नेता असेल हे स्पष्ट दिसतंय.

  • Share this:

06 मार्च

पाच राज्यांच्या निवडणुकात सर्वात मोठा आणि महत्वाच्या उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत समाजवादी पार्टी पहिल्या क्रमांकाचा पक्ष म्हणून समोर आला आहेत. काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांचा करिष्माही या ठिकाणी दिसला नाही. तर सत्तेत असलेल्या बसपावरची मायाही आटली. समाजवादी पक्षाला सत्ता स्थापण्यासाठी इतर पक्षांची गरज पडण्याची शक्यताही कमीच आहे. 403 सदस्यांच्या विधानसभेत सत्ता स्थापन करण्यासाठी आवश्यक असलेली आकडेवारी सपानं गाठली आहे. समाजवादी पार्टीकडे सध्या 224 जागा आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री समाजवादीचाच होणार हे स्पष्ट झालं आहे. मोठ्या प्रमाणात सभा आणि रोड शो घेणार्‍या राहुल गांधी यांच्या प्रयत्नांना मात्र यश मिळालेलं नाही. तर गेल्या निवडणुकीत बसपानं 206 जागा जिंकल्या होत्या. पण यावेळी बसपाला अजून शंभरचा आकडाही गाठता आलेला नाही. उत्तरप्रदेशमधल्या यशानंतर लखनौमधल्या सपाच्या कार्यालयासमोर सपाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा दिल्या. फटाके फोडून कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला.

मुलायमसिंग हेच मुख्यमंत्री - अखिलेश यादव

अखिलेश यादव यांची चोख कामगिरी उत्तरप्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाच्या यशाचे शिल्पकार ठरले ते त्यांच्या पक्षाचे तरुण नेते अखिलेश यादव...समाजवादी पक्षाचा तरुण चेहरा...मिळालेल्या यशाचा चेहर्‍यावर दिसणारा आनंद...पण त्यातही भविष्यातल्या जबाबदारीचं असलेलं भान..उत्तरप्रदेशच्या निवडणुकीत समाजवादी पक्षाची एकहाती धुरा सांभाळली ती अखिलेश यादव यांनी.अमरसिंह जसे पक्षातून बाहेर पडले, त्यानंतर अखिलेशनं पक्षाची कमान सांभाळली आणि संघटनात्मक ढाचाच बदलून टाकला.

एवढंच नाही, तर पक्षातल्या नेत्यांवर जबाबदारीनं विश्वासही टाकला. त्याचंच हे यश...समाजवादी पक्षाची पार्श्वभूमी ही गुन्हेगारी आहे, त्यातच त्यांना यावेळी स्पष्ट बहुमत मिळालंय. त्यावरुन अनेक प्रश्न उपस्थित होताहेत. त्यावर या तरुण नेत्यानं दिलेलं उत्तर..

अखिलेश यादव म्हणतात, हम भरोसा दिलाते है की कोई भी व्यक्ती.

उत्तरप्रदेशच्या संपूर्ण निवडणुकीत मुलायम सिंह यांनी निवडणुकीची धुरा अखिलेशवर सोपवली होती. पण मुलायम सिंह पडद्यामागून या सगळ्यावर लक्ष ठेवून होते. त्यांनी या सगळ्याचं यशाचं श्रेय अखिलेशला दिलंय.

अखिलेशचा उत्तरप्रदेशातला झंझावात पाहून काँग्रेसनं त्यांच्या युवराजांना मैदानात उतरवलं. पण फायदा काहीच झाला नाही, उलट युवराजांवर अपयशाचं खापर कसं फोडायचं म्हणून नेतेच जबाबदारी स्वीकारताना दिसत होते. काँग्रेस राहुल गांधींना जरुर उत्तरप्रदेशचा चेहरा म्हणून उतरवत असलं, तरी आजच्या निकालावरुन भविष्यात अखिलेश हाच उत्तरप्रदेशचा नेता असेल हे स्पष्ट दिसतंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 6, 2012 01:23 PM IST

ताज्या बातम्या