भाजपकडून गौतम गंभीरला 'या' जागेचं मिळणार तिकीट?

भाजपकडून गौतम गंभीरला 'या' जागेचं मिळणार तिकीट?

टीम इंडियाचा माजी क्रिकेटर गौतम गंभीर लोकसभा निवडणूक लढणार असल्याची जोरदार चर्चा आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 13 मार्च : क्रिकेटचं मैदान गाजवणारा गौतम गंभीर आता राजकारणाच्या आखाड्यात आपलं नशीब आजमावणार असल्याची माहिती समोर आली आहे. टीम इंडियाचा माजी क्रिकेटर गौतम गंभीर लोकसभा निवडणूक लढणार असल्याची जोरदार चर्चा आहे. भाजपकडून नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघातून गौतम गंभीरला निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात येणार असल्याचे म्हटलं जात आहे.

दरम्यान, सध्या मीनाक्षी लेखी या मतदारसंघातील खासदार आहेत. पण या मतदार संघातून आता गौतम गंभीरला संधी मिळणार असल्याची जोरदार चर्चा आहे.  त्यामुळे भाजपकडून मीनाक्षी लेखींना अन्य जागेची उमेदवारी देण्याची शक्यता आहे. पण अद्याप या चर्चांना अधिकृतरित्या दुजोरा मिळालेला नाही.

2014मधील लोकसभा निवडणुकीत मीनाक्षी लेखी यांना 4,53,350(46.75 टक्के)मतं मिळाली होती. या जागेवर दुसऱ्या क्रमांकावर प्रतिस्पर्धी आम आदमी पक्षाचे उमेदवार आशीष खेतान यांना 2,90,642 (29.97 टक्के) मतं मिळाली होती.  तर काँग्रेसचे अजय माकन हे तिसऱ्या क्रमांकावर  होते. दुसरीकडे या जागेवर काँग्रेसचा सात वेळा विजय झाला आहे. जनसंघचे नेते बलराज मधोक हे देखील याच जागेवर एकदा निवडून आले होते. विशेष म्हणजे 1977मधील निवडणुकीत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी तसंच 1989 आणि 1991 मध्ये लालकृष्ण आडवाणी यांनी याच जागेवरून विजय मिळवला होता. तर, 1992मध्ये झालेल्या पोट निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार राजेश खन्ना यांनी भाजपचे उमेदवार शत्रुघ्न सिन्हा धूळ चारली होती.

हायप्रोफाईल जागा

आतापर्यंत नवी दिल्ली मतदारसंघातून चर्चेत असलेल्या चेहऱ्यांनाच निवडणूक लढवण्याची संधी दिली गेली आहे. पण आता समीकरण बदलत असल्याचे दिसत आहे. आम आदमी पार्टीला दणका देत काँग्रेसने स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे आम आदमी पार्टीनं देखील दिल्लीच्या सहा जागांवर आपले उमेदवार उतरवण्याची घोषणा केली आहे.

वाचा अन्य बातम्या

'असा खासदार अमेठीला नकोय', 'त्या' विधानामुळे बालेकिल्ल्यातच राहुल गांधींना धक्का

मातोश्रीवरील बैठकीत मुख्यमंत्र्यांनी ठरवला निवडणुकीचा मास्टरप्लॅन

शरद पवार यांचे नरेंद्र मोदींसंदर्भात मोठं भाकित, म्हणाले...

VIDEO: भीषण अपघात ! डिव्हायडरला धडकून कार हवेत उडाली, अन्...

First published: March 13, 2019, 10:58 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading