उत्तर प्रदेशात शेवटच्या टप्प्यात 62 टक्के मतदान

उत्तर प्रदेशात शेवटच्या टप्प्यात 62 टक्के मतदान

03 फेब्रुवारीउत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात आज 62 टक्के मतदान झालं. 10 जिल्ह्यांमध्ये 60 जागांसाठी हे मतदान झालं. उत्तरप्रदेशात यापूर्वी सहाही टप्प्यात चांगलं मतदान झालं आहे. 962 उमेदवारांचे भवितव्य आज मतदानयंत्रात बंद झालं. यात 100 महिलांचा समावेश आहे. निवडणुकीचे सातही टप्पे संपल्याने आता लक्ष मंगळवारच्या मतमोजणीकडे लागलं आहे. गेल्या निवडणुकीत या भागातल्या निम्म्या जागा बहुजन समाज पक्षाला मिळाल्या होत्या. या निवडणुकीत मायावती यांची प्रतिष्ठा पणाला लागली. तर राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांची कसोटी लागणार आहे.

  • Share this:

03 फेब्रुवारी

उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात आज 62 टक्के मतदान झालं. 10 जिल्ह्यांमध्ये 60 जागांसाठी हे मतदान झालं. उत्तरप्रदेशात यापूर्वी सहाही टप्प्यात चांगलं मतदान झालं आहे. 962 उमेदवारांचे भवितव्य आज मतदानयंत्रात बंद झालं. यात 100 महिलांचा समावेश आहे. निवडणुकीचे सातही टप्पे संपल्याने आता लक्ष मंगळवारच्या मतमोजणीकडे लागलं आहे. गेल्या निवडणुकीत या भागातल्या निम्म्या जागा बहुजन समाज पक्षाला मिळाल्या होत्या. या निवडणुकीत मायावती यांची प्रतिष्ठा पणाला लागली. तर राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांची कसोटी लागणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 3, 2012 05:02 PM IST

ताज्या बातम्या