निवडणुकीच्या आखाड्यात सर्वपक्षीय गुन्हेगार !

08 फेब्रुवारीमुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांची यादी तयार केली आहे. या यादीवरुन धक्कादायक माहिती उघड झाली आहे. जनतेची सेवा करण्यासाठी पाच वर्षाची सत्ता मिळवणार्‍या पक्षांमध्ये गुन्हेगार उमेदवारींनी खच्चून भरली गेली आहे. काल जनतेला दमबाजी करुन दहशत माजवणारे गुन्हेगार आता पक्षांच्या कृपेमुळे गल्लोगल्ली मत मागण्यासाठी उमेदवारांच्या वेशात हात जोडून फिरत आहे. मात्र हे चित्र प्रत्येक निवडणुकांना असेच असते मात्र एकदा जनतेनं याकडे कानाडोळा केल्यामुळे याही वर्षी महानगरपालिकेच्या निवडणुकीला अंडरवर्ल्ड डॉनपासून ते त्यांचे नातेवाईक आणि गल्लीबोळातील अनेक गुन्हेगार मैदानात उतरले आहे. आता सर्वसामान्य जनतेची कोणती सेवा करण्यासाठी मैदानात उतरले आहे मोठा यक्ष प्रश्न आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले मुंबई महापालिका निवडणुकीच्या रिंगणातील उमेदवारमुंबईत एकूण 295 उमेदवार हे गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचं त्यात स्पष्ट झालंय. मुंबईत एकूण 227 वॉर्ड आहेत. त्यात एकूण 3424 उमेदवार रिंगणात आहेत. यापैकी 295 उमेदवार हे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले आहेत. यात खंडणी, मारहाण, दरोडा या गुन्ह्यांचा समावेश आहे. - सगळ्यात जास्त गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार झोन क्र-7- घाटकोपर, भांडूप,विक्रोळी गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार -54- झोन क्र.12-दहिसर (पूर्व आणि पश्चिम), बोरीवली (पूर्व आणि पश्चिम) गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार-52- झोन क्र-6-चेंबूर,मानखुर्द, गोवंडी, टिळकनगर गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार-46गुन्हेगारांचे कोणते नातेवाईक रिंगणात ?1.उमेदवार-गीता गवळी पक्ष-अखिल भारतीय सेनाअरूण गवळींची मुलगीअरूण गवळीवरचे दाखल गुन्हे- खून आणि सुपारी घेणे, खंडणी मोक्कांतर्गत खटले प्रलंबित2.वंदना गवळीपक्ष-अखिल भारतीय सेना, अरुण गवळींची भावजय3.उमेदवार-साबारेड्डी वोहरापक्ष-आरपीआय(आठवले गट)डी. के. रावचा भाऊडी.के.राववरील गुन्हे- खून आणि कट रचणे मोक्काअंतर्गत खटले प्रलंबितठाणे महानगरपालिका4. उमेदवार राजेश गवारेपक्ष काँग्रेसदीपक पाटील खून प्रकरणात अद्याप फरार दाखल गुन्हे 9खून, खुनाचा प्रयत्न करणे, मारहाण करणे, हत्यार बाळगणे, सार्वजनिक शांततेचा भंग करणे, शिवीगाळ करणे, धमकी देणे इ.5.उमेदवार सुधाकर चव्हाण पक्ष मनसेदाखल गुन्हे 12भ्रष्टाचार, फसवणूक, शिवीगाळ करणे, सरकारी कामात अडथळा आणणे, धमकावणे 2 प्रकरणात निर्दोष सुटका, 10 प्रकरणं कोर्टात प्रलंबितउल्हासनगर महानगरपालिका6) उमेदवार- पप्पू कलानी पक्ष- राष्ट्रवादी काँग्रेसदाखल गुन्हे- 'टाडा' अंतर्गत 9 वर्षे कारावास उल्हासनगरमध्ये पप्पू कलानी यांचा दबदबा7.उमेदवार-अनिल जयसिंघानी पक्ष- राष्ट्रवादीदाखल गुन्हे -07मुंबई जुगार कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल खटले प्रलंबितगुन्हेगारांचे नातेवाईक रिंगणात8.उमेदवार- करिष्मा जयसिंघानीपक्ष- काँग्रेसप्रभाग क्रमांक- 4 बक्रिकेट बुकी अनिल जयसिंघानी याची पत्नीपुणे महानगरपालिका 1)उमेदवार- दीपक मानकरपक्ष-काँग्रेसप्रभाग क्रं-26दाखल गुन्हे - शस्त्राने वार करुन हल्ला करणे, महिलेचा विनयभंग आणि बेकायदा शस्त्र बाळगल्यासंदर्भात गुन्हा 2) उमेदवार - शंकर पवार पक्ष- काँग्रेसदाखल गुन्हे -2 प्रलंबितशस्त्राने हल्ला करून जखमी करणे3.उमेदवार - सुरेश निकाळजे पक्ष- राष्ट्रवादीपिंपरी पोलिसांच्या यादीत 2 क्रमांकदाखल गुन्हे- 16खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा बेकायदेशीरपण,े शस्त्र बाळगणे, खंडणी मागणे, 7 गुन्ह्यांमध्ये निर्दोष सुटका, 9 खटले प्रलंबितपिंपरी-चिंचवड महानगरपालिका1. उमेदवार - कैलास कदमपक्ष - काँग्रेस2010 मध्ये तडीपारीची शिफारस6 महिन्यांनी तडीपारी रद्द, राजकीय दबाव, सर्वपक्षीय नेत्यांची शिफारस पत्रं2. उमेदवार - अतुल घुलेपक्ष- शिवसेना दाखल गुन्हे - दंगल घडवणे खुनाचा प्रयत्नपोलीस दप्तरी अजूनही फरारनाशिकमध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये गुन्हेगारीचं प्रमाण वाढताना दिसतं आहे. मग वाहनांची जाळपोळ असो किंवा भरदिवसा होणारे खून...नाशिककर त्रस्त आहेत. पण याची पर्वा न करता नाशिकमध्येही गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना सर्रास तिकीटं दिली गेली आहे आणि अशी भक्कम गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांच्या नातेवाईकांनाही सर्रास उमेदवारी दिली गेली आहे.नाशिक महानगरपालिका2. उमेदवार - पवन पवारपक्ष- अपक्षदाखल गुन्हे- 08कृष्णकांत बिडवे खून प्रकरणातला मुख्य आरोपी, खटला प्रलंबितइतर 7 दाखल गुन्हे , खुनाचा प्रयत्न करणे, लूटमार करणे, हत्याराने मारहाण करणे, जीवे मारण्याची धमकी देणे, दंगल माजवणे7 गुन्ह्यांमध्ये पुराव्याअभावी मुक्तता26 ऑक्टोबर 2011नाशिक शहरातून तडीपार, सध्या तडीपारीला स्थगिती2.उमेदवार - प्रकाश लोंढे पक्ष- आरपीआयजिल्हाध्यक्ष आरपीआयदाखल गुन्हे -03फसवणूक करणे, खंडणी मागणे, धमकी देणे, दंगल माजवणे, मारहाण करणे, खटले प्रलंबित, तडीपारीची नोटीस 3. उमेदवार- शिवा भागवतपक्ष - काँग्रेसदाखल गुन्हे- 12- खुनाचा प्रयत्न, दंगल माजवणे, हत्याराने मारहाण करणे, लूटमार करणे, 5 खटल्यांमध्ये पुराव्याअभावी मुक्तता,5 खटले कोर्टात सुरू2 खटल्यांमध्ये निर्दोष सुटका4 .उमेदवार - सूर्यकांत लवटेपक्ष- शिवसेनादाखल गुन्हे- 04- जीवे मारण्याची धमकी देणे, जबरदस्तीने कोंडून ठेवणे, दंगल माजवणेसंदीप बिडवे हत्या प्रकरणातील आरोपी शिरीष लवटेचा भाऊगुन्हेगारांचे नातेवाईक रिंगणात1. उमेदवार- अंजुम कांदे आणि गुरुदेव कांदेपक्ष- अपक्षसुहास कांदे यांची पत्नी आणि भाऊसुहास कांदेवरील दाखल गुन्हे-खंडणी, धमक्या, मारहाण आणि जाळपोळ , कांदेची जाळपोळप्रकरणी निर्दोष मुक्तता, इतर खटले प्रलंबितसध्या तडीपारीची नोटीस2. उमेदवार - डॉ. सीमा ताजणेपक्ष- राष्ट्रवादी काँग्रेसतडीपार कन्नू ताजणेच्या पत्नीकन्नू ताजणेवरील दाखल गुन्हे, खंडणी, मारहाण, धमकावणे , खटले प्रलंबितगुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार नागपूर महानगरपालिका1.उमेदवार - मधुकर कांबळेपक्ष - काँग्रेस दाखल गुन्हे- खून आणि खुनाचा प्रयत्न, हल्ल्याचा आरोप, खटले प्रलंबित2. उमेदवार- अनिल धावडेपक्ष- भाजपअनेक गुन्ह्यांमध्ये शिक्षा , सट्टा चालवण्याचा आरोप, मोक्कांतर्गत 2001-2008 तुरुंगात, पुराव्याअभावी निर्दोष सुटकाइतर दाखल गुन्हे -हत्यार बाळगणे, हल्ला करणे, जीवे मारण्याची धमकी देणे खटले प्रलंबित

आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Updated On: Feb 8, 2012 05:00 PM IST

निवडणुकीच्या आखाड्यात सर्वपक्षीय गुन्हेगार !

08 फेब्रुवारी

मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांची यादी तयार केली आहे. या यादीवरुन धक्कादायक माहिती उघड झाली आहे. जनतेची सेवा करण्यासाठी पाच वर्षाची सत्ता मिळवणार्‍या पक्षांमध्ये गुन्हेगार उमेदवारींनी खच्चून भरली गेली आहे. काल जनतेला दमबाजी करुन दहशत माजवणारे गुन्हेगार आता पक्षांच्या कृपेमुळे गल्लोगल्ली मत मागण्यासाठी उमेदवारांच्या वेशात हात जोडून फिरत आहे. मात्र हे चित्र प्रत्येक निवडणुकांना असेच असते मात्र एकदा जनतेनं याकडे कानाडोळा केल्यामुळे याही वर्षी महानगरपालिकेच्या निवडणुकीला अंडरवर्ल्ड डॉनपासून ते त्यांचे नातेवाईक आणि गल्लीबोळातील अनेक गुन्हेगार मैदानात उतरले आहे. आता सर्वसामान्य जनतेची कोणती सेवा करण्यासाठी मैदानात उतरले आहे मोठा यक्ष प्रश्न आहे.

गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले मुंबई महापालिका निवडणुकीच्या रिंगणातील उमेदवार

मुंबईत एकूण 295 उमेदवार हे गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचं त्यात स्पष्ट झालंय. मुंबईत एकूण 227 वॉर्ड आहेत. त्यात एकूण 3424 उमेदवार रिंगणात आहेत. यापैकी 295 उमेदवार हे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले आहेत. यात खंडणी, मारहाण, दरोडा या गुन्ह्यांचा समावेश आहे.

- सगळ्यात जास्त गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार झोन क्र-7- घाटकोपर, भांडूप,विक्रोळी गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार -54- झोन क्र.12-दहिसर (पूर्व आणि पश्चिम), बोरीवली (पूर्व आणि पश्चिम) गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार-52- झोन क्र-6-चेंबूर,मानखुर्द, गोवंडी, टिळकनगर गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार-46

गुन्हेगारांचे कोणते नातेवाईक रिंगणात ?

1.उमेदवार-गीता गवळी पक्ष-अखिल भारतीय सेनाअरूण गवळींची मुलगीअरूण गवळीवरचे दाखल गुन्हे- खून आणि सुपारी घेणे, खंडणी मोक्कांतर्गत खटले प्रलंबित2.वंदना गवळीपक्ष-अखिल भारतीय सेना, अरुण गवळींची भावजय

3.उमेदवार-साबारेड्डी वोहरापक्ष-आरपीआय(आठवले गट)डी. के. रावचा भाऊडी.के.राववरील गुन्हे- खून आणि कट रचणे मोक्काअंतर्गत खटले प्रलंबित

ठाणे महानगरपालिका4. उमेदवार राजेश गवारेपक्ष काँग्रेसदीपक पाटील खून प्रकरणात अद्याप फरार दाखल गुन्हे 9खून, खुनाचा प्रयत्न करणे, मारहाण करणे, हत्यार बाळगणे, सार्वजनिक शांततेचा भंग करणे, शिवीगाळ करणे, धमकी देणे इ.

5.उमेदवार सुधाकर चव्हाण पक्ष मनसेदाखल गुन्हे 12भ्रष्टाचार, फसवणूक, शिवीगाळ करणे, सरकारी कामात अडथळा आणणे, धमकावणे 2 प्रकरणात निर्दोष सुटका, 10 प्रकरणं कोर्टात प्रलंबित

उल्हासनगर महानगरपालिका6) उमेदवार- पप्पू कलानी पक्ष- राष्ट्रवादी काँग्रेसदाखल गुन्हे- 'टाडा' अंतर्गत 9 वर्षे कारावास उल्हासनगरमध्ये पप्पू कलानी यांचा दबदबा

7.उमेदवार-अनिल जयसिंघानी पक्ष- राष्ट्रवादीदाखल गुन्हे -07मुंबई जुगार कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल खटले प्रलंबित

गुन्हेगारांचे नातेवाईक रिंगणात8.उमेदवार- करिष्मा जयसिंघानीपक्ष- काँग्रेसप्रभाग क्रमांक- 4 बक्रिकेट बुकी अनिल जयसिंघानी याची पत्नीपुणे महानगरपालिका

1)उमेदवार- दीपक मानकरपक्ष-काँग्रेसप्रभाग क्रं-26दाखल गुन्हे - शस्त्राने वार करुन हल्ला करणे, महिलेचा विनयभंग आणि बेकायदा शस्त्र बाळगल्यासंदर्भात गुन्हा

2) उमेदवार - शंकर पवार पक्ष- काँग्रेसदाखल गुन्हे -2 प्रलंबितशस्त्राने हल्ला करून जखमी करणे

3.उमेदवार - सुरेश निकाळजे पक्ष- राष्ट्रवादीपिंपरी पोलिसांच्या यादीत 2 क्रमांकदाखल गुन्हे- 16खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा बेकायदेशीरपण,े शस्त्र बाळगणे, खंडणी मागणे, 7 गुन्ह्यांमध्ये निर्दोष सुटका, 9 खटले प्रलंबितपिंपरी-चिंचवड महानगरपालिका

1. उमेदवार - कैलास कदमपक्ष - काँग्रेस2010 मध्ये तडीपारीची शिफारस6 महिन्यांनी तडीपारी रद्द, राजकीय दबाव, सर्वपक्षीय नेत्यांची शिफारस पत्रं

2. उमेदवार - अतुल घुलेपक्ष- शिवसेना दाखल गुन्हे - दंगल घडवणे खुनाचा प्रयत्नपोलीस दप्तरी अजूनही फरार

नाशिकमध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये गुन्हेगारीचं प्रमाण वाढताना दिसतं आहे. मग वाहनांची जाळपोळ असो किंवा भरदिवसा होणारे खून...नाशिककर त्रस्त आहेत. पण याची पर्वा न करता नाशिकमध्येही गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना सर्रास तिकीटं दिली गेली आहे आणि अशी भक्कम गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांच्या नातेवाईकांनाही सर्रास उमेदवारी दिली गेली आहे.

नाशिक महानगरपालिका2. उमेदवार - पवन पवारपक्ष- अपक्षदाखल गुन्हे- 08कृष्णकांत बिडवे खून प्रकरणातला मुख्य आरोपी, खटला प्रलंबितइतर 7 दाखल गुन्हे , खुनाचा प्रयत्न करणे, लूटमार करणे, हत्याराने मारहाण करणे, जीवे मारण्याची धमकी देणे, दंगल माजवणे7 गुन्ह्यांमध्ये पुराव्याअभावी मुक्तता26 ऑक्टोबर 2011नाशिक शहरातून तडीपार, सध्या तडीपारीला स्थगिती

2.उमेदवार - प्रकाश लोंढे पक्ष- आरपीआयजिल्हाध्यक्ष आरपीआयदाखल गुन्हे -03फसवणूक करणे, खंडणी मागणे, धमकी देणे, दंगल माजवणे, मारहाण करणे, खटले प्रलंबित, तडीपारीची नोटीस

3. उमेदवार- शिवा भागवतपक्ष - काँग्रेसदाखल गुन्हे- 12- खुनाचा प्रयत्न, दंगल माजवणे, हत्याराने मारहाण करणे, लूटमार करणे, 5 खटल्यांमध्ये पुराव्याअभावी मुक्तता,5 खटले कोर्टात सुरू2 खटल्यांमध्ये निर्दोष सुटका

4 .उमेदवार - सूर्यकांत लवटेपक्ष- शिवसेनादाखल गुन्हे- 04- जीवे मारण्याची धमकी देणे, जबरदस्तीने कोंडून ठेवणे, दंगल माजवणेसंदीप बिडवे हत्या प्रकरणातील आरोपी शिरीष लवटेचा भाऊ

गुन्हेगारांचे नातेवाईक रिंगणात

1. उमेदवार- अंजुम कांदे आणि गुरुदेव कांदेपक्ष- अपक्षसुहास कांदे यांची पत्नी आणि भाऊसुहास कांदेवरील दाखल गुन्हे-खंडणी, धमक्या, मारहाण आणि जाळपोळ , कांदेची जाळपोळप्रकरणी निर्दोष मुक्तता, इतर खटले प्रलंबितसध्या तडीपारीची नोटीस

2. उमेदवार - डॉ. सीमा ताजणेपक्ष- राष्ट्रवादी काँग्रेसतडीपार कन्नू ताजणेच्या पत्नीकन्नू ताजणेवरील दाखल गुन्हे, खंडणी, मारहाण, धमकावणे , खटले प्रलंबित

गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार नागपूर महानगरपालिका

1.उमेदवार - मधुकर कांबळेपक्ष - काँग्रेस दाखल गुन्हे- खून आणि खुनाचा प्रयत्न, हल्ल्याचा आरोप, खटले प्रलंबित

2. उमेदवार- अनिल धावडेपक्ष- भाजपअनेक गुन्ह्यांमध्ये शिक्षा , सट्टा चालवण्याचा आरोप, मोक्कांतर्गत 2001-2008 तुरुंगात, पुराव्याअभावी निर्दोष सुटकाइतर दाखल गुन्हे -हत्यार बाळगणे, हल्ला करणे, जीवे मारण्याची धमकी देणे खटले प्रलंबित

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 8, 2012 05:00 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...