उद्या 'गोळाबेरीज' सिनेमागृहात

09 फेब्रुवारीसगळीकडे इलेक्शनची 'गोळाबेरीज' सुरू आहे. पण सिनेप्रेमींसाठी पुलंची गोळाबेरीज या आठवड्यात सिनेमागृहात पहायला मिळणार आहे. त्याचबरोबर व्हॅलेन्टाईनच्या निमित्ताने करिना-इम्रानचा रोमॅन्स...या आठवड्यात दोन मराठी सिनेमे पाहायला मिळणार आहेत. त्यातला एक आहे गोळाबेरीज. क्षितीज झारापकरचे दिग्दर्शन असलेल्या या सिनेमात पुलंनी लिहिलेल्या वेगवेगळ्या व्यक्तीरेखा आपल्याला पहायला मिळणार आहेत. याशिवाय स्वत: पु.लं देशपांडे आणि सुनीताबाई या व्यक्तिरेखाही भेटणार आहेत. निखिल रत्नपारखीने पु.लं देशपांडे उभे केलेत, तर सुनीताबाईंच्या भूमिकेत त्यांची नात नेहा देशपांडे-कामत हिनं काम केलं आहे. याशिवाय सिनेमात दिलीप प्रभावळकर, मोहन आगाशे, पुष्कर श्रोत्री, सुबोध भावे अशा अनेक कलाकारांच्या भूमिका आहेत. दुसरा मराठी सिनेमा रिलीज होतोय तो म्हणजे सतरंगी रे.. एका रॉक बँडवर हा सिनेमा आहे. आदिनाथ कोठारे, अमृता,तरुण चेहरे आणि नवीन कथानक यांमुळे या सिनेमाचा लूक वेगळा ठरतोय. या सिनेमात आदिनाथ कोठारे, अमृता खानविलकर, भूषण प्रधान, सौमिल शृंगारपूरे, सिध्दार्थ चांदेकर आणि पूजा सावंत यांच्या भूमिका आहेत. तर सिनेमात शान, सुनिधी चौहान, सुमित्रा अय्यर, स्वप्नील बांदोडकर, राहूल देशपांडे यांनी गाणी गायली आहेत. शंकर एहसान आणि लॉय या संगीतकार त्रिकूटाने देखील या सिनेमात गाणी गायली. एकूणच अजय नाईक याचा पहिला प्रयत्न आणि तरुणाईला वेगळ्या रंगात रंगवणारा सतरंगी रे बॉक्स ऑफिसवर किती रंग उधळेल हे मात्र सिनेमा रिलीज झाल्यावर कळेल.तसेच एक हिंदी सिनेमादेखील रिलीज होतोय.एक मै और एक तू....इम्रान खान आणि करिना कपूर पहिल्यांदाच या सिनेमातून एकत्र आपल्यासमोर येतोय. या सिनेमात रोमॅन्टीक कॉमेडी असून याचं दिग्दर्शन केलंय शकून बत्रानं...तर सिनेमाची निर्मिती केली आहे करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शननं...तसेच या सिनेमात राम कपूर,बोमन इराणी, आणि रत्ना पारखी यांच्यादेखील भूमिका आहेत. इम्रान आणि करिना यांच्यातील मैत्री-प्रेम विनोदीपद्धतीने मांडण्यात आलं आहे. इम्रान-करिनाचा हा रोमान्स व्हॅलेन्टाईन डे च्या निमित्ताने या आठवड्यात आपल्याला पडद्यावर पहायला मिळेल.

आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Updated On: Feb 9, 2012 03:23 PM IST

उद्या 'गोळाबेरीज' सिनेमागृहात

09 फेब्रुवारी

सगळीकडे इलेक्शनची 'गोळाबेरीज' सुरू आहे. पण सिनेप्रेमींसाठी पुलंची गोळाबेरीज या आठवड्यात सिनेमागृहात पहायला मिळणार आहे. त्याचबरोबर व्हॅलेन्टाईनच्या निमित्ताने करिना-इम्रानचा रोमॅन्स...

या आठवड्यात दोन मराठी सिनेमे पाहायला मिळणार आहेत. त्यातला एक आहे गोळाबेरीज. क्षितीज झारापकरचे दिग्दर्शन असलेल्या या सिनेमात पुलंनी लिहिलेल्या वेगवेगळ्या व्यक्तीरेखा आपल्याला पहायला मिळणार आहेत. याशिवाय स्वत: पु.लं देशपांडे आणि सुनीताबाई या व्यक्तिरेखाही भेटणार आहेत. निखिल रत्नपारखीने पु.लं देशपांडे उभे केलेत, तर सुनीताबाईंच्या भूमिकेत त्यांची नात नेहा देशपांडे-कामत हिनं काम केलं आहे. याशिवाय सिनेमात दिलीप प्रभावळकर, मोहन आगाशे, पुष्कर श्रोत्री, सुबोध भावे अशा अनेक कलाकारांच्या भूमिका आहेत.

दुसरा मराठी सिनेमा रिलीज होतोय तो म्हणजे सतरंगी रे.. एका रॉक बँडवर हा सिनेमा आहे. आदिनाथ कोठारे, अमृता,तरुण चेहरे आणि नवीन कथानक यांमुळे या सिनेमाचा लूक वेगळा ठरतोय. या सिनेमात आदिनाथ कोठारे, अमृता खानविलकर, भूषण प्रधान, सौमिल शृंगारपूरे, सिध्दार्थ चांदेकर आणि पूजा सावंत यांच्या भूमिका आहेत. तर सिनेमात शान, सुनिधी चौहान, सुमित्रा अय्यर, स्वप्नील बांदोडकर, राहूल देशपांडे यांनी गाणी गायली आहेत. शंकर एहसान आणि लॉय या संगीतकार त्रिकूटाने देखील या सिनेमात गाणी गायली. एकूणच अजय नाईक याचा पहिला प्रयत्न आणि तरुणाईला वेगळ्या रंगात रंगवणारा सतरंगी रे बॉक्स ऑफिसवर किती रंग उधळेल हे मात्र सिनेमा रिलीज झाल्यावर कळेल.

तसेच एक हिंदी सिनेमादेखील रिलीज होतोय.एक मै और एक तू....इम्रान खान आणि करिना कपूर पहिल्यांदाच या सिनेमातून एकत्र आपल्यासमोर येतोय. या सिनेमात रोमॅन्टीक कॉमेडी असून याचं दिग्दर्शन केलंय शकून बत्रानं...तर सिनेमाची निर्मिती केली आहे करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शननं...तसेच या सिनेमात राम कपूर,बोमन इराणी, आणि रत्ना पारखी यांच्यादेखील भूमिका आहेत. इम्रान आणि करिना यांच्यातील मैत्री-प्रेम विनोदीपद्धतीने मांडण्यात आलं आहे. इम्रान-करिनाचा हा रोमान्स व्हॅलेन्टाईन डे च्या निमित्ताने या आठवड्यात आपल्याला पडद्यावर पहायला मिळेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 9, 2012 03:23 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...