कसाबला हवी आहे जन्मठेप !

कसाबला हवी आहे जन्मठेप !

14 फेब्रुवारीमुंबईवर झालेल्या 26/11 दहशतवादी हल्ल्यात जिवंत सापडलेला अतिरेकी अजमल कसाबने सुप्रीम कोर्टात अर्ज सादर केला आहे. आपल्याला ठोठवण्यात आलेली फाशीची शिक्षा ही जन्मठेपेवर आणावी अशी मागणी त्याने केली आहे. कसाबतर्फे त्याच्या वकिलांनी कोर्टात आज अर्ज सादर केला. 26/11 मुंबईवर झालेल्या हल्ल्याचे देशावर हल्ला असे वर्णन करण्यात येते. समुद्रीमार्गाने आलेल्या दहशतवाद्यांनी मुंबईला टार्गेट करत ताज हॉटेल, सीएसटी, लियोपोड हॉटेल, हॉटेल ट्रायडेन्टमध्ये हैदोस घातला. यात 145 निष्पांप लोकांचा बळी गेला. तसेच या हल्ल्यातील जखमींना कायमचं वेदना सहन करावी लागत आहे. या हल्ल्यात भारताच्या तावडीत एकमेव अतिरेकी जिंवत अजमल कसाब सापडला. कसाबला अलिकडे फाशीची शिक्षा कायम ठेवण्यात आली आहे. आता पुन्हा एकदा कसाबने कोर्टात जन्मठेपेवर आणावी अशी मागणी केली आहे. कसाबला याअगोदर 10 मेला आर्थर रोड कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली आणि फेब्रुवारी 2011 हायकोर्टाने फाशीची शिक्षा अंतिम ठरवली.

  • Share this:

14 फेब्रुवारी

मुंबईवर झालेल्या 26/11 दहशतवादी हल्ल्यात जिवंत सापडलेला अतिरेकी अजमल कसाबने सुप्रीम कोर्टात अर्ज सादर केला आहे. आपल्याला ठोठवण्यात आलेली फाशीची शिक्षा ही जन्मठेपेवर आणावी अशी मागणी त्याने केली आहे. कसाबतर्फे त्याच्या वकिलांनी कोर्टात आज अर्ज सादर केला. 26/11 मुंबईवर झालेल्या हल्ल्याचे देशावर हल्ला असे वर्णन करण्यात येते. समुद्रीमार्गाने आलेल्या दहशतवाद्यांनी मुंबईला टार्गेट करत ताज हॉटेल, सीएसटी, लियोपोड हॉटेल, हॉटेल ट्रायडेन्टमध्ये हैदोस घातला. यात 145 निष्पांप लोकांचा बळी गेला. तसेच या हल्ल्यातील जखमींना कायमचं वेदना सहन करावी लागत आहे. या हल्ल्यात भारताच्या तावडीत एकमेव अतिरेकी जिंवत अजमल कसाब सापडला. कसाबला अलिकडे फाशीची शिक्षा कायम ठेवण्यात आली आहे. आता पुन्हा एकदा कसाबने कोर्टात जन्मठेपेवर आणावी अशी मागणी केली आहे. कसाबला याअगोदर 10 मेला आर्थर रोड कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली आणि फेब्रुवारी 2011 हायकोर्टाने फाशीची शिक्षा अंतिम ठरवली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 14, 2012 02:10 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...