आघाडीच्या गाडीला 'मराठी'स्टेअरिंग !

23 फेब्रुवारीमुंबई महापालिकेवर पुन्हा भगवा फडकल्यानंतर आता काँग्रेस-राष्ट्रवादीलाही मराठी प्रेमाचं भरतं आलं आहे. मुंबईत काँग्रेसमध्ये नवं कार्याध्यक्ष पद निर्माण करून तिथं मराठी माणसाची नियुक्ती करायची, असा विचार चालला आहे. तर, मुंबईत पक्षाची पुनर्बांधनी करण्यासाठी राष्ट्रवादीने मराठी माणसावर लक्ष केंद्रीत करायला हवं, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.कृपाशंकर सिंह यांनी राजीनामा देताच.. त्यांचा उत्तराधिकारी कोण यावर काँग्रेसमध्ये बराच खल चालला आहे. महापालिका निवडणुकीत मराठी माणसाने काँग्रेसला दूर केल्यामुळे काँग्रेसला उशिरा का होईना मराठीचं महत्त्व लक्षात आलंय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई काँग्रेसचा अध्यक्ष अमराठी असल्यास कार्याध्यक्षाचं नवं पद निर्माण करायचं आणि तिथं मराठी माणसाची वर्णी लावायची, अशी खुद्द मुख्यमंत्र्यांची इच्छा आहे आणि या नेमणुका लवकरच होतील, असं प्रदेशाध्यक्षांनी स्पष्ट केलं आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीला पश्चातबुद्धी झाली. मुंबईत मराठी माणसाकडे दुर्लक्ष करू नये, असा सल्ला जयंत पाटलांनी दिला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत प्रिया दत्त सगळ्यांत आघाडीवर आहेत. तर भाई जगताप, मधू चव्हाण आणि चंद्रकातं हंडोरे हे कार्याध्यक्षपदाच्या शर्यतीत आहेत. गटातटाच्या राजकारणात अडकलेल्या मुंबई काँग्रेसची धुरा स्वच्छ प्रतिमेच्या व्यक्तीकडे दिली जावी, अशी इच्छा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, कृपाशंकर सिंह यांनी एमआरसीसी (MRCC) च्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आता त्यांचा उत्तराधिकारी कोण, याविषयी सुप्त चर्चा सुरु झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई काँग्रेस अध्यक्षपदासाठी खासदार प्रिया दत्त, आमदार चंद्रकांत हंडोरे, आमदार मधु चव्हाण, आमदार राजहंस सिंह आणि भाई जगताप यांची नावं आघाडीवर आहेत. अध्यक्षपद निवडीचे सर्वाधिकार सोनिया गांधी यांना दिले जातील असं दिसतंय.नवा एमआरसीसी अध्यक्ष कोण? 1) खा. प्रिया दत्त - स्वच्छ प्रतिमा- सलग दुसर्‍यांदा खासदार- अ. भा. महिला काँग्रेसच्या सरचिटणीस- महिला अध्यक्ष देण्याची हायकमांडची इच्छा2) आ.चंद्रकांत हंडोरे- मुंबई काँग्रेसचा दलित चेहरा- सलग तिसर्‍यांदा आमदार- मंत्रिपदी वर्णी लागली नसल्यानं मुंबई अध्यक्षपदासाठी दावेदारी3) आ.मधू चव्हाण - भायखळ्याचे आमदार - निष्ठावंत म्हणून ओळख - एमआरसीसी अध्यक्षपदासाठी अनेक वर्षांपासून दावेदारी4) आ.राजहंस सिंह - गुरुदास कामत समर्थक - मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेतेयाशिवाय आणखी एक नाव या यादीत आहे. ते आहे खासदार संजय निरुपम यांचं. निरुपम यांनी सर्वात जास्त 11 नगरसेवक निवडून आणलेकृपाशंकर सिंग यांना शह देण्याची धमक तसेच उत्तर भारतीयांचं नवं नेतृत्त्व.

आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Updated On: Feb 23, 2012 01:25 PM IST

आघाडीच्या गाडीला 'मराठी'स्टेअरिंग !

23 फेब्रुवारी

मुंबई महापालिकेवर पुन्हा भगवा फडकल्यानंतर आता काँग्रेस-राष्ट्रवादीलाही मराठी प्रेमाचं भरतं आलं आहे. मुंबईत काँग्रेसमध्ये नवं कार्याध्यक्ष पद निर्माण करून तिथं मराठी माणसाची नियुक्ती करायची, असा विचार चालला आहे. तर, मुंबईत पक्षाची पुनर्बांधनी करण्यासाठी राष्ट्रवादीने मराठी माणसावर लक्ष केंद्रीत करायला हवं, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

कृपाशंकर सिंह यांनी राजीनामा देताच.. त्यांचा उत्तराधिकारी कोण यावर काँग्रेसमध्ये बराच खल चालला आहे. महापालिका निवडणुकीत मराठी माणसाने काँग्रेसला दूर केल्यामुळे काँग्रेसला उशिरा का होईना मराठीचं महत्त्व लक्षात आलंय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई काँग्रेसचा अध्यक्ष अमराठी असल्यास कार्याध्यक्षाचं नवं पद निर्माण करायचं आणि तिथं मराठी माणसाची वर्णी लावायची, अशी खुद्द मुख्यमंत्र्यांची इच्छा आहे आणि या नेमणुका लवकरच होतील, असं प्रदेशाध्यक्षांनी स्पष्ट केलं आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीला पश्चातबुद्धी झाली. मुंबईत मराठी माणसाकडे दुर्लक्ष करू नये, असा सल्ला जयंत पाटलांनी दिला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत प्रिया दत्त सगळ्यांत आघाडीवर आहेत. तर भाई जगताप, मधू चव्हाण आणि चंद्रकातं हंडोरे हे कार्याध्यक्षपदाच्या शर्यतीत आहेत. गटातटाच्या राजकारणात अडकलेल्या मुंबई काँग्रेसची धुरा स्वच्छ प्रतिमेच्या व्यक्तीकडे दिली जावी, अशी इच्छा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, कृपाशंकर सिंह यांनी एमआरसीसी (MRCC) च्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आता त्यांचा उत्तराधिकारी कोण, याविषयी सुप्त चर्चा सुरु झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई काँग्रेस अध्यक्षपदासाठी खासदार प्रिया दत्त, आमदार चंद्रकांत हंडोरे, आमदार मधु चव्हाण, आमदार राजहंस सिंह आणि भाई जगताप यांची नावं आघाडीवर आहेत. अध्यक्षपद निवडीचे सर्वाधिकार सोनिया गांधी यांना दिले जातील असं दिसतंय.

नवा एमआरसीसी अध्यक्ष कोण?

1) खा. प्रिया दत्त - स्वच्छ प्रतिमा- सलग दुसर्‍यांदा खासदार- अ. भा. महिला काँग्रेसच्या सरचिटणीस- महिला अध्यक्ष देण्याची हायकमांडची इच्छा

2) आ.चंद्रकांत हंडोरे- मुंबई काँग्रेसचा दलित चेहरा- सलग तिसर्‍यांदा आमदार- मंत्रिपदी वर्णी लागली नसल्यानं मुंबई अध्यक्षपदासाठी दावेदारी

3) आ.मधू चव्हाण - भायखळ्याचे आमदार - निष्ठावंत म्हणून ओळख - एमआरसीसी अध्यक्षपदासाठी अनेक वर्षांपासून दावेदारी

4) आ.राजहंस सिंह - गुरुदास कामत समर्थक - मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेते

याशिवाय आणखी एक नाव या यादीत आहे. ते आहे खासदार संजय निरुपम यांचं. निरुपम यांनी सर्वात जास्त 11 नगरसेवक निवडून आणलेकृपाशंकर सिंग यांना शह देण्याची धमक तसेच उत्तर भारतीयांचं नवं नेतृत्त्व.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 23, 2012 01:25 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...