मनसेचं इंजिन आणखी पॉवरफूल; नाशिकमध्ये सर्वात मोठा पक्ष

मनसेचं इंजिन आणखी पॉवरफूल; नाशिकमध्ये सर्वात मोठा पक्ष

17 फेब्रुवारीमुंंबई, पुण्यापाठोपाठ नाशिकमध्ये मनसेनं जोरदार मुसंडी मारत तब्बल 37 जागा जिंकल्या आहे. आतापर्यंत निकाल लागलेल्या 108 जागांपैकी 37 जागा मिळवत ,मनसे सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला आहेत. काही जागांवर मनसे आघाडीवरही आहे. गेल्यावेळी मनसेला फक्त 12 जागा मिळाल्या होत्या. त्याखालोखाल राष्ट्रवादीने 20 जागा जिंकत आघाडी कामय राखलीय तर काँग्रेस 15, शिवसेना 18, भाजप 09 तर रिपाइने 3 जागा जिंकल्या आहेत. माकपने 1 तर अपक्षांनी 3 जागी विजय मिळवला आहे. अजूनही 14 जांगाचे निकाल लागायचे आहे.महापालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये मनसेनं दमदार कामगिरी केली. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी खातं उघडत मुंबई, ठाणे आणि पुण्यासारख्या महानगरात देखील मनसेनं गेल्यावेळपेक्षा दुपटी-तिपटीने जागा मिळवल्या आणि जोरकस कामगिरी केलीय. एकूणच गेल्या 2 ते 3 निवडणुकांमध्ये मनसेचा आलेख कसा चढता राहिला ?2009 साली लोकसभेची निवडणूक, 2010 सालची विधानसभेची निवडणूक आणि आता 2012 च्या महापालिकांच्या निवडणुका. मनसे चढत्या क्रमाने जागा जिंकत महाराष्ट्राच्या राजकारणात एक प्रमुख पक्ष म्हणून स्थिरावू पाहतोय. अवघ्या 6 वर्षात मनसेनं प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता मिळवत स्वत:चं निवडणूक चिन्ह देखील मिळवलंय. शहरांपुरता मर्यादित राहिलेला पक्ष, अशी टीका सहन करत मनसेनं राजकारणाला सुरुवात केली. आणि आज जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांध्ये सुद्धा मनसेचे उमेदवार निवडून येताना दिसत आहे. मनसेची ही कामगिरी चमकदार असल्याचं नेते सांगत आहे.एकीकडे मुंबई आणि ठाण्यामध्ये शिवसेना सत्तेत पुनरागमन करतेय. तर, मनसेसुद्धा मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिक या शहरांमध्ये यशस्वी ठरलीय. मराठी मतांमध्ये फूट पाडल्याचा ठपका या अगोदर मनसे वर ठेवला जात होता. पण गेल्यावर्षी झालेल्या कल्याण डोंबिवली पालिकेच्या निवडणुका आणि यंदाच्या निवडणुका पाहता मनसेनं शिवसेनेपेक्षा काँग्रेस आघाडीलाच जोरदार फटका दिल्याचं स्पष्ट दिसतं आहे. शिवसेना आणि मनसे एकत्रीकरणाची सध्या जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे. एकत्रीकरण झाल्यास 2014 सालच्या विधानसभा निवडणुकांमध्ये सेना मनसेची सत्ता देखील येऊ शकते, अशीही अटकळ बांधली जातेय. पण एकत्रीकरणाशिवाय देखील मनसेचा चढता आलेख पाहता आम्ही स्वत:ला सिद्ध केलंय, हा राज ठाकरेंचा दावा सक्षमपणे पर्याय संयुक्तिक वाटतंय पण सत्ताधार्‍यांना पर्याय म्हणून मनसेचं अस्तित्व अजूनही सिद्ध व्हायचं आहे.अधिक अपडेटसाठी आयबीएन लोकमत फेसबुक पेजला भेट देण्यासाठी लिंकवर क्लिक करा IBN Lokmat

  • Share this:

17 फेब्रुवारी

मुंंबई, पुण्यापाठोपाठ नाशिकमध्ये मनसेनं जोरदार मुसंडी मारत तब्बल 37 जागा जिंकल्या आहे. आतापर्यंत निकाल लागलेल्या 108 जागांपैकी 37 जागा मिळवत ,मनसे सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला आहेत. काही जागांवर मनसे आघाडीवरही आहे. गेल्यावेळी मनसेला फक्त 12 जागा मिळाल्या होत्या. त्याखालोखाल राष्ट्रवादीने 20 जागा जिंकत आघाडी कामय राखलीय तर काँग्रेस 15, शिवसेना 18, भाजप 09 तर रिपाइने 3 जागा जिंकल्या आहेत. माकपने 1 तर अपक्षांनी 3 जागी विजय मिळवला आहे. अजूनही 14 जांगाचे निकाल लागायचे आहे.

महापालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये मनसेनं दमदार कामगिरी केली. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी खातं उघडत मुंबई, ठाणे आणि पुण्यासारख्या महानगरात देखील मनसेनं गेल्यावेळपेक्षा दुपटी-तिपटीने जागा मिळवल्या आणि जोरकस कामगिरी केलीय. एकूणच गेल्या 2 ते 3 निवडणुकांमध्ये मनसेचा आलेख कसा चढता राहिला ?

2009 साली लोकसभेची निवडणूक, 2010 सालची विधानसभेची निवडणूक आणि आता 2012 च्या महापालिकांच्या निवडणुका. मनसे चढत्या क्रमाने जागा जिंकत महाराष्ट्राच्या राजकारणात एक प्रमुख पक्ष म्हणून स्थिरावू पाहतोय. अवघ्या 6 वर्षात मनसेनं प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता मिळवत स्वत:चं निवडणूक चिन्ह देखील मिळवलंय. शहरांपुरता मर्यादित राहिलेला पक्ष, अशी टीका सहन करत मनसेनं राजकारणाला सुरुवात केली. आणि आज जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांध्ये सुद्धा मनसेचे उमेदवार निवडून येताना दिसत आहे. मनसेची ही कामगिरी चमकदार असल्याचं नेते सांगत आहे.

एकीकडे मुंबई आणि ठाण्यामध्ये शिवसेना सत्तेत पुनरागमन करतेय. तर, मनसेसुद्धा मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिक या शहरांमध्ये यशस्वी ठरलीय. मराठी मतांमध्ये फूट पाडल्याचा ठपका या अगोदर मनसे वर ठेवला जात होता. पण गेल्यावर्षी झालेल्या कल्याण डोंबिवली पालिकेच्या निवडणुका आणि यंदाच्या निवडणुका पाहता मनसेनं शिवसेनेपेक्षा काँग्रेस आघाडीलाच जोरदार फटका दिल्याचं स्पष्ट दिसतं आहे.

शिवसेना आणि मनसे एकत्रीकरणाची सध्या जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे. एकत्रीकरण झाल्यास 2014 सालच्या विधानसभा निवडणुकांमध्ये सेना मनसेची सत्ता देखील येऊ शकते, अशीही अटकळ बांधली जातेय. पण एकत्रीकरणाशिवाय देखील मनसेचा चढता आलेख पाहता आम्ही स्वत:ला सिद्ध केलंय, हा राज ठाकरेंचा दावा सक्षमपणे पर्याय संयुक्तिक वाटतंय पण सत्ताधार्‍यांना पर्याय म्हणून मनसेचं अस्तित्व अजूनही सिद्ध व्हायचं आहे.

अधिक अपडेटसाठी आयबीएन लोकमत फेसबुक पेजला भेट देण्यासाठी लिंकवर क्लिक करा IBN Lokmat

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 17, 2012 02:47 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading