कृपांची मुंबईतील सर्व संपत्ती जप्त ;अटक कधी ?

कृपांची मुंबईतील सर्व संपत्ती जप्त ;अटक कधी ?

02 फेब्रुवारीमुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष कृपाशंकर सिंह हे आपल्यावर कारवाई होऊ नये म्हणून मुंबईपासून दिल्लीपर्यंत धावत होते. पण आज अखेरीस त्यांच्यावर मुंबई पोलिसांनी कारवाई केली. त्यांची मुंबईतली सर्व संपत्ती जप्त करण्यात आली. मुंबईतल्या 19 ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. जप्त केलेल्या मालमत्तेचा आणि लोकांच्या जबाबाचा अहवाल तयार करण्यात येणार आहे. हा अहवाल सादर केल्यानंतर पोलीस कृपाशंकर यांना अटक करण्याची शक्यता आहे.हायकोर्टाने आदेश दिल्यानंतर अखेरीस 9 दिवसांनी मुंबई पोलिसांनी कृपाशंकर सिंह यांची मालमत्ता जप्त केली. आपली प्रॉपर्टी जप्त होऊ नये, म्हणून कृपांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. पण तिथं सुनावणी सुरू होण्याआधीच मुंबई पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. आणि कृपाशंकर यांच्या मुंबईतल्या 19 मालमत्ता जप्त केल्या. या करावाईसाठी सुरुवात झाली. सकाळी 8:30 वाजता.. कृपाशंकर यांचा वांद्र्याच्या साईप्रसाद बिल्डिंगपासून. वांद्रामध्येच असलेल्या कार्टर रोड भागातला 4660 स्क्वे.फू.चा आलिशान तरंग बंगलाही सील करण्यात आला. यानंतर पवईतल्या पॉश हिरानंदानी कॉम्प्लेक्समध्ये घोटाळेबाज कृपांचे 2 व्यापारी गाळे आणि फ्लॅटसुद्धा पोलिसांच्या नजरेतून सुटले नाहीत. जप्ती झाल्यामुळे आता यांपैकी कोणत्याही घरात आता कृपाशंकर किंवा त्यांच्या कुटुंबीयांना राहता येणार नाही. पण मुंबईबाहेरही कृपाशंकर यांची जौनपूरमध्ये मोठी संपत्ती आहे. तर रत्नागिरीमध्ये 6 एकरची फळबाग आहे. इथे मात्र कारवाई करण्यात आली नाही. संपत्ती जप्त - विलेपार्ले : ज्यूपिटर बिल्डिंगमध्ये 1355 स्क्वे.फूट आणि 550 स्क्वे.फूट असे दोन फ्लॅट्स- कार्टर रोड, वांद्रे : 4660 स्क्वे.फुटाचा 'तरंग' बंगला- माऊंट मेरी रोड, वांद्रे : आलिशान फ्लॅट- टर्नर रोड, वांद्रे : 'अफेअर' या आलिशान बिल्डिंगमध्ये 2000 स्क्वे.फूट फ्लॅट- वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स : एचडीआयएल (HDIL) च्या कमर्शिअल कॉम्प्लेक्समध्ये 22,500 स्क्वे.फूट ऑफिस- वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स : ट्रेड लिंक, वाधवा बिल्डिंगमध्ये 12,000 स्क्वे.फूट ऑफिस- भांडुप पश्चिम : एचडीआयएल बिल्डिंगमध्ये दुकान- सांताक्रुझमध्ये 8650 स्क्वे.फूट भूखंड- हिरानंदानी गार्डन्स, पवई : 700 स्क्वे.फूट फ्लॅट (मुख्यमंत्री कोटा)- हिरानंदानी गार्डन्स, पवई : 'गॅलेरिया' या आलिशान कमर्शिअल कॉम्प्लेक्समध्ये दोन व्यापारी गाळे

  • Share this:

02 फेब्रुवारी

मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष कृपाशंकर सिंह हे आपल्यावर कारवाई होऊ नये म्हणून मुंबईपासून दिल्लीपर्यंत धावत होते. पण आज अखेरीस त्यांच्यावर मुंबई पोलिसांनी कारवाई केली. त्यांची मुंबईतली सर्व संपत्ती जप्त करण्यात आली. मुंबईतल्या 19 ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. जप्त केलेल्या मालमत्तेचा आणि लोकांच्या जबाबाचा अहवाल तयार करण्यात येणार आहे. हा अहवाल सादर केल्यानंतर पोलीस कृपाशंकर यांना अटक करण्याची शक्यता आहे.

हायकोर्टाने आदेश दिल्यानंतर अखेरीस 9 दिवसांनी मुंबई पोलिसांनी कृपाशंकर सिंह यांची मालमत्ता जप्त केली. आपली प्रॉपर्टी जप्त होऊ नये, म्हणून कृपांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. पण तिथं सुनावणी सुरू होण्याआधीच मुंबई पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. आणि कृपाशंकर यांच्या मुंबईतल्या 19 मालमत्ता जप्त केल्या. या करावाईसाठी सुरुवात झाली. सकाळी 8:30 वाजता.. कृपाशंकर यांचा वांद्र्याच्या साईप्रसाद बिल्डिंगपासून. वांद्रामध्येच असलेल्या कार्टर रोड भागातला 4660 स्क्वे.फू.चा आलिशान तरंग बंगलाही सील करण्यात आला. यानंतर पवईतल्या पॉश हिरानंदानी कॉम्प्लेक्समध्ये घोटाळेबाज कृपांचे 2 व्यापारी गाळे आणि फ्लॅटसुद्धा पोलिसांच्या नजरेतून सुटले नाहीत. जप्ती झाल्यामुळे आता यांपैकी कोणत्याही घरात आता कृपाशंकर किंवा त्यांच्या कुटुंबीयांना राहता येणार नाही. पण मुंबईबाहेरही कृपाशंकर यांची जौनपूरमध्ये मोठी संपत्ती आहे. तर रत्नागिरीमध्ये 6 एकरची फळबाग आहे. इथे मात्र कारवाई करण्यात आली नाही.

संपत्ती जप्त

- विलेपार्ले : ज्यूपिटर बिल्डिंगमध्ये 1355 स्क्वे.फूट आणि 550 स्क्वे.फूट असे दोन फ्लॅट्स- कार्टर रोड, वांद्रे : 4660 स्क्वे.फुटाचा 'तरंग' बंगला- माऊंट मेरी रोड, वांद्रे : आलिशान फ्लॅट- टर्नर रोड, वांद्रे : 'अफेअर' या आलिशान बिल्डिंगमध्ये 2000 स्क्वे.फूट फ्लॅट- वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स : एचडीआयएल (HDIL) च्या कमर्शिअल कॉम्प्लेक्समध्ये 22,500 स्क्वे.फूट ऑफिस- वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स : ट्रेड लिंक, वाधवा बिल्डिंगमध्ये 12,000 स्क्वे.फूट ऑफिस- भांडुप पश्चिम : एचडीआयएल बिल्डिंगमध्ये दुकान- सांताक्रुझमध्ये 8650 स्क्वे.फूट भूखंड- हिरानंदानी गार्डन्स, पवई : 700 स्क्वे.फूट फ्लॅट (मुख्यमंत्री कोटा)- हिरानंदानी गार्डन्स, पवई : 'गॅलेरिया' या आलिशान कमर्शिअल कॉम्प्लेक्समध्ये दोन व्यापारी गाळे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 2, 2012 05:12 PM IST

ताज्या बातम्या