उत्तर प्रदेशात काँग्रेससोबत जाणार नाही - अखिलेश यादव

उत्तर प्रदेशात काँग्रेससोबत जाणार नाही - अखिलेश यादव

29 फेब्रुवारीउत्तर प्रदेश निवडणुकीची रणधुमाळी आता शेवटच्या टप्प्यात पोचली आहे. पण निवडणूक निकालानंतर काँग्रेसबरोबर युती करणार नाही असं समाजवादी पक्षाचे स्टार प्रचारक आणि मुख्यमंत्री पदाचे उमेदवार अखिलेश यादव यांनी स्पष्ट केलंय. आयबीएन नेटवर्कचे एडिटर इन चीफ राजदीप सरदेसाई यांना दिलेल्या विशेष मुलाखतीत अखिलेश यादव यांनी ही प्रतिक्रिया दिली. काँग्रेसबरोबर जाण्याचा विचार होऊ शकतो, असं काहीच दिवसांपूर्वी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायम सिंह यादव यांनी म्हटलं होतं. पण तसा काही विचार नसल्याचं यादव यांनी म्हटलंय. राज्यात समाजवादी पक्षाचंच सरकार येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

  • Share this:

29 फेब्रुवारी

उत्तर प्रदेश निवडणुकीची रणधुमाळी आता शेवटच्या टप्प्यात पोचली आहे. पण निवडणूक निकालानंतर काँग्रेसबरोबर युती करणार नाही असं समाजवादी पक्षाचे स्टार प्रचारक आणि मुख्यमंत्री पदाचे उमेदवार अखिलेश यादव यांनी स्पष्ट केलंय. आयबीएन नेटवर्कचे एडिटर इन चीफ राजदीप सरदेसाई यांना दिलेल्या विशेष मुलाखतीत अखिलेश यादव यांनी ही प्रतिक्रिया दिली. काँग्रेसबरोबर जाण्याचा विचार होऊ शकतो, असं काहीच दिवसांपूर्वी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायम सिंह यादव यांनी म्हटलं होतं. पण तसा काही विचार नसल्याचं यादव यांनी म्हटलंय. राज्यात समाजवादी पक्षाचंच सरकार येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 29, 2012 01:08 PM IST

ताज्या बातम्या